TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
कर्तव्यविधि

धर्मसिंधु - कर्तव्यविधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कर्तव्यविधि

आता ब्राह्मणास वमन झाले असता कर्तव्यविधि सांगतो - पिता इत्यादिक ब्राह्मणास लौकिक अग्नि स्थापन करून आज्यभागापर्यंत चरूच्या निर्वापाने कर्म करून नामगोत्रपूर्वक अग्नीत पितरांचे आवाहन करावे. विश्वेदेवाकडच्या ब्राह्मणास वांति झाली असेल तर देवाचे आवाहन करावे. नंतर पूजा करून देवतोद्देशाने अन्नत्याग करून 'प्राणायस्वाहा' इत्यादि मंत्रांनी ३२ आहुतींनी हवन करावे किंवा पुनः श्राद्ध करावे. असे दोन पक्ष आहेत. दोन्हीपक्षी 'इंद्रायसाम' या सूक्ताचा जप नित्य आहे. आता दोन पक्षांची व्यवस्था सांगतो. वैश्वदेवाकडच्या ब्राह्मणास वांति झाली असता होमच करावा. पुनः श्राद्ध करू नये. पितराकडच्या ब्राह्मणास पिंडदानानंतर वांति झाली असता होमच करावा, पुनः श्राद्ध करू नये;. पिंडदानापूर्वी पितरांकडच्या ब्राह्मणास वांति झाल्यास त्या दिवशी उपवास करून दुसर्‍या दिवशी पुनः श्राद्ध करावे. हा निर्णय सपिंडीकर, महैकोद्दिष्ट, मासिक, आब्दिक व प्रतिसांवत्सरिक श्राद्धाविषयीच जाणावा. दर्शादिक श्राद्धी वांति झाल्यास त्याच दिवशी आमाने श्राद्ध करावे. अष्टका, अन्वष्टका व पूर्वेद्युः श्राद्ध याविषयीही असाच निर्णय जाणावा. त्यातही साग्निक ऋग्वेदी यास आमश्राद्धात व्यतिषंगादि व्यथोक्त प्रयोगाचा असंभव असल्याने सांकल्पिक विधीने दर्श, अष्टका, अन्वष्टका, पूर्वेद्युः श्राद्ध ही आमाने करावी किंवा त्या त्या श्राद्धलोपाचे प्रायश्चित्त निबंधात सांगितलेले करावे, असे वाटते. वृद्धिश्राद्ध, पिंडरहित संक्रात्यादि श्राद्ध व नित्यश्राद्ध यात वांति झाली असता आवृत्तिच करावी. तीर्थश्राद्ध असेल तर दर्शाप्रमाणे आमान्नानेच करावे. महालयश्राद्धी पार्वणस्थानीच्या ब्राह्मणास वांति झाल्यास श्राद्धाची पुनरावृत्ति करावी. एकोद्दिष्ट स्थानीच्या ब्राह्मणास वांति झाल्यास होमच करावा, असे वाटते. देवाकडच्या ब्राह्मणास वांति झाल्यास सर्व श्राद्धात होमच करावा, असे पूर्वी सांगितलेच आहे. होमपक्षी व पुनः श्राद्ध करावे या पक्षी सर्वत्र सूक्ताचा जप नित्य आहे, असेही सांगितले आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-30T00:40:58.3370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नग

  • पु. १ पर्वत . २ झाड ; वृक्ष . जयावरी होय निगा नगांची । सदैव विश्रांति खगामृगांची । - र ५२ . दशस्यंदनाते म्हणे प्राण जातां । नगी पैल ते कावडी तातमाता । - मुरामा बाल १ . २० . ३ अरण्य . करी तशा घोर नगी तपाला । - नरहरि गंगारत्नमाला ५६ . ( नवनीत पृ . ४२२ ). [ सं . नग ; न + गम = जाणे ] नगाधिप , नगाधिराज - पु . पर्वतश्रेष्ठ हिमालय . [ नग + सं . अरि = शत्रु ] नगारिशत्रु - पु . इंद्राचा शत्रु , इंद्रजित ; वृत्रासुर . 
  • पु. कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण . हे २४ पौंडांचा एक मण याप्रमाणे आठ मणांचे असते . 
  • क्रि. ( कुण . माण . ) नको पहा . नग नग पळून जाऊं तु नारी । - मृ ८ . नग , नग , तुझा हुद्दाबिद्दा मला काय बी नग . - बाय २ . २ . [ सं . नकि ( वर्जनेनिपातः )- नगि - नग . - भाअ १८३४ ] 
  • पु. १ डोईत घालण्याचा स्त्रियांचा एक दागिना . - शाको . वेणीचे जे नग सर्वही करीन । नको धरुं सीण मनी कांही । - तुगा २९५९ . २ ( सामा . ) रत्न ; दागिना ; अलंकार . नग पाहतां जैसे सुवर्ण । तैसा त्रिजगद्रूप मी नारायण । - ह १६ . १५९ . रडतां काढिले पांच सात नग । वस्त्राखंडी मग बांधीले म्यां । - मोसीतागीत ५७ . ( नवनीत पृ . २५८ ) ३ ( वस्तु , उपकरणे इ० कांची मोजदाद करताना ) वस्तु ; डाग ; रकम ; जिन्नस . सरी , पाटल्या वगैरे मिळून सर्व १० नग आहेत . ४ लेखनांत हत्तींच्या संख्येचा निर्देश करतांना संख्यावाचक शब्दापूर्वी योजावयाचा शब्द . जसेः - हत्ती नग दहा . ५ अंगठीत बसविलेला हिरा , खडा . चोज काय भुवनत्रय पोटी । वाहसी नग तसा नग बोटी । - र ५९ . ६ कच्च्या रेशमाची लड . याच्या उलट कंकरी . नगास नग देणे - एका जिन्नसाबद्दल दुसरा ( कसाहि ) जिन्नस देणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.