मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १३४ - १३५

क्रीडा खंड - अध्याय १३४ - १३५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

इंद्रसभेमध्यें कीं, नामें क्रौंचाख्य एक गायक तो ।

मुनिवर्य वामदेवा, लत्ता लागे चुकून तो उठतो ॥१॥

क्रौंचास शाप देती, भीषण मूषक त्वरीत तूं होईं ।

झाली मूषकशापें, पाराशर आश्रमांत तो जाई ॥२॥

खाउन वस्तू त्यांच्या, नाशी मूषक बहूत पीडा दे ।

स्मरती मुनी प्रभूला, वदती मूषक बहूत पीडा दे ॥३॥

प्रभुंनीं परिसुन आज्ञा, मूषकहननास पाश टाकियला ।

पाशें दुःखित होउन, प्रभुसी आर्तस्वरें तिथें वदला ॥४॥

प्रभु मूषकास म्हणती, वर मागें तूं त्वरीत मजपाशीं ।

गर्वित मूषक वदला, नच मागें मी वरास तुजपाशीं ॥५॥

मूषक वदे प्रभूला, वर मागें तूं त्वरीत ये समयीं ।

गर्विंत वाणी ऐकुन, म्हणती वाहन मदीय तूं होईं ॥६॥

बोलुन पृष्ठीं बैसे, भारानें दीन होत मूषक कीं ।

त्या दिवसापासुन तो, वाहन झाला सुवृत्त हें ऐकीं ॥७॥

याविषयीं दुसरीही, गोष्ट असे ती तुम्हांस कथिं व्यासा ।

शांतपणें ऐकावी, कथिति विधि भूपती तुम्ही परिसा ॥८॥

प्राचीन काळीं होते, मुनि नामे सौभरी मुनी श्रेष्ठ ।

नाम मनोमयि साध्वी, रुपीं सुंदर बहूत गुण इष्ट ॥९॥

एके समयीं मुनि ते, जाती वनिं चित्त शांत होण्यास ।

ऐशा वेळीं येई, नामें क्रौंचाख्य एक सदनास ॥१०॥

मुनिपत्‍नि त्यास दिसली, कामातुर होउनी धरी हस्त ।

पतिआज्ञेवांचुन ती, शाप न देतांसुबोध करि मस्त ॥११॥

इतुक्यामध्यें तेथें, सौभरि येती प्रकार तो बघत ।

क्रोधित मुनी झाले ते, भाकी करुणा क्षमा करा वदत ॥१२॥

सौभरि वदती शापा, मी नसतांना सतीस धरिलेंसी ।

नीचा सत्वर मूषक, जन्मा येशी घरोघरीं फिरसी ॥१३॥

चौर्ये उदर भरावें, शापित नाहीं सुभाग्य हें समज ।

झाला मूषक मग तो, पाराशर आश्रमीं पडे सहज ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP