Dictionaries | References

इनाम

   
Script: Devanagari

इनाम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पुरस्कार, बख़्शीश

इनाम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय कामा खातीर दिल्लें यादस्तीक वा कसलीय भेट वस्त बी.   Ex. स्वतंत्रताय दिसाच्या दबाज्या वेळार शाळेंत इनामां वांटपाची कार्यावळ मनयली
HYPONYMY:
नोबॅल पुरस्कार अर्जुन पुरस्कार
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बक्षीस पुरस्कार
Wordnet:
asmপুৰস্কাৰ
benপুরষ্কার
gujઇનામ
hinपुरस्कार
kanಪ್ರಶಸ್ತಿ
kasاِنعام
malപുരസ്ക്കാരം
marपुरस्कार
mniꯃꯅꯥ ꯃꯊꯨꯝ
nepपुरस्कार
oriପୁରସ୍କାର
panਪੁਰਸਕਾਰ
sanपुरस्कारः
tamபரிசு
telబహుమానం
urdانعام , اکرام , ایوارڈ
noun  कोणाकूय खोशयेन दितात अशी वस्तू वा पयशे   Ex. राजान नर्तकीक मागता तें इनाम दिलें
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पुरस्कार बक्षीस
Wordnet:
asmবকচিচ
bdबान्था
benপারিতোষিক
gujઇનામ
hinबख़्शीश
kanಭಕ್ಷೀಸು
kasبَکشیٖش
malപാരിതോഷികം
marबक्षीस
oriବକସିସ୍‌
panਇਨਾਮ
tamவெகுமதி
telపారితోషకం
urdبخشش , انعام , تحفہ

इनाम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A grant in perpetuity without conditions. Now applied loosely to a grant gen.

इनाम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A grant in perpetuity without conditions. Grant,

इनाम     

ना.  इनामत , देणगी , नजराणा , बक्षीस , वृत्ती ( वंशपरंपरा चालणारी ).

इनाम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पुरस्कार, बक्षीस

इनाम     

 न. 
कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत , वंशपरंपरेची स्थावर अशी देणगी ; वृत्ति ; इनामांत पुढील प्रकार आहेत . - वतनी ( सनदी ) व गांवनिसबत . वतनींत गैरउपयोगी ( न्हावी , सुतार , चांभार , चौघुला , शेट्या , मांग , कुंभार , पोतदार , महाजन , कुडबुडे जोशी इ० ) व उपयोगी ( उपाध्याय , गुरव , गांवज्योतिषी , जंगम , काजी , मुलाणा , मुजावर इ० ) परगणे वतनदार ( देशमुख , देशपांडे , देशकुलकर्णी , नाडगौडा , नाडकर्णी , सरदेसाई , सरदेशपांडे , सरदेशमुख , सरपाटील , निरखीदार , देशगत , घाटपांडे , देसाई ), गांवनौकर ( पाटील , कुलकर्णी , मतादार , माधवी , महार , तराळ , बळीकर इ० ), क्षेत्रोपाध्ये . गांवनिसबत ( पासोडी , देवस्थान , हाडोळी , मावळी , धर्मादाय , देणगी , वतनदारी इ० ). सनदी म्हणजे सरकारी करापासून मुक्त व कायमचें दिल्याबद्दल सनद मिळतें तें . शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणार्‍या उत्पन्नांत सरकारची हिस्सेरस्सी असते ती . शिवाय अग्रहार , भाकरी , चोळीबांगडी , देवस्थान , कदीम , जदीद , जात , जुडी , कोल्हाटी , मळीकी , राजकीय , साधणूक , शेतसनदी , योगक्षेम , इसाफत , नौकरी , वतनीवजीफा , आलतमघा , इ० इ० ऐन इनामतीमध्यें ब्राह्मणांचीं अग्रहारें व बादशहाचे पीर आणि थडगीं , मशिदी आणि देवस्थानें , फकीर इनाम , मोईन , काजी - मुलाणा , फकीर - तपस्वी , अन्नछत्र वगैरे बाबी येत . - भाअ १८३३ . १३८ .
देव , ब्राह्मण वगैरेंना दिलेली भूमि वगैरे .
मालकी हक्क न देतां देणें , घेणें , खाणें , सोडणें . हा माड यानें इनाम खाल्ला . आम्ही गाईचें दूध काढीत नाहीं , वासरे इनाम पितात .
( सामा . ) कोणतेंहि बक्षीस ; नजर ; देणगी . [ अर . इनआम ]
०इक्राम  पु. भेट ; देणगी , बक्षीस , वृत्ति . - वाडसभा २ . १९६ . [ अर . ]
०इजाफत  न. देणगी वाढवून देणें ; देणगीची वाढ ; इनामांत घातलेली भर ( कांहीं कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेलें इनाम . )
०इजाफतदार वि.  इनाम इजाफत मिळालेला ; वाढलेलें इनाम उपभोगणारा .
०चिटणावळ  स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर . [ हिं . ]
०चिठ्ठी  पु. 
वेगवेगळ्या इनामांची यादी , तपशील ( जिल्ह्यातील , किंवा तालुक्यांतील ).
इनामपत्र ; इनामपट्टा , इनामखत .
०चौकशी  स्त्री. इनामपाहणी पहा .
०चौथाई  स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा ( सरकारांत भरणा करावयाचा ).
०जमीन  स्त्री. एखाद्या मोठ्या कामगिरीबद्दल सरकारांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन .
०तिजाई  स्त्री. 
इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा . हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी . - शारो ४० .
पूर्ण अथवा सर्वस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील सार्‍याचा तिसरा भाग . इदलशाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईंच नव्हती - रा ३ . ११७ . [ फा . ]
०दार  पु. इनाम धारण करणारा ; इनामी जमीनीचा मालक ; वतनदार . [ फा . इन + आम + दार ]
०नोकरी  स्त्री. गांव , महाल , परगणा यांची महसुली , फौजदारीसंबंधानें गावकी , घरकी कामें करणार्‍या गांवकामगांरांनां व परगणे अमलदारांना इनाम जें देण्यांत आलें तें ; काळीचें उत्पन्न , ( स्वामित्व नव्हे ; ) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार ; किंवा इनाम जमीन धारण करणार्‍यांना महसुलाची सर्वस्वीं अथवा अंशत : सूट देण्यांत आली ती . इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात . - प्रत्यक्ष ( दुमाला ) आणि अप्रत्यक्ष ( परभारा ). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध गांव , महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करुन देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत . दुसर्‍या प्रकारचें इनाम ऐन किंवा नक्त किंवा ऐनजिनसी असे . धारा वसूल करुन आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीनें आदा करी तिला नक्त इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती ; अथवा बाजारहाटांत विकावयास आलेल्या मालाची शेव - फसकी किंवा वाणगी घेत ती , यांना परभाराहक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात . - गागा २९ . ४० .
०पट्टी   ताजम - स्त्री . पु . इनामदारावर बसविलेली पट्टी , कर . हा कर दर तीन वर्षांनीं जेवढें उत्पन्न असेल तेवढा बसवीत , जेवढें त्या वर्षाचें उत्पन्न असेल तेवढा घेत .
०पत्र  न. इनाम दिल्यासंबंधींचें खत , सनद ; इनाम दिल्याचें राजपत्र ; सरकारनें कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत -( अ ) खुद्द इनामदारास , ( आ ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदारास , ( इ ) त्याच परगण्याच्या . देशमुख देशपांड्यास , ( ई ) इनाम असलेल्या गांवच्या पाटील - कुलकर्णी वगैरे मुकदमास .
०परभारा  पु. सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसुल करण्यांत येणारें इनाम .
०पासोडी  स्त्री. गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेनें योजावयाचा शब्द . जसें :- पाटलास पासोडीसाठीं ; कुलकर्ण्यास रुमालासाठीं , पोतदारास घोंगडीसाठीं ; महारास जोड्यासाठीं ; भटास धोतरासाठीं , वगैरे इनाम दिलेल्या जमिनीबद्दल .
०पाहणी  स्त्री. दिलेल्या इनामजमिनींची पाहणी , तपासणी .
०फैजावी  स्त्री. जमिनीवरील सरकारसार्‍याच्या एकतृतीयांशाइतका दरसाल सरकारांत करावयाचा भरणा . [ अर . ]

इनाम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पुरस्कार

Related Words

इनाम इकराम   इनाम   हक न पावे इनाम   इनाम जमीन   पुरस्कार   पुरस्कारः   പുരസ്ക്കാരം   اِنعام   బహుమానం   পুরষ্কার   ପୁରସ୍କାର   ਪੁਰਸਕਾਰ   ಪ್ರಶಸ್ತಿ   बान्था   পুৰস্কাৰ   ઇનામ   பரிசு   inam abolition   prize goods   इनामचिट्टी   बोझारा   inam title deeds   इनामताजम   इनामात   ऐममौझा   इनामपत्र   अतिय्यह   इनामती   इलाईबिघा   ऐमबाझी जमीन   पांढरी मुंड   विर्ति   अँलिनिएशन ऑफिस   कडोर   इक्‍राम   इनामचिटणावळ   इनामी   ऐमदार   मैफर्जन्दान   मोकास   इनामदार   ऐम   ऐमा   सेवकाई   इनामइजाफत   अर्पण करणे   एक करोड   बस्तनपर   बहुमोल कपडे आणि बक्षिसाचें साकडें   मुँहमाँगा   यावच्चंद्र दिवाकरौ   नोकरपण   पुरस्काराप्रीत्यर्थ दिलेली नाणी   पुस्त दर पुस्त   शिरशिला   सकरतार   सरकती   सरकत्या   कामथ   इनामतिजाई   इनामपट्टी   उज़क   बारखळी   दुदेह   मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें   मुबारक करणें   वतनदार   सीधा वारस   सीधे वारस   ससगणी   ससगाणी   अढेपारडे   अढेपारढे   खुर्दसानक   खुर्दासानक   गढ़वा   चिठ्ठ   ढिंढोरा पीटना   कारगुज़ारी   इकराम   इजाफा   इतलाख नेमणूक   इनामत   दर्याप्त   दर्याप्ती   दर्याफ्त   दर्याफ्ती   मुतैनरवा   मोकासदार   मोकासा   लँगूरी   वफ़ादारी   सानक   मुबारक   देणगी   घबुकेळ   सौभाग्यशाली   अढे पारढे   जहागीर   तवाजा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP