Dictionaries | References

उघडा


  Open, uncovered. Clear. Naked. Public.
डी-डें
उघडा करणें
१. निराश्रित करणें
आधार काढून घेणें. २. चव्हाट्यावर आणणें
जाहीर करणें
उघडकीस आणणें.
वि.  
मोकळा ; खुला ; न झांकलेला ; अनाच्छादित .
स्पष्ट ; प्रगट ; व्यक्त ; विशद ; आविर्भूत ; स्वत : सिध्द ; ढळढळीत , गुढ ; गुप्त नव्हे असा .
लोकविख्यात ; प्रसिध्द ; महशूर ; जगजाहीर , सर्व लोकांस माहित असणारा .
ज्यास सांभाळ करणारा कोणी नाहीं असा ( पोर , राज्य इ० ); आईबाप मेल्यापासून हें पोर उघडें पडलें आहे . अरक्षित ; निराश्रित ( स्थळ , प्रदेश , माणूस ). ( क्रि० पडणें ).
मोकळी ; स्वच्छ ( हवा ).
अंगांत कपडा न घातलेला ; नग्न ( कमरेच्या वर ); पोशाख नसलेला ; फक्त धोतर नेसलेला ; केवळ मध्यवेष्टित . वार्‍यांत अंगणांत उघडा हिंडूं नको . म्ह० नागड्यापाशीं उघडा ( किंवा उघड्यापाशीं नागडा ) गेला सारी रात्र हिंवानें मेला .
सबंध नग्न ; नागवा ; अगदीं वस्त्रहीन . बा ! ढळतां तिळहि पदर भावी व्यजनासि साग रामा जी । ती खळसभेंत उघडी पडत्ये न पडोनि सागरामाजीं । - मोसभा ५ . ७७ .
अनाच्छादित ; बोडका ; बुच्चा ; ओका .
निर्भीड ; स्वैर ; दाही दिशा मोकळ्या असलेला .
०करणें   
निराश्रित करणें .
उघडा पाडणें पहा .
०पडणें   निराश्रित , अनाथ होणें . अर्थातच हरणाबाई आपल्या दोन मुलींसह उघडी पडली . - स्वप ६५ .
०पाडणें   उघड्यावर आणणें - निंदेस , उपहासास पात्र करणें ; एखाद्यास चवाठ्यावर आणणें ; गुप्त गोष्ट फोडणें , जाहीर करणें ; बोभाटा करणें . उघड्या डोळ्यांनीं - जाणून बुजून ; कळून सवरुन . म्ह०
उघड्या डोळ्यांनीं करावें आणि डोळे मिटून भरावें .
उघड्या डोळ्यांनीं प्राण जात नाहीं = भलतीच गोष्ट आपल्या देखत घडत असतां तिचा प्रतिकार केल्यावांचून आपणास राहवत नाहीं .
०नागडा   धोत बंब बागडा बाघडा वागड वाघड सोट - वि .
वस्त्रहीन ; नग्न ; अंगावर मुळींच कांहीं नसलेला .
आडोसा नसलेली ( जागा ).
आच्छादनरहित ; न झांकलेला ( पदार्थ , अन्न ).
०बोडका वि.  
अंगांत व डोक्याला कांहीं न घातलेला .
निराश्रित ; निराधार .
कुटुंब , काळजी , धंदा नसलेला ; घरदार नसलेला ; ना घर ना दार असा .
०बाळसंतोष  पु. फटिंग ; सडा .
०माथा  पु. 
धाक , लाज नाहीं असा मनुष्य ; नि : शंक , निर्भय , निर्भीड माणूस ( चांगल्या व वाईट अर्थी ). आम्ही पिढीचे भिक्षुक , आम्हास प्रतिग्रह घेण्याविषयीं उघडा माथा आहे .
( ल . ) दोषविमोचन , निरसन ; उजळमाथा - तोंड असणें ; निरपराधित्व ; आरोपनिराकारण . ( होणें ) (
बोल , निंदा , दोष , ठपका यांपासून अलिप्तता , मुक्तता . ( असणें ) कसबिणीनें शिदळकी केली तर तिला कोण विचारतो , मूळचाच तिचा उघडा माथा .
०माथ्यानें   क्रिवि . न कचरतां ; न लाजतां ; धीटपणानें .
०हिशोब  पु. सरळ , स्वच्छ हिशेब ; लवकर समजणारा हिशेब ; पाहिल्याबरोबर डोळयांत भरणारा , पटणारा जमाखर्च .
Open, uncovered, unclosed. 2 Clear, plain, apparent, manifest, evident. 3 Open, exposed, unprotected, unsheltered--a territory, a place. 4 Notorious, popular, public. 5 Fair--weather. 6 Naked, i. e. naked from the waist upwards, or having covering only over the pudenda. Pr. नागव्यापासीं उ0 गेला सारे रात्र हिंवानें मेला. 7 Naked, bare, bald, void, offensively plain. उ0 पाडणें To lay open to censure or ridicule; to expose. 2 To blazon abroad; to divulge.
वि.  अनाच्छादित , अनावृत , खुला , न झाकलेले ;
वि.  अनाथ , पोरका ;
वि.  नग्न , नागवा ;
वि.  मोकळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP