Dictionaries | References

विषय

. Ex. शरीर जों रोगविषय झालें नाहीं तों पथ्यापथ्यविचार ही तुम्हास मस्करीशी वाटती; कामाचा वि0 स्त्री; मोहाचा वि0 पुत्र; लोभाचा वि0 वित्त; क्रोधाचा वि0; हर्षाचा वि0; दंडाचा वि0. In this sense are many valuable compounds; as विवादविषय, व्याख्याषय, गायनविषय, लेखनविषय, गमनविषय, विचारविषय, धर्मविषय, ज्ञातिविषय, हास्यविषय, काम- विषय, संकल्पविषय, विधिविषय, निषेधविषय. 3 The office, function, peculiar or proper business of. Ex. बोलणें हा वागिंद्रियाचा वि0; मामलत करणें हा भिक्षुकाचा वि0 नव्हे; रफू करणें तर बारीक सुई घ्या हा दाभणाचा वि0 नव्हे. 4 Object, aim, the point or matter attempted or contemplated. Ex. तुम्ही जो हा उद्योग करितां ह्याचा वि0 कोण? 5 A subject, topic, general head, particular branch, class, division. Ex. शब्दसाधनरूपविषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें. 6 Goods or things considered as identical with or convertible into money, matter, moneysworth. Ex. भटजी बावांस केवळ रोख शंभर रुपये पोहंचत नाहींत परंतु सारे वर्षांत शंभर रुपयांचा वि0 पोंहचतो Old भटजी does not indeed get a hundred rupees down on the nail, but, in the course of the year, he makes the matter of it Sir. विषयांतरसंचाररहित Exempt from the intrusion of any other object or matter;--used of the mind, the attention &c.
 पु. १ इंद्रियें किंवा मन यांस गोचर वस्तु ; ज्ञानाच्या कोणत्याहि साधनानें माहीत होणारी गोष्ट . ( याअर्थी सामासांत ) विषयभोग , विषयत्याग , विषयासक्ति , विषयाभिरुचि , विषयसेवा - सेवन - प्रीति - तिरस्कार - संबंध - कथन - निंदा - ज्ञान - सुख - दुःख . २ एखाद्या क्रियेचा कर्ता अथवा कार्य ; एखादा विकार अथवा भावनेशीं संबध्द गोष्ट ; ( कर्ता , करण , शक्ति , अथवा कार्याचा ) प्रदेश , टप्पा , आटोका , स्थान वगैरे . उदा० कामाचा विषय स्त्री ; मोहाचा विषय पुत्र ; लोभाचा विषय वित्त ; रोगाचा विषय शरीर ; तसेंच क्रोध , हर्ष , दंड इत्यादींचा विषय . ( याअर्थी सामासांत ) विवाद - व्याख्या - गायन - लेखन - गमन - विचार - धर्म - ज्ञाति - हास्य - काम - संकल्प - विधि - निषेध - विषय . निजस्मृतिस जाहलीं विषय तीं तव श्रीपदें - केका ८ . ३ कार्य ; कर्तव्य ; कार्यक्षेत्र ; अधिकार ; व्यवसाय ; योग्य धंदा , काम . उदा० बोलणें हा वागिंद्रियाचा विषय ; मामलत करणें हा भिक्षुकाचा विषय नव्हे ; रफू करणें हा दाभणाचा विषय नव्हे . ४ उद्देश ; हेतु ; ध्येय ; मनांतील गोष्ट . तुम्ही जो हा उद्योग करीत आहां याचा विषय कोण ? ५ मुद्दा ; प्रकरण ; बाब ; संबंध . शब्द साधनरूप विषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें . ६ द्रव्य ; ऐवज ; माल . त्यास सार्‍या वर्षांत शंभर रुपयांचा विषय पोंचतो . ७ महत्व ; पर्वा ; दरकार . स्वामीचा आशीर्वाद असतां इतरांचा विषय मानीत नाहीं . - रा ३ . ३२४ . ८ कामेच्छा . जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंगसानें । - ज्ञा १६ . २५३ . रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती । - केका ४३ . [ सं . ]
०द्वार  न. इंद्रिय . बहु हीं दुस्तर विषयद्वारें । - तुगा १८७४ .
०नियामक  स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी , निश्चित करणारी , निवडणारी मंडळी .
समिति  स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी , निश्चित करणारी , निवडणारी मंडळी .
०पंचक  न. पांच इंद्रियांचे शब्द , स्पर्श , रूप , रस , गंध हे पांच विषय . शब्दस्परुषरूपरसगंध । ऐसें हें विषय पंचक । - दा १७ . ८ . १४ .
०बध्द वि.  इंद्रिय विषय लोलुप ; कामी ; भोगी ; आसक्त . ( याचअर्थी सामासांत ) विषय - तत्पर - लंपट - लीन - लुब्ध - वश - दास - आसक्त - आधीन - आविष्ट - अंध .
०भोगोडा  पु. विषयाचा उपभोग विषयभोगोडा करावया । - दावि ४१ .
०वासना  स्त्री. भोगेच्छा ; इंद्रियसुखेच्छा ; ऐहिक वस्तूंच्या उपभोगाची इच्छा . विषयवासना नावडो
०विरक्त वि.  ऐहिक भोगांस विटलेला ; भोगांचा त्याग केलेला .
०व्यापार  पु. व्यवहार ; धंदा ; ऐहिक व्यवसाय ; सुखसाधनांचें संपादन . विषयव्यापारीं सदा सादर । आपपर नावडे त्या ।
०सुख  न. इंद्रियजन्यसुख ; रतिसुख ; सृष्टींतील निरनिराळया भोगांपासून निरनिराळया इंद्रियांस मिळणारा आनंद . विषयाचरण - न . इंद्रियभोग ; विषयोपभोग . पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता । - ज्ञा ३ . २०१ . विषयानंद - पु . भोगसुख ; निरनिराळया पदार्थांच्या उपभोगापासून मिळणारें सुख . विषयोपभोग - पु . भोग्य वस्तूंचें सेवन ; इंद्रियांस सुख देणार्‍या वस्तूंचें सेवन . विषयी - वि . १ विषयासक्त ; भोगसुखास लालचावलेला ; कामी ; गोडघाश्या . जरी विषयीं विषयो सांडिजेल । - ज्ञा ५ . १२५ . २ इंद्रियांस अगोचर वस्तूंचें अस्तित्व न मानणारा . ३ ज्या गोष्टीचें एखादी वस्तु कार्य अथवा कर्ता असतो ती ( गोष्ट ). विषयीकरण - न . इंद्रियांकडून स्वविषयाचें ग्रहण ; इंद्रियाकडून त्या विषयाचें ज्ञान होणें . विषयीं - शअ . संबंधीं ; संबंधानें ; बद्दल ; धरून ; अनुसरून ; अनुलक्षून . पूर्वी षष्ठयंत नामापुढें लावीत हल्लीं सामान्यरूप करून जोडतात . उदा० घराचेविषयीं , युध्दाचेविषयीं = घराविषयीं , युध्दाविषयीं . [ विषयसप्तमी ] विषी , विषीं - शअ . विषयीं पहा . अगा आत्मजेच्या विषी । जिवु जैसा निरभिलाषी । - ज्ञा १२ . १३२ . विषो - पु . विषय पहा . अमाइक तंव नव्हसी । कवणा ही विषो । - अमृ २ . ३६ .
 m  An object of sense or the mind. The office or function of; object. A subject. Goods or things. The object of any passion. Affection.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.