मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
श्रीगणेशपुराणमाहात्म्य

क्रीडा खंड - श्रीगणेशपुराणमाहात्म्य

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

शौनक ऋषि-वृंदाला, कथिते झाले पुराण सुत सारें ।

नंतर कथिती त्याचे, श्रवणाचें तें महत्त्व मधु सारें ॥१॥

गणपतिपुराण श्रवि जो, ऐकावर्तन अनेक आवृत्ती ।

वा मनुज मुक्त होतो, जननें मरणें सुचक्र आवृत्ती ॥२॥

नभ मास शुद्धचौथी, तद्दिनिं मृण्मय करुन गणपतिची ।

मूर्ती स्थापना करुनी, पूजा करणें यथाविधी त्याची ॥३॥

त्या मूर्तीच्या सन्मुख, बैसुन वाचन करा पुराणाचें ।

मुदित गजानन होउन, इच्छित हेतू सुपूर्ण करि त्याचें ॥४॥

नंतर मुनिगण पुसती, कथितां आपण तयापरी कवणा ।

झाली फलप्राप्ती ती, कथणें आम्हां करा तुम्ही करुणा ॥५॥

मूक सुताला घेउन, गेले मुनि नाम त्यांस लोभेश ।

होते विधीकडे ते, म्हणती श्रविं मी पुराण गूणेश ॥६॥

विधिंनीं पुराण कथिलें, ऐके लोमेश आणि तो मूक ।

ऐके भक्तिपुरःसर, गुरुपरि वक्ता त्वरीत हो मूक ॥७।

इक्ष्वाकु-कुलामाजी, भूपति झाला सुकर्म आचरणीं ।

संतति नाहीं म्हणुनी, श्रवण करी हें पुराण मुकवाणी ॥८॥

झाला पुत्र तयाला, तैशी होती तदीय हो भगिनी ।

तिजला सुपुत्र नातू, इत्यादी जाहलेच हें श्रवुनी ॥९॥

सगराच्या पुत्रांतिल, पुत्र असे एक पांगुळा साचा ।

लोमेश-मुखीं ऐके, पुराण सारें सुपाद हो त्याचा ॥१०॥

अठरा पुराण श्रवणा, पासुन जें प्राप्त होय श्रोत्यांस ।

तें फल या श्रवणानें, मिळतें सत्वर महत्त्व हें यास ॥११॥

श्रोते वक्ते दोनी, होती निष्पाप सांगती सूत ।

शौनक मुनिगण सारे, ऐकुन झाले त्वरीत ते पूत ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP