Dictionaries | References

आल

from the roots of which a red color is extracted for staining leather, dyeing silks &c.
वि.  ( गो . )
 स्त्री. एक झाड ; याच्या मुळ्यांपासून व सालीपासून तांबडा रंग काढून त्याचा कातडें , रेशीम वगैरे रंगविण्याकडे उपयोग करतात . यास सुरंगी असेंहि म्हणतात . याचीं पानें मोहाच्या पानासारखीं व फुलें पांढुरक्या रंगाचीं असून तीं बारमहा येतात . याचीं फळें लोणच्यांत घालतात . याची लागवड वर्‍हाड - खानदेशांत फार होते . रंगाच्या उपयोगी झाड होण्यास तीन वर्षे लागतात . मुळ्यांपासून पक्का तांबडा रंग होतो . त्याचा सतरंज्या , पासोड्या रंगविण्याच्या कामीं उपयोग होतो . वर्‍हाडांत आल नांवाचे वृक्ष आहेत त्यांच्या मुळ्यापासून तांबडा रंग करतात . आलवण म्हणजे आल वृक्षापासून जो तांबडा रंग निघतो त्यानें रंगविलेलें कापड . अलवन पहा . [ सं . आलक्तक ; हिं . आल ; अर . अलवन ]
कोंवळा . नाल मात्सो आल आस = नारळ थोडा कोंवळा आहे .
मूर्ख ; खुळा . [ सं . आर्द्र ; म . ओला तुल० प्रा . आल = कोमल ]
 f  A tree from the root of which a red color is obtained.

Related Words

आल   आल   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP