-
स्त्री. १ मन ; पटावर उमटलेलें चित्र किंवा तत्संबंधीं विचार . तत्त्ववेत्यांनीं या शब्दांचा पुष्कळ प्रकारें अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे . - ज्ञाको . क . १८० . एखादी गोष्ट करावी किंवा न करावी याबद्दल अंतःकरणांत जी विशेष वृत्ति उठते ती ; विचार . ' मना कल्पना ते नको विषयांची ' - रामा ५ . २ योजना ; युक्ति ; शक्कल ; तोंड .' त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन ओटापाव्या । ' - दा . १९ . ८ . १८ . ३ विवक्षित कार्यसिद्धिसाठीं बुद्धीनें योजलेला उपाय . ४ भावना ; मनोवृत्ति ; समजा ; ग्रह ; कल्पित गोष्ट ; मानसिक सृष्टि . ५ तर्क ; अनुमान ; भास . ६ उद्देश ; बेत ; हेतु . ७ संशय ; शंका ; अंदेशा ; भय . ' कल्पनेची बाधा नहो कोणे काळीं । हीं संत मंडळी सुखी असो । ' - तुगा वेदशास्त्र संत चार कल्पना घेती साधुजन । ' - ऐपो ३८९ . ८ गृहीत धरणें ; मानणें ; आधारभूत धरणें . ' उपासक उपासनेसाठीं ईश्वरी मूर्तत्वादि कल्पना करितात .' ९ शब्द कंवा वाक्य जुळविण्यासाठी मांडणी , करामत ; गोष्टीची रचना ; ' पदें जरी ठाऊक असलीं तरी वाक्यांची कल्पना करण्यास बोलण्याचा अभ्यास पाहिजे .' १० कला ; युक्ति ; रहस्य ( कल्पक योजनेचें ) जुळविण्याची किंवा करण्याची योजना . ११ मनांत उठलेलें तरंग ; विचारलहरी . ( सं . क्लृप् )
-
०पुरित वि. कल्पनेचा भरपूर विलास असलेलें . पांखरास व हालत्या पिंपळ पानास - या कविता कल्पनापुरित आहेत .' - गोविंदाग्रज ( हर्षेकृत ).
-
०बाज वि. तर्क , अनुमान करण्यांत हुशार , वस्ताद ; नवीन नवीन युक्त्या काढणारा ; तर्कबाज ; सुपीक डोक्याचा . ( शं . कल्पना + फा . बाज )
-
०रूप वि. कल्पित ; मानीव ; कल्पनामात्र ; अवास्तविक ; ज्यांत खरें असें कांहींच नाही असें ( प्रपंच , संसार , सुखदुःख देह , संपत्ति , सृष्टी यांविषयीं योजतात ). वाद - पु . नवीन कल्पना , युक्त्या , सारणी , तर्क , तोड काढण्याची किंवा बांधण्याची शक्ति ; कल्पना करण्याचें मनाचें सामर्थ्य ; बुद्धिसामर्थ्य ; बहवनेचा जोर . ( इं .) आयडिआलिझम .
Site Search
Input language: