मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन् वर्षास्वासारषाड्वले ।

आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत् ॥४॥

उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं ।

पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥२५॥

माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं ।

तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥२६॥

आलिया हेमंतऋतूसी । आकंठमग्न जळावासी ।

जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥२७॥

हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं ।

वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP