मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


वेदवादरतो न स्यान्न पाषण्डी न हैतुकः ।

शुष्कवादविवादे न कञ्चित्पक्षं समाश्रयेत् ॥३०॥

धरोनियां मीमांसकमत । कर्मकांडींचे शास्त्रार्थ ।

नानावाद कर्मार्थ । न करी निश्चित निजबोधें ॥४॥

तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क ।

हेही वाद करीना देख । निजात्मसूख जो जाणे ॥५॥

बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । भीतरीं विषयवासना उदंड ।

ऐसे महावादी प्रचंड । अतर्क `पाखंड' त्या नाव ॥६॥

नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार ।

तो केवळ पाखंडी नर । उदरंभर दुःशील ॥७॥

ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ ।

न लगे असत्याचा समूळ मळ । नित्य निर्मळ निजबोधें ॥८॥

`शुष्कवाद' ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।

होय नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥९॥

ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न पाहे निजज्ञाता ।

मा स्वयें करील ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥२१०॥

होतां शास्त्रार्थमहावाद । देतां युक्तीचे प्रतिबाध ।

तेथ न करी पक्षपात शुद्ध । जाणे परी शब्द बोलेना ॥११॥

श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध । होतां देखे अतिवाद ।

स्वयें जाणे शास्त्रार्थ शुद्ध । परी पक्षपात करीना ॥१२॥

वाग्वादीं बोलतां जाण । दुखवेल पुढिलांचें मन ।

कां क्षोभेल स्वांतःकरण । यालागीं वचन बोलेना ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP