TransLiteral Foundation

वेडा

Mad. 2 Doltish, foolish, idiotlike. 3 Wild, frantic, incoherent--speech, acts. 4 with g. of o. Enamoured of, transported with, mad after.
वि.  १ ज्याला वेड लागलें आहे असा ; ज्याच्या मेंदूत बिघाड झाला आहे व त्यामुळें जो भलतेसलतें बोलतो किंवा करतो तो ; खुळा ; भ्रमिष्ट . २ मूर्ख ; ज्याला व्यवहारचातुर्य नाहीं असा . ३ बेताल ; फाजील ; मूर्खपणाचें ; असंबध्द ; विसंगत ( वर्तन , भाषण इ० ). ही वेडी कल्पना तुझ्या डोक्यांत कोणी घातली . ४ आसक्त ; मोहित ; आकृष्ट झालेला . त्या गवयानें मला अगदीं वेडा करून सोडलें . ५ छांदिष्ट ; नादी ; एखाद्या गोष्टीचा ज्यानें ध्यास घेतला आहे , सारखा त्याच्या पाठीमागें आहे असा . ६ एकदम पुष्कळ कामें करावयाचीं असतां काय करावें , कसें करावें अशी मनाची भ्रांतिष्ट स्थिति झालेला ; किंकर्तव्यमूढ ; संभ्रांत झालेला . [ वेड ]
०ऊंस  पु. रानऊंस ; खुळा ऊंस . याचा औषधाकरितां उपयोग होतो . नाहिं करित कोणाची आस । औषधास वेडाऊंस साजणा । - सला ३२ .
०खुळा   पिसा - वि . वेडा , खुळा , पिसा , हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत ). जयाचें नेत्रकटाक्षें होती । वेडेपिसे देवादी ।
०गोळा वि.  अगदीं अडाणी ; मूर्ख ; वेडा . - सृपनि १३४ .
०धोतरा वि.  ( ल ) मूर्ख ; माथेफिरू ; वेडा . धोतरा पहा .
०पीर  पु. १ छांदिष्टपणें , बेताल वागणारा - बोलणारा ; आततायी मनुष्य . हा एक आपला वेडापीर आहे . जें तोंडाला येईल तें बडबडत असतो . - पिंगला . २ अजागळ ; वेडगळ माणूस ; मूर्ख मनुष्य . [ वेडा + फा . पीर ]
०बागडा वि.  १ वेडावांकडा ; अनेक ठिकाणीं वांकलेला . वाकडातिकडा . २ ( ल . ) सरळ मार्गानें न चालणारा ; लहरी ; छांदिष्ट . मी साधा आहें , मी वेडाबांगडा आहें , एवढाच कायतो माझा अपराध आहे . - भा ९५ . वेडावांकडा पहा .
०मधुरा  पु. एक प्रकारचा दोषिक ताप . यांत शीतोपचार झाला असतां वांत होऊन वेड लागल्यासारखी स्थिति होते . मधुरा पहा .
०वांकडा वि.  १ अनेक ठिकाणीं व निरनिराळया तर्‍हेनें वांकलेला ; वाकडातिकडा . २ ( ल . ) कुटिल ; वक्र ; सीधा नसलेला ; वाममार्गानें चालणारा ( माणूस ). ३ लहरी ; भ्रमिष्ट . ४ असंबध्द ; भरमसाट ; जसें आलें , सुचलें तसें - अगदीं वाईटहि नाहीं व वाखाणण्यासारखेंहि नाहीं असें ( भाषण , कृति इ० ). वेडेवांकडें गाईन । परि दास तुझा म्हणवीन । एकाद्याला वेडे वांकडें होणें - एखाद्यावर अनपेक्षित संकट येणें . एखादीचें वेडेवांकडें होणें - ( बायकी ) वैधव्य प्राप्त होणें ; संसार विसकटणें .
०विद्रा   विपारा - वि . १ वेडा आणि कुरूप ; कुरूप आणि कुस्वभावी ; भीतिदायक ; भेसूर ; हेंगाडा . मग पुरुष कसलेही वेडेविद्रे , साधेभोळे , खुळे , अजागळ असले तरी बिघडत नाहीं . - सवतीमत्सर ८३ . २ वेडावांकडा . ढोलकें पिटणार्‍याच्या भोंवती भक्तांनीं वेडयाविघ्रा उडया माराव्या . - टि ४ . ७९ . वेडी हळद - स्त्री . १ जाडया खोडाची किंवा मोठीं कुडीं असलेली हळद . २ ( ल . ) वेडदुल्ली ; खुळी ; मूर्ख ; वेडसर . ३ ( ल . ) वेडें पीक . वेडेचार वेडेचाळे - पुअव . १ वेडेपणाचीं कृत्यें ; मूर्खपणाचीं कामें . वेडेचार शिकविति बालांना । खेचुनि खेळीं । - होळीचें पद . २ वेडांतील हावभाव , चेष्टा चाळे इ० [ वेडे + आचार ] वेडें पीक - न . १ मशागतीवांचून विपुल येणारें पीक . उदा० एरंडांचें - निवडुंगाचें वेडें पीक . २ आलें तर पुष्कळ नाहींतर मुळींच नाहीं असें पीक . ३ ( सामा . ) पुष्कळ भरभराट ; फाजील पीक , उत्पादन , प्रचार इ० ४ ( ल . ) वळला तर हवें तें देईल नाहींतर एक कवडीहि न देणारा दाता ; अतिरेकी दाता ; लहरी दाता . ५ ( ल . ) क्षुल्लक कारणावरून कधीं कधीं अतिरेक , आततायीपणा करणारा पण एरवीं मोठा उपद्रव दिला तरी अगदीं शांत राहणारा मनुष्य . ६ ( ल . ) छांदिष्ट वर्तन ; हास्यकारक वर्तणूक ; वेडेचार . वेडें भाग्य - न . नादान , नालायक , कर्तृत्वशून्य माणसाला प्राप्त झालेलें भाग्य ; शिक्षण , शहाणपण किंवा योग्यता हीं कांहींहि नसतां आलेलें भाग्य वेडेवेडे चार - पुअव . छांदिष्टपणाचीं कृत्यें ; वेडयासारखें आचरण ; खुळेपणाचीं कृत्यें . वेडेंज्ञान - न . चळ ; खूळ ; पिसें ; मूर्खपणा . वेडयांचा बाजार - पु . विचार न करतां एखाद्या गोष्टीच्या नादीं लागणार्‍या , कांहीं तरी करणार्‍या लोकांचा जमाव ; मूर्ख माणसांची टोळी . ( क्रि० भरणें ) वेडथर वेडदुल्ली वेडधुल्ली - वि . वेडगळ पहा . जा , वेडदुल्ली , तुला काय समजतें ? - बाळ २ . १८४ . [ वेडा + थर , दुल्ला ] वेडपा - वि . वेडगळ पहा . वेडबंब वेडबंबू - वि . वेडा ; मूर्ख . वेडवणें वेडावणें - अक्रि . १ मूर्ख किंवा वेडा होणें ; खुळावणें . २ वांकुल्या दाखविणें . ३ जड होणें ; मुकी ; स्तब्ध होणें ( वाणी ); वेडावेलचि रसना , नकरी सिंहापुढें शिवा चाळा । - मोकर्ण २८ . ८१ . - दावि १३ . वेडाळणें - अक्रि . १ वेडें होणें ; खुळावणें . सिंहावलोंकनें पडताळितां ग्रंथ । अविवेकी तेथें वेडाळूं लागत । - मुआदि १ . ९८ . वेडावणें - न . ( अव . वेडावणीं ) वांकुल्या दाखविणें ; चिडविणें . वेडावणें - उक्रि . १ वेडविणें ; मोह पाडणें ; एखाद्या गोष्टीच्या भरीं भरणें . तिनें आमच्या तरुण विद्वानांस इतकें वेडावून टाकलें आहे कीं घरांत शुध्द मराठी बोलण्याची मारामार . - नि ५ . वेडाळ वेडाळया - वि . वेडा ; अर्धवट ; मूर्ख ; वेडसर . वेडाळवाणी - विक्रिवि . वेडाळ पहा . वेडयासारखें ( बोलणें , करणें इ० ). सकळ राजसदनींचीं माणसें । वेडाळवाणी बोलती त्यास । - नव १८ . ५३ . [ वेडाळ + वाणी = सारखें ] वेडीव - स्त्री . ( काव्य ) वेडेपणा ; अजाणपणा ; नेणीव . - ज्ञा १३ . १९० . वायां वेडीव घेइजे चतुरें । शास्त्रास वाखाणिजे शस्त्रधरें । - मुसभा ७ . ६९ .
  Mad; foolish. Frantic. Enamoured of.

Related Words

वेडा   वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्‍यानें पहावें   वेखंड-वेडा वाणी वेखंडाचा पसारा   वेडा झाला व कामांतून गेला   वेडा विद्रा   वेडा बागडा   वेडा वाणी वेखंडाचा पसारा   वेडा-वेडा पाऊस   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   वेडा पीर   वेडा मधुरा   व्याध-व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो   वेडा ऊस   बहु घेतो तो वेडा नसतो   वेडा वांकडा   वेडा खुळा   मूर्ख-मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   वेडा धोतरा   जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो   बहु घेतो तो वेडा नसतो   मूर्ख-मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा   वेखंड-वेडा वाणी वेखंडाचा पसारा   वेडा झाला व कामांतून गेला   वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्‍यानें पहावें   वेडा-वेडा पाऊस   वेडा वाणी वेखंडाचा पसारा   व्याध-व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

fill up bynomination

 • नामनिर्देशन करून भरणे 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

जीवाच्या बारा दशा कोणत्या?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.