मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


पुत्रग्रामव्रजान् सार्थान् भिक्षार्थं प्रविशंश्चरेत् ।

पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥२४॥

पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र ।

सप्त पुर्‍या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥१५०॥

कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी ।

गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥५१॥

कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा ।

यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥५२॥

ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री ।

गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥५३॥

हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी ।

निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥५४॥

दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन ।

इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥५५॥

च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामन‍आश्रमोत्तम ।

यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥५६॥

ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन ।

मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥५७॥

हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातें `पुर' म्हणती नरोत्तम ।

हाटहाटवटियाहीन तो `ग्राम' । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥५८॥

गायीगौळियांचें निवासस्थान । `व्रत' त्यातें म्हणती जाण ।

`सार्थ' म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥५९॥

पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य जाणें ।

तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP