TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

तरंग

ना.  नवी कल्पना , लहर , क्षणिक विचार ;
ना.  कोशेटा , कोशेरा , तवंग ;
ना.  ऊर्मी , लहानशी लाट .
 पु. १ पाण्याची लाट , लहर , खळबळ ऊर्मि . पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । - ज्ञा १५ . ५०६ . उदकावरील तरंग । तरंग उदकाचे अंग । - तुगा ३७६९ . २ ( ल . ) अनियंत्रितपणाने मनांत एकामागून एक उद्भवणार्‍या विचारांपैकी प्रत्येक ; क्षणिक विचार ; नवी कल्पना ; लहर . ३ दृष्टि अस्पष्ट करणारा , डोळ्यावर येणारा साका , पटल . ५ जलतरंग पहा . ६ . बुडबुडा ; फुगा . [ सं . ]
 न. १ ( गो . कु . ) देवळांतील देवतेच्या चिन्हाचा खांब , गुढी . २ अंगांत देव संचारणार्‍याने हातांत घ्यावयाची काठी ; धार्मिक समारंभातील एक उपकरण ; हे मुसळासारखे असून त्यावर देवांची चित्रे काढलेली असतात . काही सणांत याच्या शेंड्यास बरीच लुगडी नेसवून तो नाचवितात . नाचविल्यावर अवसर येतो . तरंग घेण्याचा मान ठराविक कुटुंबाकडे असतो . आम्ही गावकर लोकांनी नारळ फोडल्याविना देवीपुढे तरंग उभं राहतं तर पहा ? - सह्याद्री ९२ .
काष्ठतरंग , घंटातरंग घुंगरुतरंग , जलतरंग , नसतरंग , बासतरंग , बुजबुलतरंग , लोहतरंग , स्तंभतरंग इ . वाघें . निरनिराळ्या पदार्थावर अगर वस्तुंवर आघात वगैरे करुन स्वरसप्तक बसवून निरनिराळे राग वाजविणे .
तरंग उठणें
पाण्यात लाटा उत्‍पन्न होऊन पाणी वरखाली होते त्‍याप्रमाणें परिस्‍थितीत बदल वरचेवर होत जाणें
चांगले वाईट दिवस येणें
आयुष्‍यात चढउताराचे प्रसंग येणें. ‘हे राजकारण आहे. असे तरंग किती उठतील. दिल विकल्‍यास पुढे कसे कराल?’ -हब ५५.
 m  A whim. A wave. A film. A bubble.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चेहेळणें

  • चेहळणें पहा . 
RANDOM WORD

Did you know?

I need something, but I cant find it or is it not there?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site