Dictionaries | References

रिकामा

   
Script: Devanagari

रिकामा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 Unemployed; wanting occupation, service, business, or work;--used of persons or animals: also unapplied to use or purpose, unengaged;--used of vehicles or things. 7 Not bearing or having; or not having accomplished the object purposed. Ex. मी तुला न्यायाला आलों तो घेतल्याशिवाय रि0 जाणार नाहीं; यजमा- नाकडे गडी पाठविला होता पण ते भेटले नाहींत तेव्हां गडी रि0 माघारां आला. रि0 बसणें To be out of employ; to sit idling. Ex. सहज रिकामे बैसाल घरीं ॥ संसार चाले कैशा परी ॥.

रिकामा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Unemployed; unsound; see रिकामका.

रिकामा     

वि.  आंत काही नसलेला , न भरलेला , पोकळ , रिता ;
वि.  कोरडा , तथ्यांश नसलेला , निरर्थक , निराधार , फुकट ;
वि.  निरुद्योगी , बेकार , रिकामटेकडा ;
वि.  कुचकामाचा , नसता , व्यर्थ ;
वि.  न गुंतलेला , मोकळा .

रिकामा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्यात काही नाही असा किंवा जो भरला गेला नाही असा   Ex. तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.
MODIFIES NOUN:
ठिकाण
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
रिक्त रिता मोकळा
Wordnet:
asmখালী
bdलांदां
benশূণ্য
gujખાલી
hinरिक्त
kanಖಾಲಿಯಿರುವ
kokरिकामी
malഒഴിഞ്ഞ
mniꯑꯍꯥꯡꯕ
nepरिक्त
oriଖାଲି
panਖਾਲੀ
sanरिक्त
telశూన్యమైన
urdخالی
adjective  वापरात नाही असा   Ex. आज माझी गणिताची तासिका रिकामी आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वापरात नसलेला
Wordnet:
gujખાલી
kasخٲلی , مۄکُل , فرٛی
malഒഴിവുള്ള
mniꯍꯥꯡꯅ
sanरिक्त
tamகாலியான
telఖాళీయైన
See : पोकळ, मोकळा

रिकामा     

वि.  
ज्यांत कांही नाही असा ; पोकळ . ही घागर रिकामी आहे .
( ल . ) पोकळ ; निराधार ; तथ्यांश नसलेला ; कोरडा ; पुराव्याने , प्रमाणाने , उदाहरणाने ज्याची सत्यता , यथार्थता सिध्द करतां येत नाही असा ( वाद , विधान , हकीकत ). उदा० रिकामा डौल ; रिकामी स्तुति .
ज्या जागेवरील अधिकारी किंवा काम करणारा मनुष्य अद्यापि नेमण्यांत आलेला नाही किंवा रजेवर गेला आहे अशी ( जागा ); ह्या कचेरीत तीन कारकुनांच्या जागा रिकाम्या आहेत .
निरर्थक ; व्यर्थ ; निष्फळ ; निष्प्रयोजन ; खोटा ( दगदग , पायपिटी , चौकशी , बोलणे ). नको सांगु बडिवार रिकामा लक्षुमि नाना परी - प्रभाकर - लावणी - लक्ष्मीपार्वती संवाद ( नवनीत पृ . ४१५ . )
जरुर ती सामुग्री , हत्यारे इ० साधन ज्याचे जवळ नाही असा . माझी हत्यारे सारी घरी आहेत , मी रिकामा तुमच्या घरी येऊन काय करणार ?
ज्याला नोकरी , उद्योग - धंदा नाही असा ; बेकार ; निरुद्योगी ; कामावीण ; कधी रिकामा असूं नको । - अनंतफंदी लावणी ( नवनीत पृ . ४३७ . )
उपयोगांत नसलेली , कामांत न गुंतविलेली ( वस्तु , गाडी इ० ). तुमचा चाकू रिकामा झाला म्हणजे मला अंमळ द्या .
एकाकी ; उद्दिष्ट न साधलेला ; प्रयोजनशून्य ; फलशून्य . मी तुला पुढे घालून घेऊन जाणार , रिकामा परत जाणार नाही .
ज्यास कोणी मालक नाही असा ( देश , मुलूख इ० ). आर्यांना दंडकारण्याचा प्रदेश रिकामा सांपडला . [ सं . रिक्त , रिच = रिकामे करणे ] म्ह० रिकामा न्हावी कुडाला ( भिंतीला ) तुंबड्या लावी . ( वाप्र . ) बसणे - उद्योग नसणे ; बेकार असणे ; निरुद्योगी राहणे ; आळशीपणाने वेळ काढणे . सहज रिकामे बैसाल घरी । संसार चाले कैशापरी । सामाशब्द - रिकामचावडी - टेंकडी - स्त्री . निरुद्योगी माणसांचे चाळे , उपद्व्याप ; रिकामपणाच्या खोड्या .
०चोट   टवळा टेकडा वि . ( अशिष्ट ) निरुद्योगी ; आळशी ( मनुष्य ); उपयोगी न पडतां पडून राहिलेली ( वस्तु ). म्ह०
रिकामचोट आणि गांवास उपद्रव .
रिकाम टवळा आणि गांवचा होवळा . रिकामटी , रिकामणूक - स्त्री . सवड ; फुरसत ; रिकामा वेळ ; रिकामीक . पुराणी बैसतां नाही रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्र । - तुगा ४२३४ . रिकामढंग , रिकामे ढंग - पुअव . रिकामपणचे चाळे , निष्फळ उपद्व्याप ; निष्प्रयोजन काम .
०पण   पणा न . पु . फुरसत ; सवड ; कामांत न गुंतल्यामुळे मिळणारी सावकाशी ; सुट्टी ; रजा ; विश्रांति .
०वाणा   णी वि . व्यर्थ ; फुकट ; आळसाने घालविलेले ; निष्फळ .
०वेळ  स्त्री. पुरसतीचा वेळ ; सवड . रिकामा ताठा पु . पोकळ गर्व ; पोकळ डौल ; मोठेपणाचा खोटा आव . म्ह० नाकी नाही काटा रिकामा ताठा . रिकामीक स्त्री . रिकामपण ; फुरसत ; सवड . रिकाम्या पोटी क्रिवि . अनशापोटी ; जेवण्यापूर्वी . रिकाम्यारानी णी क्रिवि . विनाकारण ; फळाची आशा किंवा संभव नसतां . तुमचे तिकडे कांही का होईना ? मला काय त्याची पंचाईत ? रिकाम्या रानी मी कशाला आपल्याला त्रास करुन घेऊ ? ( ज्यांत जनावरे नाहीत अश रानांत शिकारी जात नाहीत यावरुन वरील प्रयोग ). रिकाम्या हाताने क्रिवि . आणावयाची वस्तु न आणता ; रिक्त हस्ताने . रिकाम्या वि . ( गो . ) रिकामा . हांव रिक्यामी ना .

Related Words

रिकामा बरगी कुल्ले तासी   रिकामा सुतार आपले कुले तासी   रिकामा सुतार बायकोचे कुले तासी   आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका   रिकामा ताठा   रिकामा सुतार, कुले तासी   रिकामा करणे   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी   रिकामा   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   घरावर नाही कौल, रिकामा डौल   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   बाईल ना बडगा अन्‍ रिकामा धडगा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा   पोर ना सोर, रिकामा घोर   लाभ ना नफा, रिकामा धका   रिकामा कामकरी, सांज सकाळ फेरी   रिकामा गडी भागला आणि ज्याचें नाहीं काम केलें त्याला राग आला   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडया लावी   रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी   रिकामा न्हावी, भिंतीला तुंबडया लावी   रिकामा बनिया क्या करे, इधरकी टोकरी उधर भरे   रिकामा भाऊमहाराज   रिकामा भाग   रिकामा मापारी कपाळावर हात मारी   रिक्त   ഒഴിവുള്ള   ఖాళీయైన   ফাঁকা   खाली   خالی   ਖਾਲੀ   रिकामी   ഒഴിഞ്ഞ   శూన్యమైన   ಖಾಲಿಯಿರುವ   খালী   காலியான   ଖାଲି   ખાલી   खाली करना   रिकामी करप   خٲلی کَرُن   خالی کرنا   ଖାଲି କରିବା   ਖਾਲੀ ਕਰਨਾ   ખાલી કરવું   ژھوٚرُے   കാലിയാക്കുക   ವ್ಯರ್ಥ   empty   spare   খালি করা   ಖಾಲಿ ಮಾಡು   unused   लांदां   காலிசெய்   ఖాళీచేయు   শূণ্য   hollow   idle   उदां   वापरात नसलेला   free   घरचें खा आणि माझे नांव घ्‍या   घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका   हातीं नाहीं बोवाः काये जेवाः   रिक्त करणे   रिता करणे   रिकामटवळा आणि गांवचा होवळा   उद्योगु नातिल्लो आचारि चेलवां गांडि तासता   उद्योगु नातिल्लो कुंबारु मात्तें आपटायिता   पंधरा प्रकरच्या प्रतिष्ठा   पोकळ ताठा, हातीं खराटा   वायंडा   बेकार ठवय कुलॅ तासता   बेकार मेस्त गांड तासता   रिकामका   बुदवंताक फातरां शीत   मोठया गुणाचा, गू खातो जनाचा   deplete   घणघण घंटा   vacate   सारा दिन उरनि उरनि, रात चरखा परनि   अतिशाहणा   अत्रफ   चड बुदवंता फात्रां शीत, चड शाण्याक फातरांचें शित   नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें   पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा   रिकामवाणा   वाऊगा   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   उगिया   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP