Dictionaries | References
त्र

त्रिविध

   
Script: Devanagari

त्रिविध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Of three kinds or sorts. Ex. of comp. त्रि0 दान, त्रि0 पाप, त्रि0 पुण्य, त्रि0 व्रत, त्रि0 स्नान Triform or threefold giving, sin, virtue, observance, ablution, i. e. कायिक, वाचिक, मानसिक corporeal, oral, and mental giving,-sin,-virtue &c. Other compounds follow in order.

त्रिविध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of three kinds or sorts.

त्रिविध     

वि.  तीन प्रकारचा ; तीन स्वरुपाचा . ( समासांत ) त्रिविध - दान - पापपुण्य - स्नान इ० . = तीन प्रकारचे , स्वरुपाचे म्हणजे कायिक , वाचिक व मानसिक दान , पुण्य , पाप इ० शिवाय सात्विक , राजस , तामस आणि आध्यात्मिक , आधिदैविक , आधिभौतिक इ० दुसरे तीन प्रकारांचे गट आहेत . ते त्या त्या शब्दांच्या अर्थामध्ये पहावे . तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । - ज्ञा १८ . ५८५ . [ सं . त्रि + विधा = प्रकार , जाति ]
०अवस्था  स्त्री. जीवाच्या तीन अवस्था ; जागृति ; स्वप्न व सुषुप्ति .
०आहार  पु. सात्विक , राजस व तामस अशा तीन प्रकारचे कर्म .
०तप  न. कायिक , वाचिक व मानसिक अशा तीन स्वरुपाचे तप .
०ताप  पु. आध्यात्मिक , आधिभौतिक व आधिदैविक असे तीन प्रकारचे दुःख , पीडा ; तापत्रय . आध्यात्मिक ताप म्हणजे देह , इंद्रिये व प्राण यांच्यापासून होणारा ताप किंवा स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये होणारा आधिव्याधिरुप ताप होय . देवापासून तो आधिदैविक । मानस ताप तो आध्यात्मिक । भूतापासून तो भौतिक । या नांव देख त्रिविधताप । - एभा २२ . ३०९ . आधिभौतिक ताप म्हणजे स्वशरीराहून भिन्न अशा दृष्टिगोचर प्राण्यांपासून होणारा त्रास . आधिदैविक ताप म्हणजे दैवी प्रेरणेने , दैवी क्षोभापासून होणारा ताप . उदा० अतिवृष्टि , अनावृष्टि , भूकंप , शीतोष्णादिकांचा अतिरेक इ० . तुका म्हणे त्रिविधताप करि भग्न वपु विरहाग्नि तुझा जाळी । - देप १० . [ सं . त्रिविध + ताप = दुःख , पीडा
०देह  पु. स्थूल , सूक्ष्म व कारण असा तीन प्रकारचा देह .
०दाने   नअव . सात्विक , राजस व तामस अशी तीन प्रकारची दाने .
०नायिका   स्त्रीअव . वयाच्या मानाने केलेले स्त्रियांचे तीन वर्ग , प्रकार :- मुग्धा , मध्या व प्रौढा .
०परिच्छेदरहित वि.  देश , काल आणि वस्तु या तीन परिच्छेदांनी रहित ; देश , काल व वस्तु या तीन परिच्छेदापलीकडे गेलेला ; दिक्कालाद्यनवच्छिन्न . [ सं . त्रिविध + परिच्छेद + रहित ]
०परीक्षा  स्त्री. ( वैद्यक ) दर्शन (= चर्या पाहणे ), स्पर्शन (= नाडी पाहणे ) व प्रश्न (= चौकशी करणे ) या तीन प्रकारांनी वैद्याने करावयाची रोग्याची परीक्षा .
०प्रारब्ध  न. तीन प्रकारचे प्रारब्ध ; अनिच्छा प्रारब्ध , स्वेच्छा प्रारब्ध व परेच्छाप्रारब्ध ; दैव . [ त्रिविध + प्रारब्ध = दैव ]
०मंगल  न. अंगीकृत कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून त्या कार्याच्या आरंभी केलेला आशीर्वादात्मक (= आशीर्वाद मिळावा म्हणून देवांची प्रार्थना करणे ), वस्तुनिर्देशनात्मक (= एखाद्या पूज्य पुरुषाचे , कृत्याचे ध्यान करणे ), आणि नमस्कारात्मक (= कुलदेवता , गुरु इ० कांना नमस्कार करणे ) असा तीन प्रकारचा विधि .
०लक्षणा  स्त्री. जहत , अजहत व जहदजहत अशी तीन प्रकारची लक्षणा . जहल्लक्षणा ; अजहलक्षणा व जहदजहलक्षणा हे शब्द पहा . [ सं . त्रिविध + लक्षणा ]
०संबंध  पु. अभिधान संबंध , लक्षणसंबंध आणि व्यंजनासंबंध असा तीन प्रकारात्मक संबंध . अभिधानसंबंध म्हणजे वाच्यावाचक संबंध किंवा शब्द शब्दार्थ संबंध (= शब्द व त्यांचा अर्थ यांमधील संबंध ). या संबंधांवरुन एखाद्या वाक्याचा केवळ शब्दशः अर्थ प्रतीत होतो . लक्षणासंबंध म्हणजे लक्ष्यलक्ष्यकसंबंध (= शब्दांनी पर्यायाने सुचविलेला अर्थ व शब्दाचा वाच्यार्थ या परस्परांतील संबंध ) याने लाक्षणिक किंवा अलंकारिक अर्थ प्रतीत होतो . उदा० सारागांव = गांवांतील लोक . व्यंजनासंबंध म्हणजे जो अर्थ सांगावयाचा त्या अर्थाच्या पदाचा वाक्यांत उपयोग न करता प्रकारांतराने त्या अर्थाचा बोध करावयाचा . जसे :- ग्राहवती नदी येथे नदीत मगर आहेत या अर्थाने नदीस स्नानास जाऊ नको असा अर्थ घ्यावयाचा असतो .
०प्रतीति  स्त्री. गुरुपासून मिळालेले असे तीन प्रकारचे ज्ञान , अनुभव . [ सं . त्रिविध + प्रतीति = ज्ञान , अनुभव ] त्रिविधाहंकार पु . सात्विक , राजस व तामस अशा तीन प्रकारची स्वतःची जाणीव ; परमेश्वरापासून अथवा बाह्य विश्वाहून आपण वेगळे आहोत ही भावना ; अहंकारत्रय ; अहंकार पहा . [ सं . त्रिविध + अहंकार - मीपणा ]

त्रिविध     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
त्रि—विध  mfn. mfn. (त्रि॑-) of 3 kinds, triple, threefold, [ŚBr. xii] ; [ŚāṅkhŚr.] ; [Mn.] &c.
ROOTS:
त्रि विध

त्रिविध     

Shabda-Sagara | Sanskrit  English
त्रिविध  mfn.  (धः-धा-धं) In three ways, of three kinds.
E. त्रि, and विध sort.
ROOTS:
त्रि विध

Related Words

त्रिविध   जन त्रिविध   जन त्रिविध आहे   triangular association scheme   triple salt   triple vaccine   triplex milling machine   तापत्रयाला जोड नाहीं   तापत्रयाला जोडा नाहीं   जीऊ   तिहीउणे   तिहीतिहीउणे   त्रिरुप   triplex   triple   विध   त्रैविध्य   treble   त्रिधा   अहंकार   उदासीन   उपद्रव   ताप   धूम   ति      शब्द      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   foreign tourist   foreign trade   foreign trade multiplier   foreign trade policy   foreign trade register   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP