मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम् ।

गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम् ॥४३॥

गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जप तप ।

उभय शौचांचें स्वरूप । अतिसाटोप करावें ॥१८॥

पोटींची सांडूनि कुसमुस । यथालाभें अतिसंतोष ।

परोपकारीं अतिहव्यास । सुहृद सर्वांस स्वात्मत्वें ॥१९॥

गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन ।

मुख्यत्वें करावें माझें भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥३२०॥

सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यांसी हाचि स्वधर्म जाण ।

सांडोनि विषयाचें भान । माझें भजन करावें ॥२१॥

करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती ।

तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP