-
स्त्री. चुन्याची घाणी , घाणा . [ प्रा . दे . घाण ; म . घाणा ; का . गाण ] घाणेंकार - पु . ( गो . ) चरकवाला ; तेल पिळणारा ; घाणा चालविणारा .
-
घाण येणें
-
स्त्री. १ वास ; गंध . जैसे खालारा धांवे पाणी । भ्रमर पुष्पचिये घाणीं । - ज्ञा १८ . ४८१ . २ दुर्गंध ; दुर्गंधी ; नाकाला न आवडणारा वास ; दर्प ; ओरढाण . ३ घ्राणेंद्रियाला , डोळयांना न आवडणारी ओंगळ वस्तु ; केरकचरा ; खेड ; रेंदा ; राडा . अंगणांत घाण पडली ती काढून टाक . ४ ( तिरस्कार्थी ) घाणेरडा , वाशेरा , घाणेरा मनुष्य , पदार्थ . हा धोतरजोडा आठ हात ! ही घाण मला नको . ५ ( कामांतील , हिशेबांतील घालमेल ; घोटाळा ; अव्यवस्था ; गफलत ; गोंधळ ; भानगड ; ( मनुष्यांचा , कामांचा ) घप्पाघोळ ; हबेलंडी ; गळहाटा ; दुर्दशा ; फजिती ; ( पदार्थांचा ; सामानाचा ) चिवडा ; विचका ; बचबच ; चबढब . कामाची सगळी घाण केलीस . - विवि १० . ५ - ७ . १२९ . - विक्षिप्त ३ . १६८ . ६ एखाद्या व्यवहारासंबंधीं अवशिष्ट खटलें , काम , बाकी . मागील घाण काढून टाका , नंतर दुसरा पैका घ्या . - उदा . छी : ! थू : ! तिरस्कार , चीड , त्रास , मत्सर यांचा वाचक शब्द . [ सं . घ्राण = नाक ; प्रा . घाण ; फ्रें . जि . खन ] ( वाप्र . )
-
०माकड न. ( ना . ) शिमग्याच्या दिवसांत जमीनींत एक साधारण उंच खांब रोंवून व त्याच्यावर एक आडवा दांडा ठेवून त्या दांडयाच्या दोन टोकांवर मुलें अथवा माकडें बसवून फिरविण्यासाठीं केलेली रचना . [ घाणा + माकड ]
Site Search
Input language: