Dictionaries | References

जाणें

   
Script: Devanagari

जाणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
गेला तो गेला The past is irrevocable; the gone is irrecoverable. गेलेला असणें in. con. To be in the experience of; to be seen, found, heard of, known by. Ex. हें मला गेलेलें आहे I have met with this.

जाणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To go, i.e. to proceed, travel, move on. To pass, depart from, i.e. to be lost, removed. To go by, to elapse-time. To join, to enter or be contained. To be gone, be spoiled, ruined, blasted. To proceed from, be done by;-esp. some wrong act and inadvertently. Ex. ती गोष्ट मजपासुन गेली खरी To loose its power, virtue-a limb or drug. To go out-a light. To be deducted or subtracted. To be made, given, passed-a promise, one's word.
काय जातें, गेलें (माझें, तुझें &c.)   What care (I &c.)? It's no business or concern (of mine &c.)
गेलेला असणें   To be in the experience of, to be seen, heard or known by.

जाणें     

अ.क्रि.  १ गमन करणें ; चालू लागणें ; प्रवास करणें ; पुढें सरणें ; पूर्वस्थळ सोडणें . तो या गांवातून पळून गेला . २ पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गांठणें . तो उद्यां पुण्यास जाणार आहे . २ निघून जाणें ; नाहींसे होणें , नाश पावणें ; हरवणें ; हलविलेलें असणें . या कोनाडयांतली वस्तु कधीं जात नाहीं पण आज गेली . ३ लोटणें ; क्रमणें ( वेळ ). हां हां म्हणतां वर्ष गेलें . ४ छिद्रादिकांत प्रवेश करणें ; आंत शिरणें ; समाविष्ट करणें . या दौतीचे भोकांत लेखणी जात नाहीं . ५ ( विशेषत : भूतकालांत उपयोग ) वायां जाणें ; नासणें ; निरुपयोगी , टाकाऊ होणें . खराबणें ; अयथायोग्य होणें . ही बायको चांगली पण कंबरेंत गेली . हा कसला विद्वान पण अभिमानानें गेला . ६ घडून येणें , होणें ( नजरचूक , गुन्हा , योग्य किंवा रूढ मार्गाचें उल्लंघन ) हा आंगरखा बरा उतरला पण गुंडीजवळ कांहीं गेलें रोज औषध घेत असें त्यांत एक दिवस माझे हातून गेलें , रोगानें बळ केलें . ७ एखाद्यापासून चुकून होणें , घडून येणें ( गफलतीनें एखादी चुकीची गोष्ट ). ती गोष्ट मजपासून गेली खरी . ८ वजा होणें ; शक्ति जाणें ; गुण जाणें ( इंद्रिय , औषध यांचा ) १० अनुसरणें ; पाठीमागून जाणें ; वेधणें ; अभिलषित होणें ( मन , डोळे , कान , प्रीति इ० ) ( वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग ). चांगली बायको करूं नये तिजवर लोकांची इच्छा जाते . ११ दिलें जाणें ( शब्द , वचन - भूतकाळीं उपयोग ) १२ र्‍हास , नाश होणें ; झिजणें ( शरीर ). १४ एखाद्या स्त्रीशीं रत होणें ; संभोग करणें . १५ कांहीं एक पदार्थानें विवक्षित कालपर्यंत टिकणें . याला धोतरजोडा सहा महिनेपर्यंतसुध्दां जात नाहीं . कोणत्याहि क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असतां त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो . उदा० जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन . २ सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असतां कर्मकर्तरीचा अर्थ होतो . जसें - तुला शिक्षा केली जाईल . ३ ऊनप्रत्ययांत धातुसाधिताशीं उपयोग केला असतां याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो . जसें - तळयांतील पाणी आटून गेलें . शरीर वाळून गेलें . ४ दुसर्‍या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असतां पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन , क्रियेचा जोरदारपणा सिध्द होतो . जसें - आण जा ; ठेव जा ; दे जा . कर जा इ० [ सं . या ; प्रा . जा ; फ्रेंजि . जा ; रशियन या . ] ( वाप्र . ) जाजा येये - स्त्री . निरर्थक पुन : पुन : जाणें येणें ; खेपा . माझ्यानें हें हजारदां जाजा येये करवत नाहीं . [ जाणें - येणें ] जायाचा , जायां , जायांस - प्रसंगविशेषीं उसना घेतलेला ; आपल्या हातांतून पुढें - मागें जाणारा ; दुसर्‍याचा ( कपडा , रत्नें वस्तु ). म्ह० जायाचें लेणें लाजिरवाणें . गेलामेला , गेलामेला गतला - सर्वस्वी गेला ; अजीबात , कायमचा नाहींसा झाला . ( माझें , तुझें , त्याचें इ० ) - काय जातें - गेलें ? - मला , त्याला , तुला , त्याची काय परवा , किंमत ? गेला तो मेला - गेलेलें पुन्हां भरून येत नाहीं गेलेला असणें - पाहाण्यांत , अनुभवांत , आढळण्यांत , ऐकण्यांत येणें , असणें . हें मला गेलेलें आहे . = हें मला ठाऊक आहे .
 न. १ जन्म ; जगणें . जिणें पहा . काय जीणें मारिलें दुष्ट भाजे । - चिंतामणि , ध्रुवाक्यान . १४ ( नवनीत पृ . ४१२ ). [ सं . जीव ]

