Dictionaries | References

डोळा

   
Script: Devanagari

डोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To close the eyes; to hoodwink; to blind. दोहों डोळ्यांची मुरवत राखणें To be afraid to look in the face of. रुप्याचे डोळे होणें in con. To have silvery eyes; i. e. to be blind, or to be dying. वांकड्या डोळ्यानें पाहणें To look sideways, i. e. with timorous yet earnest desire. दुसऱ्याच्या डोळ्यांत बोट टपकन शिरतें or जातें expresses great censoriousness or the easiness of c. दोन डोळे शेजारीं भेट नाहीं संसारीं Applied to a friend in the neighborhood but seldom seen. फुटका डोळा काजळानें साजरा Applied to a deformity or a defect tricked out or varnished over.

डोळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An eye. Sight. A little hole.
डोळा घालणें   Wink; intimate by the eye.
डोळा चुकविणें   Elude the observation of.
डोळें उघडणें   Open the eyes (to one's interest).
डोळे झाकणें   Connive at. Close the eyes in death.
डोळे ताठणें   Become haughty or disdainful.
डोळे निवणें   Obtain the desire of one's eyes.
डोळे पांढरे करणें   Beat mercilessly. Be on the point of death.
डोळे पुसणें   Comfort or console; wipe the tears of. Cry.
डोळे फाटणें   Have one's expectations enlarged.
डोळे फिरविणें   Turn up the eyes; be dying.
डोळे फुटणें   Become blind. Be pained at the sight (of another's success).
डोळे भरुन पाहणें   To feast the eyes upon.
डोळे मुरढणें   Cast the eyes askance.
डोळे मोंडणें   Wink at; ogle.
डोळे येणें   Get ophthalmia, to have sore eyes. Obtain sight.
डोळे लवणें   Have a twitching in the eyes.
डोळ्यांच्या खांचा होणें   To become stone-blind.
डोळ्यांच्या वाती करणें   Strain the eyes.
डोळ्यांच्या पारणे फिटणें   To have the desire of one's eyes gratified.
डोळ्यांत खुपणें-सलणें   Pain the eyes-another's merit, &c.
डोळ्यांत तेल घालून पाहणें   Inspect narrowly.
डोळ्यांत धूळ फेकणें   To throw dust into the eyes.
डोळ्यांत पाणी नसणें   To have no sense of shame at.
डोळ्यांत प्राण ठेवणें   Be ready to die after seeing.
डोळ्यांत प्राण येणें   Be in the last lingering of life.
डोळ्यांत भरणें   Fill or satisfy the sight.
डोळ्यांत माती पडणें   Envy.
डोळ्यांत वात घालून बसणें   Sit up watching.
डोळ्यांत शरम नसणें   Be brazen-faced.
डोळ्यांनी उजडणें.   Watch throughout the night.
डोळ्यावर कातढें ओढणें   Connive at.
डोळ्यांवर धूर येणें.   Be blinded (by riches, &c.)
डोळ्यांवर पडळ येणें.   To be proud-blind
डोळ्यांवर येणें   To be an eye-sore to.
डोळ्याशीं डोळा मिळवणें.   To look at audaciously.
डोळ्याशीं डोळा लागणें.   To close the eyesin sleep.
रुप्याचे डोळे फोडणें   To be blind or to be dying.
डोळ्यांपुढे काजव दिसणें   To be dizzy.
डोळ्यांत केर आणि कानांत फुंकर   To apply a wrong remedy to a wrong disease.

डोळा     

ना.  अक्ष , चक्षु , नयन , नेत्र , लोचन ;
ना.  हक् , द्दष्टी .

डोळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय   Ex. नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
ABILITY VERB:
पाहणे
HOLO COMPONENT OBJECT:
चेहरा
HYPONYMY:
तिसरा डोळा
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नेत्र नयन लोचन अक्ष चक्षू अक्षी आंख
Wordnet:
asmচকু
benচোখ
gujઆંખ
hinआँख
kanಕಣ್ಣು
kasأچھ , لال , ٹۄجہِ
kokदोळे
malകണ്ണു്‌
mniꯃꯤꯠ
nepआँखा
oriଆଖି
panਅੱਖ
sanचक्षुः
tamகண்
telకన్ను
urdآنکھ , چشم , نین
noun  बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा   Ex. बटाट्याला खूप डोळे आले आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंकुर
Wordnet:
asmচকু
bdमेगन
benচোখ
gujઆંખ
hinआँख
kanಮೊಳಕೆ ಕಣ್ಣು
kasأچھ
kokदोळो
malമുളങ്കണ്ണ്
mniꯃꯃꯤꯠ
nepआँखा
oriଆଖି
panਅੱਖ
sanअङ्कुरणबिन्दुः
tamகணு
telమొలకెత్తు మొన.
urdآنکھ
noun  जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते   Ex. ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तोंड
Wordnet:
benঘুলি
gujગલિયા
hinगलिया
kasگلِیا
urdگلیا

डोळा     

 पु. 
  1. रंग , रुप वगैरे जाणण्याचे इंद्रिय ; नेत्र ; दृष्टि ; नयन ; नेत्रेंद्रियाचे स्थान .
  2. दृष्टि ; नजर ; लक्ष ; कटाक्ष .
  3. लहान भोंक ; छिद्र ( कापड , भांडे इ० चे ).
  4. मोराच्या पिसार्‍यावरील डोळ्याच्या आकाराचे वर्तुळ ; नेत्रसदृशचिन्ह ; चंद्र ; चंद्रक. 
  5. अंकुर , मोड फुटण्याची , येण्याची जागा ( बटाटा , ऊंस नारळ इ० स ).
  6. पायाच्या घोट्याचे हाड ; घोटा .
  7. गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात ते प्रत्येक .
  8. माहिती सांगणारा ; ज्ञान देणारा ( माणूस , विद्या इ० ); बातमीचा , ज्ञानाचा उगम ( शास्त्र , कागदपत्र , हेर , गांवचा महार इ० ). धर्माधर्म ज्ञान समजण्याचा डोळा धर्मशास्त्र . पांढरीचे डोळे महार .
  9. माशाच्या पाठीवरील खवला ; सीताफळ , रामफळ , अननस इ० फळावरील खवला , नेत्राकार आकृति .
  10. ( खा . ) १६ शेराचे माप ; परिमाण , एकतृतीयांश पायली ( ४८ शेरांची ). १२ डोळे = एक माप व ६० मापे = एक साठ ).
  11. कुंभाराच्या चाकांतील एक खांच .
  12. (सोनारी ) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षा तोंडाशी किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग .
  13. दुर्बिणीचे आपल्याकडे असलेले भिंग .
  14. जात्याचे तोंड .
  15. मोटेस बांधावयाचे लाकण .
  16. ( विटीदांडू , कर ). आर डाव ; वकट , लेंड इ० मधील डोळ्यावरुन विटी मारण्याचा डाव . ( क्रि० मारणे . ) [ देप्रा . डोल ] ( वाप्र . )

डोळा उघडत नाही    एखाद्या , गर्विष्ठ मगरुर माणसाबद्दल किंवा पाऊस एकसारखा पडत असल्यास म्हणतात .

डोळा ओळखणे   दुसर्‍यास मनाचा कल समजणे , आशय , अभिप्राय ताडणे .
डोळा काणा असावा मुलूक काणा असू नये   दृष्टीला अंधत्व असले तरी चालेल परंतु अव्यवस्था असू नये .
डोळा घालणे - मारणे   
  1. डोळा मिचकावून खूण करणे .
  2. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या ( बाई ) कडे पाहून डोळे मिचकावणे .

डोळा चुकविणे   दृष्टीस न पडणे ; भेट घेण्याचे टाळणे ; नजरेला नजर भिडू न देणे.
डोळा ठेवणे    एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणे .
डोळा जाणणे - समजणे - ताडणे   मनांतील गोष्ट जाणणे .
डोळा देणे    बारीक नजर ठेवणे . गृध्रासम डोळा दिधला . - संग्रामगीते ४१ .
डोळा न फुटे काडी न मोडे या रीतीने करणे    अगदी लक्षपूर्वक , कौशल्याने काम करणे .
डोळा पाहणे   डोळे वटारुन पाहणे .
डोळा प्राण ठेवणे    डोळ्यांत प्राण ठेवणे पहा . माझी माता शोके करुन । डोळा प्राण ठेवील की ।
डोळा बांधणे   दुसर्‍या झाडाच्या फांदीला सालीमध्ये खांच करुन निराळ्या झाडाचा डोळा कापून बसविणे .
डोळाभर झोप    चांगली झोप .
डोळे उगारणे - गुरकावणे    डोळे वटारणे .
डोळे उघडणे   आपले कर्तव्य , हिताहित वगैरेकडे लक्ष वेधणे ; सावध होणे . अनुभवाने ; चट्टा बसल्याने ; नुकसान झाल्याने शहाणे होणे . आता तरी याचे डोळे उघडले असले म्हणजे पुष्कळच चांगले झाले म्हणायचे . - उषःकाल .
डोळे उरफाटणे - फिरणे - चढणे   ( श्रीमंतीमुळे ) मदांध होणे .
डोळे ( मोठे , केवढे ) करणे    डोळे वटारणे ; रागावून पहाणे . मी नुसते त्याचे नांव घेतले मात्र तो बाईसाहेबांनी केवढे डोळे केले ते तू पाहिलेस ना ? - फाल्गुनराव .
डोळे खाणे    पेंगणे ; डुलकी घेणे .
डोळेगांवची कवाडे लागणे   ( मी , तो इ० ) अंध होणे .
डोळे चढणे    ( दारुने , जाग्रणाने , उन्हाने , रागाने ) डोळे उग्र दिसणे .
डोळे चढवून बोलणे    रागाने बोलणे .
डोळे जळणे   द्वेषामुळे बरे न पाहवणे ; जळफळने.
डोळे जाणे    अंधत्व येणे .
डोळे झांकणे , ढापणे   
  1. मरणे .
  2. दुर्लक्ष , हयगय करणे ; कानाडोळा करणे ; डोळझांक करणे .
  3. डोळे मिटणे ; प्राण सोडणे .

डोळे टळटळीत भरणे    अश्रूंनी डोळे भरुन येणे .
डोळे तळावणे - खुडकणे   डोळे लाल होणे , उष्णतेने बिघडणे .
डोळे तांबडेपिवळे करणे   रागाने लाल होणे ; उग्र नजरेने , डोळे फाडून पाहणे .
डोळे निवणे , निवविणे - थंड होणे    एखादी ईप्सित प्रिय वस्तु पाहून समाधान पावणे ; कृतकृत्य होणे . कृष्णा म्हणे निवविले डोळे त्वां बा यदूत्तमा माजे । - मोऐषिक ३ . ३१ .
डोळे पठारास , पाताळांत जाणे    आजार , अशक्तता इ० मुळे डोळे खोल जाणे .
डोळे पांढरे करणे   
  1. ( डोळे पांढरे होईपर्यंत ) अत्यंत क्रूरपणाची शिक्षा देणे .
  2. मृत्युपंथास लागणे .

डोळे पापी    डोळ्यांना नेहमी विलासी , विषयी , कामुक असे मानण्यात येते ; प्रथम पाप करतात ते डोळेच .
डोळे पाहून वागणे - चालणे   एखाद्याच्या मनाचा कल पाहून वागणे ; तब्येत ओळखणे .
डोळे पिंजारणे - फिंदारणे - फाडणे    ( रागाने ) डोळे वटारणे ; क्रूर मुद्रा करणे ;
डोळे पुसणे   
  1. रडावयास लागणे ; वाईट वाटणे .
  2. सांत्वन करणे .

डोळे पोंढळणे   डोळे खोल जाणे .
डोळे फाटणे   
  1. आशा जास्त जास्त वाढणे ; महत्त्वाकांक्षी बनणे .
  2. आश्चर्यचकित होणे .

डोळे फोडणे   
  1. रागावणे ; डोळे वटारुन पाहणे .
  2. अंतकाळी डोळे निश्चळ उघडे ठेवणे ; डोळे थिजणे .

डोळे फिरणे   
  1. घेरी , चक्कर येणे .
  2. ( ल . ) मगरुर , उन्मत्त होणे .
  3. (मरणसमयी ) डोळे फिरवू लागणे .
  4. ( करारासंबंधी ) बेत फिरणे ; मत बदलणे ; माघार घेणे . 

डोळे फिरवणे   ( रागाने ) डोळे वटारणे ; चेहरा उग्र करणे ; अवकृपेने पाहणे .
डोळे फुटणे   
  1. अंध होणे ; डोळे जाणे .
  2. दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून मत्सरग्रस्त होणे . 

डोळे फोडून वाचणे    लक्षपूर्वक वाचणे .
डोळे बांधणे   
  1. भारणे ; नजरबंदी करणे ( जादूटोणा इ० नीं ).
  2. डोळ्यात माती फेकणे ; फसविणे .

डोळेभर - डोळ्यांभर पाहणे , डोळे भरुन पाहणे   तृप्ती होईपर्यंत एखादी वस्तु पाहणे .
डोळे मिटणे    मरणे ; डोळे झांकणे . आदिमाये , माझ्या डोळ्यांनी हे पाहण्यापूर्वी माझे डोळे का मिटले नाहीत . - बाय ५ . २ .
डोळे मुरडणे   
  1. वांकडी नजर करुन , संशयित नजरेने पाहणे .
  2. काण्या डोळ्याने पाहणे ; एके बाजूस पाहणे . डोळे मुरडुनि सहज बघे ती । - शाकुंतल अंक २ . 

डोळे मोडणे - मारणे   
  1. डोळे मिचकावणे ; डोळ्याने खुणा करणे . डोळे मोडूनि वांकुल्या दावी । घुलकावित मान पै ।
  2. ऐटीने , चोखंदळपणाने डोळे उचलणे , वर करणे ; नखर्‍याने पाहाणे .

डोळे येणे   अंधत्व जाऊन दृष्टि प्राप्त होणे .
डोळे येणे - विणे   डोळ्यांस रोग येणे .
डोळे लवणे   डोळ्याच्या पापणीचे स्फुरण होणे . ( शुभाशुभसूचक ). पुरुषांचा उजवा व बायकांचा डावा डोळा लवणे हे शुभसूचक लक्षण समजतात .
डोळे लाल करणे - वटारणे   
  1. रागावणे .
  2. एखाद्यावर उलटणे . 

डोळे होणे   माहिती होणे - सावध होणे ( कामधंदा , अभ्यास इ० संबंधी ).
डोळ्याआड   नजरे पलीकडे , पाठीमागे
डोळवस  पु . डोळसपणा . आत्मा स्वयंप्रकाश । जेणे जन होय डोळस । तया डोळ्या डोळवस । विपु ७ . ११६ .
डोळ्यांचा अंधार करणे   उजेडांत चुकणे ; धडधडीत चूक करणे .
डोळ्यांची खोगरे - डोळ्यांच्या खाचा - डोळ्यांची भिंत होणे    काही एक दिसेनासे होणे ; दृष्टि जाणे .
डोळ्यांचे पारणे फिटणे - होणे    उत्कंठेने अपेक्षिलेली वस्तु पहावयास मिळणे ; फार दिवस इच्छिलेली गोष्ट घडून येणे .
डोळ्यांच्या वाती करणे    डोळे ताणणे ; डोळ्यांनी जास्त काम करणे .
डोळ्यांत कुरुप - कुरुंद असणे   असूया वाटणे ; एखाद्याविषयी मत्सरग्रस्त असणे .
डोळ्यांत खुपणे - सलणे   
  1. डोळ्यांस वेदना होणे .
  2. ( ल . ) मत्सरग्रस्त होणे ; द्वेषबुद्धीयुक्त , कलुषित मन असणे ( दुसर्‍याचे गुण , धन इ० पाहून ) 

डोळ्यांत गंगाजमना येणे - डोळे भरुन येणे    रडू येणे .
डोळ्य़ांत जहर उतरणे   दुसर्‍याचे वैभव इ० पाहून हेवा वाटणे ; डोळ्यांत सलणे , खुपणे .
डोळ्यांत तेल घालून जपणे    सूक्ष्म नजरेने पाहणे ; पाळत ठेवणे ; बारीक चौकशी करणे .
डोळ्यांत धूळ , माती घालणे - फेकणे    फसविणे ; नजरबंद करणे .
डोळ्यात पाणी असणे    लाज वाटणे ; विनय , मर्यादा असणे .
डोळ्यात पाणी नसणे    लाज न वाटणे ; आदर न वाटणे ; निर्लज्ज बनणे .
डोळ्यात प्राण ठेवणे    एखादी गोष्ट पाहिल्यावर मग मरावयास तयार असणे ; मरणापूर्वी एखाद्या गोष्टीची इच्छा धरणे .
डोळ्यात प्राण येणे - उरणे   
  1. मरणाच्या द्वारी असणे .
  2. इच्छित वस्तु ( माणूस इ० ) पाहण्या - मिळण्याकरताच केवळ फक्त प्राण गुंतलेले असणे .

डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही    अतिशय निबिड काळोख पडला असता म्हणतात .
डोळ्यात भरणे   
  1. दृष्टीला आनंद , संतोष देणे .
  2. पटणे ; मान्य होणे . 

डोळ्यात माती पडणे - मत्सर वाटणे ; द्वेष करणे . डोळ्यात वात घालून बसणे   ताटकळत , वाट पहात मार्गप्रतीक्षा करणे .
डोळ्यात शरम नसणे   निर्लज्ज बनणे .
डोळ्यात हराम उतरणे   एखाद्याच्या दृष्टीने वाईट असणे .
डोळ्यातील काजळ चोरणे   पाहता पाहता चोरी करणे .
डोळ्यातून उतरविणे    अपमान करणे .
डोळ्यातून पाणी काढणे   रडणे , अश्रू गाळणे . असे वारंवार डोळ्यांतून पाणी काढत राहू नये . - रत्न ४ . ४ .
डोळ्यांनी उजेडणे   सारी रात्र जागून काढणे .
डोळ्यांनी मारणे    प्रेमकटाक्षांनी प्रहार करणे ; प्रेमकटाक्ष टाकणे .
डोळ्यांनी रात्र - दिवस काढणे    एकसारखे जागत बसून रात्र - दिवस घालविणे .
डोळ्याने भुई दिसेनाशी होणे    उन्मत्त होणे ( संपत्ति इ० नीं ).
डोळ्यापुढे काजवे चमकणे    भोवळ येण्याची भावना होणे ; घेरी येणे . आले डोळयाला बहु वर्षाकाली जसे नदी पाणी । - मोशल्य ३० . २० .
डोळ्यांवर कातडे ओढणे   
  1. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे .
  2. बेदरकारपणे ; बेफामपणे वागणे .

डोळ्यांवर धूर येणे - धूराने डोळे भरणे   (अधिकार , संपत्तीने ताठणे ; फुगून जाणे . गर्वाने कोणास न जुमानणे .
डोळ्यांवर येणे   
  1. डोळ्यांत सलणे .
  2. ( कीर्ति , पैका यांनी ) पूर्णपणे फुगून जाणे ; धुंद होणे . 

डोळ्याशी डोळा मिळविणे - भिडविणे   ( एकमेकांकडे पाहणे ) नजरेशी नजर भिडविणे ; उद्धटपणाने टक लावून पाहणे .
डोळ्याशी डोळा लागणे    झोप येणे , झोपेने डोळे मिटणे .
डोळ्यांस टिपे येणे    डोळ्यात अश्रू येणे .
डोळ्यांस पाटा ( पट्टा ) बांधणे    डोळे मिटणे ; कानाडोळा करणे ; न पाहिल्यासारखे करणे .
डोळ्यांस पाणी लावणे    अनुकूल करुन घेणे ; संतोषविणे . आताशा उगेच बाबाच्या डोळ्यांस पाणी लावण्यासाठी इकडे येते . - रत्न ३ . ३ .
डाव्या डोळ्याने   
  1. तिरस्काराने . डाव्या डोळ्याने तुमच्याकडे पाह्यचेसुद्धा नाहीत . - झांमू ६१ .
  2. चोरुन , वाकड्या नजरेने

दोहो डोळ्यांची मुरवत राखणे   एखाद्याकडे पहावयास , नजर भिडवावयास भिणे , कचरणे .
दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट टपकन जाते - शिरते   दुसर्‍याचे दोष चटकन कळतात . दोषैकदृष्टीबद्दल वापरतात .
रुप्याचे डोळे होणे   डोळे पांढरे होणे ; मरणोन्मुख होणे .
वांकड्या डोळ्याने पाहणे   कानाडोळा करुन पाहणे . भीतभीत पण उत्कट इच्छेने पाहणे .
म्ह०
  1. दोन डोळे शेजारी भेटत नाही संसारी = शेजारी राहत असूनहि क्वचितच भेटत असलेल्या मित्रांसंबंधी योजतात .
  2. डोळ्यात केर व कानांत फुंकर = रोग एक व उपाय भलताच !
  3. फुटका डोळा काजळाने साजरा = व्यंग झांकण्याचा प्रयत्न .

डोळुला  पु . सामाशब्द ( लडिवाळपणे ) डोळा . वाटुली पाहता सिणले डोळुले । दाविसी पाउले कै वो डोळा । - तुगा ८२९ .
डोळे उजेडी क्रिवि .  
  1. दिवसा उजेडी ; अंधार पडण्याचे पूर्वी ; उजेड आहे तो . डोळेउजेडी घरी ये .
  2. स्पष्टपणे ; उघड ; तोंडावर ; आड पडदा न ठेवता . तुझे मनात काय ते डोळेउजेडी सांग . [ डोळा + उजेड ] 

डोळे झांक - की  स्त्री .  मुद्दाम दुर्लक्ष ; कानाडोळा ; हयगय ; उपेक्षा . [ डोळे + झांकणे ]
डोळे झांकणी , डोळे झांकण्याचा खेळ  स्त्रीपु .  एक खेळ .
डोळे झांकणे - झांपणी - ढाळणे - ढांपणे - बांधणे  नस्त्री .  बैलाच्या डोळ्यांवरची झांकणी ; ढापणी .
डोळे फुटका वि .    दृष्टी गेलेला ; आंधळा .
डोळेफोड  स्त्री . 
  1. बारीक पाहणी , चौकशी ; तीक्ष्ण नजर .
  2. डोळे त्रासले जावयाजोगी किचकट कामामध्ये मेहनत .

वि .  
  1. डोळे त्रास देणारे ( कलाकुसरीचे , बारीक काम ).
  2. डोळ्यास हिडिस दिसणारी ; ओंगळ ( वस्तु ).
  3. डोळ्यात भरणारी पण निरुपयोगी सुंदर पण टाकाऊ . ही गाय डोळेफोड मात्र दिसते पण दूध तादृश नाही . [ डोळा फोडणे ] 

डोळे भेट  स्त्री  
  1. शेवटची भेट ( मुलाची व मरणोन्मुख आईबापाची भेट ); नुसते एकदा शेवटचे डोळ्यांनी पाहणे .
  2. ओझरती , उभ्या उभ्या भेट ; घाईची भेट .
  3. नजरानजर ; दृष्टीस पडणे . डोळेभेट तरी दुरुन देत जा नको करु हयगय । होला १५१ . 

डोळे मिचका - मिचक्या वि .  डोळे पिचक्या ; डोळे मिचकावणारा .
डोळेमोड  स्त्री . नेत्रसंकेत ; डोळे मिचकावणे .
डोळेमोडणी वि .  डोळे मोडणारी ( मूढ होऊन ); डोळे फिरविणारी . चौघी डोळेमोडण्या । लाजोनिया तटस्थ । - ह ३ . ५ .
डोळेलासु वि .   डोळ्यांत अंजन घालणारा ; वठणीवर आणणारा . साभिमानिआ देवां डोळेलासु । - शिशु १५६ . [ डोळा + लासणे = डाग देणे ]
डोळ्याचा त्रास - दाब  पु .  डोळ्याने भीति घालणे ; दाबणे ; भेदक नजर .
डोळ्याचा मद  पु . डोळ्याची लाली , लालबुंदपणा ( मद्यपान , क्रोध , गर्व इ० मुळे ).
डोळ्याचा पडदा   पु . डोळ्यावरचे आवरण ; नेत्रदोष .
डोळ्याची खूण  स्त्री .  नेत्रकटाक्ष , संकेत . तुमच्यापैकी कोणी तरी बाईने डोळ्याची खूण करुन त्याला तेथून बाहेर काढला असेल . - बाय २ . १ .
डोळ्याची जीभ  स्त्री . पापण्यांच्या आतील बाजूस अस्तराप्रमाणे असणारी त्वचा .
डोळ्यांतले काजळ चोरणारा - नेणारा  पु .  वस्ताद ; अट्टल चोर .
वि .  अतिशय कुशल ; हुषार ; धूर्त .
डोळ्यादेखत - डोळ्यादेखतां , डोळ्यापुढे क्रिवि .  डोळ्यांसमोर ; प्रत्यक्ष ; स्वतः पाहिल्यापैकी ; स्वतःच्या आयुष्यातील , अनुभवातील ; जिवंतपणी . म्हातारीचे डोळ्यादेखत पोराचे लग्न होते म्हणजे बरे .
डोळ्यांभर क्रिवि .  डोळे भरुन ; अवलोकनाने नेत्र तृप्त करुन ( पाहणे ) दृष्टी संतुष्ट करुन .
डोळ्यांमागे - पर - भारे क्रिवि .  पाठीमागे ; गैर हजेरीत ; अप्रत्यक्ष

Related Words

एक डोळा   तिसरा डोळा   डोळा लागणें   डोळ्याला डोळा लागणें   डोळ्याशीं डोळा लागणें   डोळा लवणें   डोळा देणें   डोळा बांधणें   डोळा येणें   डोळा असणें   डोळा घालणें   डोळा मारणें   फुटका डोळा काजळानें साजरा   फुटका डोळा, खोटया कानापेक्षां बरा   डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये   डोळा पाहणें   अंधळा डोळा   डोळा ठेवणें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   एक डोळा तो का डोळा म्हणावा   डोळा   तिसरो दोळो   तीसरी आँख   दोळे   ترٛییِم أچھ   তৃতীয় নয়ন   ତୃତୀୟ ନୟନ   ਤੀਸਰੀ ਅੱਖ   கண்   కన్ను   ಕಣ್ಣು   കണ്ണു്   त्रिलोचनम्   અર્ધનયન   चक्षुः   अंधळा डोळा काजळानें साजरा   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   गट गोळा, वरती डोळा   काडी न मोडे व डोळा न फुटे   कावळ्याचा डोळा   एक पुती रडे, सातपुती डोळा नुघडे   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   गांवचा डोळा   दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा   जो आहे बहू भोळा, त्‍यावर ठकाचा डोळा   चाव केला, डोळा गेला   डोळा उघडत नाहीं   डोळा ओळखणें   डोळा काणा असावा, पण मुलुख काणा नसावा   डोळा चुकविणें   डोळा जाणणें   डोळा तर फुटूं नये आणि काडी तर मोडूं नये   डोळा न फुटे, काडी न मोडे   डोळा भरणें   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   डोळ्यांशीं डोळा भिडविणें   डोळ्यांशीं डोळा मिळविणें   पंढरीचा डोळा   धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों   पांढरीचा डोळा   पायाचा डोळा   पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा   मेगन   आँख   आँखा   চোখ   ଆଖି   ਅੱਖ   આંખ   চকু   वाघाचा डोळा   eye   oculus   लोभ लचकला, डोळा पिचकला   लोभ लचका, डोळा पिचका   optic   लोभ लचकला नि डोळा पिचकला   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   सहज डोळा फिरकावीन, चार आणे टरकावीन   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   eyebud   screw eye   dormant eye bud   eye bud   bud mutation   ऊर्ध्व नेत्र   घरसॉ   चश्‍म   shield budding   पापणी उडविणें   budwood   patch budding   नजन   पिगल   एकडोळसां   आँखका अंधा, और गांठका पुरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP