Dictionaries | References

लेप

See also:  लेंप
3 Materials to be smeared over. 4 Boiled rice, bread, or other thing considered as खरकटें.
lēpa m The name of a fish of a black back and white belly, found in creeks and inlets. It is a species of sole.
 पु. खाडीमध्ये सांपडणार्‍या काळ्या पाठीचा व पांढर्‍या पोटाचा एक मासा .
पुन . आंथरण्यापांघरण्याच्या उपयोगी असे कापूस भरुन केलेले वस्त्र ; रजई ; दुलई . लेपडी , लेंपडी - स्त्री . बसण्याची किंवा अंथरावयाची दुलई ; आंथरण्याची लहान गादी . लेपडीची टोपी - स्त्री . लेपाची खोळ ( चहादाणीतील चहा थंड होऊं नये म्हणून त्यावर घालण्याची ). लेपड , लेंपड - न . हलक्या जातीचा लेप ; बारीकसा व वाईट असा लेप .
 पु. 
सारवण ; माखण .
अंगाला लावण्याची चंदन इ० ची उटी .
चुना , चिखल इ० ची भिंत इ० वर केलेला गिलावा .
भिंत इ० वरील रंगाने किंवा चुना इ० नी काढलेले किंवा लिंपलेले चित्र . निर्जीव लेपे हार गिळिला । - शनि ३६५ . लेपाचां देउळी न बैसावे । - सूत्रपाठ ४० .
भात , भाजी इ० चा हात , भांडे इ० ना चिकटून राहिलेला अंश ; खरकटे .
बाधा ; दोष ; विटाळ ; मळ ; बाह्यात्काराची संलग्नता . जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगति जेथ । - ज्ञा २ . २३६ .
रंग , वरचा रंग , मुलामा . ते आनंदचित्रीचे लेप । - ज्ञा ६ . २५६ .
ओढा ; सारवण ; ओढा घालण्याचे द्रव्य ; दुःखणारे किंवा ठणकणारे गात्र इ० वर झाडाची पाने इ० चा बांधण्याचा ठेंचा . [ सं . लिप = लिपणे ; लावणे ] लेपटणे , लेपणे - सक्रि .
लेप देणे ; माखणे ; ओढा घालणे .
लिंपणे ; लिंपून आकृती तयार करणे . तेथे हंसमयूर कोकिळा । नाना प्रकारचे लेपिले । - शनि १३२ .
एखाद्या पदार्थाचा दुसर्‍यास लेप लागणे ; दोष लागणे ; स्पर्श होणे . विहित भंगाचा कर्दम । तुज लेपला नाही की । - मुसभा ३ . ४ . लेपन - न .
ओढा घालणे ; लिंपणे ; लेप देणे .
लेप देण्याचा पदार्थ . लेपवणी - न .
खरकटी भांडी , हात इ० धुतलेले अन्नांशयुक्त पाणी .
( कु . ) गुरांना द्यावयाचे पाणी ; पेज वगैरे मिश्रित कदान्न . लेपवळ - न . ( राजा ) खरकटे ; जेवण झाल्यानंतर ताटांत राहिलेले अन्नाचे अवशेष ; खरकट्याचा पसारा . लेपाटा - पु . औषध , चिखल इ० चा वेडावांकडा व जाडा लेप ; ओढा . ( क्रि० लावणे ; देणे ). लेपाळणे - सक्रि . लेप लावणे ; माखणे . लेपाळा - पु . भांडी , हात इ० वर तेल , तूप इ० चा जमलेला थर . ( क्रि० बसणे ; लागणे ; जमणे ; दाटणे ). - वि . देण्यास योग्य ; लिंपण्याजोगा ; लेप देण्यास जरुर असलेला . लेप्य - न . चित्र . जैसे सप्तरंग भरोनि जाण । लेप्य काढिले चितार्‍याने । - कथासारामृत ७ . ४२ . - वि . लिंपलेला ; लिंपून तयार केलेला . लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसि करावे ना स्नान । इतरां मूर्तीसि स्नपन । यथाविधान करावे । - एभा २७ . १२२ .
 m  Plastering. Materials to be smeared over.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP