Dictionaries | References अ अशोग Script: Devanagari See also: अशोक Meaning अशोग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एका वृक्षाचें नांव , ह्याचीं पानें आंब्याच्या पानांपेक्षां लांब व कुरळीं असून शोभिवंत असतात ; हीं झाडें देवळांत , बगीचांत लावतात . दाह , गुल्म , उदर , विष , रक्तरोग , स्त्रियांचे प्रदर वगैरेवर औषधी म्हणून याची साल उपयोगांत आणतात . संस्कृत काव्यांतून याचा नेहमीं उल्लेख येतो . यास गरोदर स्त्रीनें लत्ताप्रहार केल्याशिवाय फुलें येत नाहींत अशी समजूत आहे .एक बौध्दकालीन मौर्यवंशीय सम्राट ( ख्रि . पू . ३७३ - २३२ ).एक अरण्य . रावणानें सीतेस अशोकवनांत राक्षसिणींच्या पाहर्यांत ठेविलें होतें . अशोकवनिकान्याय - एखादी गोष्ट करण्याचे अनेक तुल्य मार्ग असतांना त्यांपैकीं अमुकच कां स्वीकारला याचे कारण सांगतां न येणें . जसें - रावणानें सीतेला अशोक वनांत कां ठेविली तर कोठें तरी ठेवावयाची ती अशोक वनांत ठेविली . [ सं . अशोक ( अ + शुच ) हिं . अशोग . ] Related Words अशोग अशोक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP