Dictionaries | References

जेवणें

   
Script: Devanagari

जेवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. जैसें लक्षभोजन होता पाही ॥ तयामाजी अंत्यज जाई ॥ मग ब्राह्मण उठति लवलाही ॥ जेविता ठाव टाकूनि ॥. जेवूं घालणें To give to eat; to feed or maintain: also to set food before. जेवून सेवा गोड Worship or service is sweetest after one's meal. दोहींकडून जेवणें To take payment from both parties in a cause: also to take payment from one party and a bribe from the other;--used of a Wakíl or Advocate. दुसऱ्याच्या तोंडानें जेवणारा One who catches up and re-utters the sayings of another.
.

जेवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Make a meal, dine or sup.
जेवीन तर तुपाशीं, नाहीं तर उपाशीं.   My own terms or none.
दुसऱ्याच्या तोंडानें जेवणारा.   One who catches up and re-utters the saying of another.

जेवणें     

अ.क्रि.  १ खाणें ; भोजन करणें . कधीं कधीं या क्रियापदाला कर्म असतें तथापि त्याचा संबंध कर्त्याशींच असतो . उ० मी भात जेवलों , भाकरी जेवलों . २ ( ल . ) फळ चाखणें ; भोगणें ( एखाद्या बर्‍यावाईट कृत्याचें ); अनुभवणें ; परिणाम भोगणें . पूर्वी दुष्कर्मे केलीं त्यांचें फळ आतां जेवतों . ३ लांच घेणें . - न . ( राजा . ) देवळांतील जेवणावळ . [ सं . जेमन ; पो . जि . जलार ; फ्रेंजि . जमार ; गु . जमन ; पं . जेउणा ; हिं . थेवना ] ( वाप्र . ) जेविता ठाव टाकणें - पुढचें ताट ढकलून देणें ; पानावरून उठणें . जैसें लक्षभोजन होता पही । तयामाजी अंत्यज जाई । मग ब्राह्मण उठती लवलाही । जेविता ठाव टाकूनि । जेवूं घालणें - १ खावयास देणें ; पोषण करणें . २ वाढणें ; अन्न पुढें ठेवणें . जेवून सेवा गोड - जेवण झाल्यानंतर मग नौकरी वगैरे बरी वाटते . दोहोंकडून , जेवणें - एखाद्या कामांत दोन्ही पक्षांकडून पैसा घेणें किंवा एका पक्षाकडून पैसे ( फी ) घेऊन दुसर्‍या पक्षाकडून लांच घेणें ( वकिलांसंबंधीं योजतात ). म्ह० १ जेवीन तर दुधाशीं ( तुपाशीं ) नाहीं तर उपाशी = मी म्हणेन तसें नाहीं तर मुळीच नाही . २ रांधावें तसें जेवावें , करावें तसें पावावें . सामाशब्द - दुसर्‍याच्या तोंडानें जेवणारा - वि . १ दुसर्‍याचें बोलणें ऐकून घेऊन तेंच पुन्हां बोलणारा . २ स्वत : च्या मतानें कांहीं न करणारा ; दुसर्‍याच्या तंत्रानें वागणारा . जेवण्या - पु . ( कों . ) गलबतावरील जेवण करणारा . जेवतागण - वि . १ केवळ जेवण्याच्या कामाचा ( माणूस ). २ ( ल . ) बिनकामाचा पण खादाड ( माणूस ); फुकटखाऊ ; भोजनभाऊ . तो काडीमात्र उपयोगी नव्हे , आपला जेवतागण आहे . [ जेवणें + गण ] जेव्या - वि . जेवणाचे वेळीं हजर असणारा ; भोजनभाऊ . जेवतागण पहा . [ जेवणें ]

जेवणें     

दोहोंकडून जेवणें
काही वर्‍हाडी मंडळींचा वर व वधू पक्षांशी दोहोंशीहि नात्‍याचा संबंध असतो. त्‍यामुळे ते दोहीकडील जेवणावळीत हजर असतात. त्‍याप्रमाणें उभयान्वयी माणसाने दोन्ही पक्षांकडून लांच वगैरे घेणें.

Related Words

नाकाहोटावर जेवणें   चाटून पुसून जेवणें   दांतां ओठांवर जेवणें   नखाबेटांवर जेवणें   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   जेवणें   गोठण जेवणें   टाकलें अन्न जेवणें   टुकेनें जेवणें   अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें   उपट जेवणें   एकताटीं जेवणें   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   एका ताटीं जेवणें आणि घास मोजणें   एखाद्याच्या बारशाला जेवणें   एखाद्याच्या बारशास जेवणें   बापाचें बारसें जेवणें   बाराव्याला आणि बारशाला जेवणें   दुसर्‍याच्या तोंडानें जेवणें   पायानें जेवणें   पोट बांधून जेवणें   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   सुखाचा सोहळा भोगणें   पेज मारप   पोरास जेऊं सांगे वाटींत तर पोर जेवी करटींत   सटयेक जेवप   भुसारचें   गर्भाचें करणें   गर्भाचें होणें   आधडणें   टेक मारणें   नगारा भरणें   एकताटी   एकताट्या   एकपंगत   एका ताटांतला   भादव्यांत भट्‌टू, आश्र्विनांत तट्‌टू (पुष्‍ट होतात)   धर्माचें आणि ऊन ऊन   पंक्तीचा लाभ   खपाटणें   पुख्खा झोडणें   रोटीव्यवहार   खमाटणें   हात धुणें   ताळकिळा   तुकडा मोडणें   तुकडे मोडणें   उकिरड्यावर निजते, लवंगा पुसते   उष्टा होणें   उष्टीं काढपाक येवप   पाटावरचें(वरुन) ताटावर आणि ताटावरचें (वरुन) पाटावर   वोढा सोडणें   बारसें   हात भिजणें   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   आरोगणें   अनमानणें   जांवई जेवण   उटारेंटी   उटारेंठां उटारेंठीं   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   अन्नसंपर्क   बारसा   जेवणी   खाण जेवण कसेंय आसूं, अर्थ अपुर्वाय बरी   तकटणें   अभरवण   मिया अन बिबी, तगारी उभी   मुटमुटू   अन्नसंस्कार   चाखणें   चांचरी   चाचारी   चाचारें   चाटणें   अन्नसत्र   उपट   गोतांबील   घुडणें   चमचमाट   चाबा   कचकून   भाणें   मुटमुट   दपटणें   निखारणें   नेटणें   चाचरी   कचकावून   महामूर   अनमान   रगडून   दडपणें   रेंटणें   रेटणें   जेवण   टूक   जेवा   तकटून   उष्टा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP