Dictionaries | References

शास्त्र

ना.  धर्माने घातलेले नियम , विज्ञान , सिद्धांतमय विषय .
To be enough indeed for the supplying, serving, or fulfilling of any matter or point required by the Shástra but without excess beyond; to exist in just sufficient quantity, or to be performed with just sufficient definiteness of action, as to warrant the name or designation borne, and to preclude disallowal of its existence or its performance; to be enough to swear by. Used of articles, substances, and actions. Ex. हा आपला उगीच शास्त्रास चाकू आहे ह्यानें बोट देखील कापणार नाहीं; आज घरांत शास्त्रास साखर नाहीं मग शेरभर देऊं कुठली; शास्त्रास स्नान झालें खरें मलशुद्धि ती निराळी.
 न. १ ( दैवी ) धर्म , विधि , नियम , विद्या यासंबंधीं वचन , आज्ञा . हें ईश्वरी किंवा अपौरुषेय मानण्यांत येतें . बहुधा सामासांत उपयोग . समाशब्द - शास्त्रमर्यादा , शास्त्ररीती , शास्त्रमार्ग , शास्त्रप्रतिपादित , शास्त्राभ्यास , शास्त्रज्ञ , शास्त्रज्ञान , शास्त्रतत्त्व . २ ( समास नसतांना ) धर्म , वाङ्‍मय , विज्ञान , कला इ० संबंधीं नियम . हा अर्थ अभिप्रेत असतां बहुधा मर्यादा घालणार्‍या दुसर्‍या शब्दांस जोडून येतात . उदा० वेदांतशास्त्र , शिल्पशास्त्र , कामशास्त्र , न्यायशास्त्र , व्याकरणशास्त्र , ३ ( सामा . ) प्रबंध ; ग्रंथ . ४ नियमबध्द , सिध्दांतमय रचना असलेला विषय . [ सं . ] ( वाप्र . ) शास्त्रास , शास्त्राचा , शास्त्रापुरता , शास्त्रार्थास असणें , शास्त्रार्थास नसणें - केवळ नांवाला असणें - नसणें . हा आपला उगीच शास्त्रास चाकू आहे . ह्यानें बोट देखील कापणार नाहीं . आज घरांत शास्त्राला साखर नाहीं , मग शेरभर देऊं कुठली ? शास्त्रास स्नान झालें खरें , मुलशुध्दी ती निराळी शास्त्रांत - वि . शास्त्रांप्रमाणें ; शास्त्र धरून , अनुसरून . [ सं . ]
०दर्शि   वेत्ता विद
०प्रविण   प्रविज्ञ अभिज्ञ संपन्न - वि . शास्त्रांत निपुण , कुशल ; चांगला शास्त्री . [ सं . ]
०निंदा  स्त्री. शास्त्राची धिक्कारणी , अवमानणी , शास्त्राचा अपमान . [ सं . ]
०पाखंड  न. शास्त्राचा भलता अर्थ ; अशास्त्रीय विधान . पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड । तैसे विषयालागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती । - एभा ९ . ३५५ .
०पारंगत   सकलशास्त्रपारंगत - वि . सर्व शास्त्रविशारद ; सर्व शास्त्रांत निपुण . [ सं . ]
०बाहे वि.  शास्त्रबाह्य ; निषिध्द . आशंकेचा उपक्रम । दिवसा नाहीं लाजाहोम । शास्त्रबाहे विषम । कां पा कवि बोलिला । - सीख १० . १०८ . [ सं . शास्त्रबाह्य ]
०मर्यादा  स्त्री. शास्त्रानें घालून दिलेली , आंखून दिलेली , मर्यादा , सीमा . ( क्रि० राखणें पाळणें , धरणें , पाळणें ) [ सं . ]
०वत् वि.  शास्त्राप्रमाणें ; शास्त्रानुसार ; सशास्त्र [ सं . ]
‍ वि.  शास्त्राप्रमाणें ; शास्त्रानुसार ; सशास्त्र [ सं . ]
०व्युत्पत्ति  स्त्री. न्यायादि शास्त्रांत गति ; शास्त्र ग्रंथांतील निपुणता . पुराण सांगण्यास केवळ शास्त्रव्युत्पत्ति नको , काव्यव्युत्पत्ति असली म्हणजे झालें . [ सं . ]
०संख्याक वि.  सहा . षट्‍शास्त्रें यावरून सांकेतिक . खदिर वृक्षांचे शास्त्रसंख्याक । पळसांचे ऋषि संख्याक । ऐसियापरी सम्यक । यज्ञक्रिया अवलंबिली । - जैअ ९२ . ४९ . शास्त्रर्थ - पु . शास्त्रांतील किंवा विधिनिषेधरूप वचन , अभिप्राय , शास्त्राची सांगणी . शास्त्रांतलें वचन ; शास्त्रज्ञा . विशिष्ट बाबतींत शास्त्रानें घालून दिलेला नियम , वा दाखविलेला मार्ग . शास्त्रार्थ करणें - १ ( एखादी गोष्ट ) किंचित् ‍ नांवाला करणें ; केली न केली याप्रमाणें वागणें . शास्त्रार्थास असणें - शास्त्रास असणें पहा . शास्त्री - पु . १ शास्त्रांचा अभ्यास केलेला ; गृहस्थ ; शास्त्रवेत्ता ; पंडित . २ ज्या शास्त्राचें अध्ययन ज्यानें केलें आहे तो तच्छास्त्री . उदा० न्यायशास्त्री , धर्मशास्त्री . ३ कोणत्याहि एखाद्या शास्त्रविद्येंत निपुण असलेल्या ब्राह्मणाच्या नांवापुढील बहुमानार्थी पदवी . उदा० बाळशास्त्री , गंगाधरशास्त्री , वासुदेवशास्त्री .
०बाणा  पु. विशिष्ट धंदा किंवा व्यासंग म्हणून केल्या जाणार्‍या पुढील सहा शास्त्रीय विद्यांना योजला जाणारा शब्द , आलंकारिक , ज्योतिषी , धर्मशास्त्री , नैय्यायिक , वैद्यकी , वैय्याकरणी - बाणा . शास्त्रीय - वि . १ शास्त्रासंबंधीं ( विषय , परिभाषा , व्यवहार , ज्ञान , इ० ). २ यथाशास्त्र ; शास्त्रोक्त ; [ सं . ]
  Institutes of religion, law, or letters. Science in general. A treatise.
शास्त्रास असणें, शास्त्राचा, शास्त्रापुरतां (असणें नसणें &c.)   To exist in just sufficient quantity or to be performed with just sufficient definiteness of action, as to warrant the name or designation borne, and to preclude disallowal of its existence or its performance. Ex. हा आपला उगीच शास्त्रास चाकु आहे, ह्यानें बोट देखिल कापणार नाहीं.

Related Words

शास्त्र   शास्त्र   शास्त्र-शास्त्र बेचाळीस प्रकारें अधित   आवडतें शास्त्र   अध्यापन शास्त्र   पाक - शास्त्र   बायकांचें शास्त्र   दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें   अवडतें शास्त्र   जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्‍त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।।   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   शास्त्र (शास्त्रांत) सांगावयाचें आणि वस्त्रांत हगावयाचें   शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे   शास्त्र-शास्त्र बेचाळीस प्रकारें अधित   आवडतें शास्त्र   दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें   बायकांचें शास्त्र   अध्यापन शास्त्र   अवडतें शास्त्र   जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्‍त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।।   पाक - शास्त्र   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   शास्त्र (शास्त्रांत) सांगावयाचें आणि वस्त्रांत हगावयाचें   शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे   अध्यापन शास्त्र   अवडतें शास्त्र   आवडतें शास्त्र   जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्‍त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।।   दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें   पाक - शास्त्र   बायकांचें शास्त्र   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   शास्त्र-शास्त्र बेचाळीस प्रकारें अधित   शास्त्र (शास्त्रांत) सांगावयाचें आणि वस्त्रांत हगावयाचें   शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे   अर्थशास्त्र   कामशास्त्र   काशीनाथशास्त्री उपाध्याय   खगोलशास्त्र   तंत्र शास्त्र   नाट्यशास्त्र   नीतिशास्त्र   मंत्र शास्त्र   मन्त्र शास्त्र   यंत्र शास्त्र   योगशास्त्र   वास्तुशास्त्र   विष्णुशास्त्री वामन बापट   होराशास्त्र   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
 • कामाक्षा माँ - आरती कामाक्षा देवी की । ...
  कामरूप कामाख्या में जो देवी का सिद्ध पीठ है वह इसी सृष्टीकर्ती त्रिपुरसुंदरी का है ।
 • हठयोगप्रदीपिका
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग १
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग २
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग ३
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • भारतीय शास्त्रे
  भारतके महान, बुद्धिमान ऋषीमुनीयोंने, सृष्टीमे जो भी चमत्कार होते है, वह जाननेकी जिज्ञासा तृप्त करनेके लिये, समस्त मानवजातीको नानाविध शास्त्रोंके जन्म..
 • ज्योतिष शास्त्र
  भारतके महान, बुद्धिमान ऋषीमुनीयोंने, सृष्टीमे जो भी चमत्कार होते है, वह जाननेकी जिज्ञासा तृप्त करनेके लिये, समस्त मानवजातीको नानाविध शास्त्रोंके जन्म..
 • मंगलाचरण आणि महत्व
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • अंकसंज्ञा.
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • युगांचें प्रमाण
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • गतकलीचें प्रमाण
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • शककर्ते
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • संवत्सर
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • अयन
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • ऋतु आणि त्यांचे काल
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • महिने
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • अधिकमास आणि क्षयमास
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • पक्षविचार
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
 • तिथिप्रकरण
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .
 • वार
  ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.