जाणें     

जाजा, येथे
निरर्थक हेलपाटे
येरझारा
व्यर्थ खेपा.

Related Words

झाड्यास जाणें   फसकींत जाणें   मुंडला जाणें   फळी फोडून जाणें   अंगणीं जाणें   चोंदी देऊन जाणें   देशीं जाणें   आकारांत जाणें   अवसानांतून जाणें   बाहेर बसावयास जाणें   महालाला जाणें   लवडयावर बसून जाणें   डोला जाणें   इजीत जाणें   उचाल जाणें   अरबाण्यांतून जाणें   बाणगुप्ती जाणें   फिर्याद जाणें   मोक्षाला जाणें   पार जाणें   पश्चिम दिशेला जाणें   पांवडयावर जाणें   पांवडाखालीं जाणें   लघुशंकेस जाणें   हात धरुन जाणें   डोईवर हात ठेवून जाणें   कराळ जाणें   बाहेर जाणें   दारीं जाणें   दारीं जाणें, बसणें, लगणें   मुलखास जाणें   देवाकडे जाणें   पोकआळीस जाणें   पोकळाखालीं जाणें   हारीं जाणें   जिवानिशीं जाणें   बहिर्भूमीस जाणें   (दिवस) सुना जाणें   बुरजांत जाणें   बोळून जाणें   भराक्या सरसा जाणें   फूल झडून जाणें   नाद जाणें   नीट जाणें   वस्तर्‍या जाणें   वस्तेरां जाणें   डोळे पठारास जाणें   डोळे पाताळांत जाणें   अब्रु जाणें   एकजीव होऊन जाणें   मातींत जाणें   मुलखावर उठून जाणें   धुतलें जाणें   देवगडास जाणें   पोट भकाटीस जाणें   जन्मांतून जाणें   मूळ जाणें   मोर्चा जाणें   देशांतरीं जाणें   नाक मुठींत धरुन जाणें   परसाकडे जाणें   पोटाखालीं जाणें   ताटी कापून जाणें   अंगठयाची आग मस्तकास जाणें   अंड विसरुन सासुरवाडीस जाणें   गळी जाणें   आढळून जाणें   अजीत जाणें   अजीद जाणें   जवळ जाणें   डोळे जाणें   कपाळीं कांटी घेऊन जाणें   उठून जाणें   भागानगरास जाणें   येणें जाणें   पोट पाताळास जाणें   पर लावून जाणें   पांढरे कावळे असतील तिकडे जाणें   अभोगती जाणें   मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें   मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें   अंगावरचें जाणें   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   सांड जाणें   जन्म जाणें   चिखलांत धोंडा टाकून पलीकडे जाणें   टांगेखालून जाणें   ढेंगेखालून जाणें   कानाआड जाणें   कानाऊत जाणें   कानामागें जाणें   काय जाणें?   उच्छाल जाणें   एकीला जाणें   ओघाबरोबर जाणें   ओघाबरोबर वहात जाणें   बाजी जाणें   बेडा पार जाणें   बेहडा पार जाणें   मुठींत जाणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP