-
स्त्री. अशुद्ध रक्तवाहिनी . ( सं .)
-
स्त्री. ( संगीत ) एक राग . याचे दोन प्रकार :- पहिल्या प्रकारांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतान . आरोहांत गांधार व धैवत वर्ज्य . जाति औडव संपूर्ण . वादी ऋषभ , संवादी पंचम ; गान समय सायंकाळ . प्रकार दुसरा - यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य . अवरोहांत गांधार वर्ज्य . जाति औडुव - षाडव . वादी ऋषभ व संवादी पंचम ; गानसमय - सायंकाळ .
-
स्त्री. १ गौर ; पार्वती ; देवी ; भावानी . २ ऋतुप्राप्त न झालेली मुलगी ; कन्या ; कुमारी ; कुमारिका . ३ दहा वर्षाच्या वयाची अविवाहित मुलगी . ४ देवीच्या पूजेचा भाद्रपद शुध्दपक्षांतील जागर व उत्सव . ( क्रि० जागविणें ). गौर जागविण पहा . ५ गौरवर्णाची स्त्री , गोरी . कनक चंपक दाम गौरी . [ सं . ] सामाशब्द - गौरीचा पेंड - पु . भाद्रपदांत शेताचे बांध घालण्यासाठीं खणलेली ही माती फार चिकण असते . या महिन्यांत गौरीचा ऊत्सव असतो म्हणून यास हे नांव पडलें . - चा हळवा - पु . नाचणीची एक जात . - चे डोहळे - पुअव . चैत्रांत पडणारी पावसाची बुरबुर .
-
न. गायनाचा एक प्रकार ; पारध्याचें गाणें . पारधी घाट वाये । साधावया गौरी गाये । तेथ हरिण लुब्ध होये । आइकावया ॥ - ज्ञाप्र ७२० . गोरी पहा .
Site Search
Input language: