-
न. १ घन ; ठोकळा ; २ आडपडदा . हळू हळू त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें । - तुगा ४० . - वि . १ स्थूल ; जाडगा ( तक्ता , फळी ) २ जाडेंभरडें ; खरखरीत ( कापड ). ३ दाट ; फार पातळ नसणारा ( प्रवाही पदार्थ ). ४ धट्टेकट्टें ; कणखर ( शरीर ). ५ जड ; मोठें ( ओझें ) ६ भारदस्त ; प्रौढ ; थोर ; कठिण . प्रबंध कविता जाड वचनें । - दा ११ . ६ . ८ . ७ मोठी ; भव्य ; प्रचंड . पुजा देखतां जाड जीवीं गळालों । - रामदास ( करुणाष्टक ). ८ लठ्ठ ; दांडगा ; स्थूल ( माणूस , शरीर ). ९ घट्ट ; जाडा पहा . [ सं . जड ] जाडगा , जाडगेला - वि . जाड ; लठ्ठ ; धष्टपुष्ट ; गबदुल ( मनुष्य , प्राणी ० . लेले किंवा काणे यांच्यासारखा अंमळ जाडगेला असा मासा त्यांस गावतो . - नि . १०६९
-
न. पचंग ; कांसोटा . एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथोचिधयें कासे लागे । - ज्ञा ७ . ८५ . [ ते . जाडी = वस्त्र ]
-
०सर वि. किंचित जाड
-
०सुती वि. जाडयाभरडया सुताचें , विणीचें ( कापड ). जाडा , जाडगा - वि . १ जाड पहा २ मोठा विद्वान ; प्रतिभासंपन्न ; भारदस्त ( पंडित , कविता , कल्पना , कोटी , लेख इ० ) ३ भरींव . अर्थपूर्ण . गहन . जाडाधोंगडा , जाडाभरडा - वि . १ ओबडधोबड ; खरखरीत ( वस्त्र ); भरड दळलेलें ; भरडलेलें भरभरीत ( पीठ ). जाडी - स्त्री . १ जाडपणा ; घनता . २ स्थूलता , लठ्ठपणा . ३ दाटपणा ; जाड पहा . ४ धुरीच्या पुढील चाव्हरीच्या बैलाचें जूं ; शिवाळ . जाडेंप्रकरण , जाडीप्रकरण - न . असामान्य माणूस ; वजनदार , विद्वान , श्रीमंत माणूस ; धेंड . वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्वामी त्यांच्याविषयीं कांहीं लिहून हा भाग आटपतों . - नि ३३९ .
Site Search
Input language: