-
पु. ( संगीत ) गायनशास्त्रातील एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , निषाद हे स्वर लागतात . अवरोहांत गांधार धैवत वर्ज्य . जाति संपूर्ण औडुव . वादी मध्यम व संवादी षड्ज हे स्वर आहेत . हा रात्रीच्या दुसर्या प्रहरी गातात .
-
पु. एक जात व तींतील व्यक्ति ; डोंबारी ; कोल्हाटी ; बहुरुपी ; नट हा स्त्रिया इ०कांचा वेष धारण करुन नाचतो , दोरीवर चालणे , उड्या मारणे इ० अनेक प्रकारचे खेळ करुन उपजीविका करतो . नाच्या पोर्या ; सोंगाड्या . - ज्ञा १४ . २९० . कृष्णा दारोदारी नटसा कां मी सुयोध नाचेन ? मोभीष्म १ . १०३ . २ ( नाट्य ) नाटकांत स्त्री - पुरुष भूमिकेचे काम करणारा मनुष्य . ४ उनाड ; व्रात्य ; कपटी , हरामी मनुष्य . ठस ठोंबस खटनट । जगभांड विकारी । - दा २ . ३ . ३२ . ५ चेष्टा ; हावभ व . वदंता रद्दीप्तिस दावि नटे । - अकक २ . किंकरकृत शुकरंभा संवाद २० . ६ वेष ; अवतार ; रुप ; सोंग . धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट । - कथा २ . १२ . २४ . [ सं . नट ; सिं . नटु ] नटामाजी नेटका जाया - ( सुंदर अशा पुरुषनटाने सुंदर स्त्रीचा वेष धारण केला असतां तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरुन ) दिसण्यांत अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तु . ( तुल० ) की नटामाजील कामिनी ! की तममयकुहूची यामिनी । की अजाकंठिचे स्तन दोन्ही । तैसे प्राणी व्यर्थ ते । - ह १६ . ३२ . सामाशब्द -
-
०बिलावल पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम . संवादी षड्ज . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर होय .
-
०खट वि. लुच्चा ; सोदा ; हरामी . [ नट + खट ; हिं . नटखट ]
Site Search
Input language: