TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

नागनाथ माहात्म्य - करुणाष्टक

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


करुणाष्टक

श्रीनागनाथा कर ठेवि माथा ।

संसार व्याधी निरसी समर्था ।

तू थोर दाता या मृत्युलोकी ।

कृपाकटाक्षे मज आवलोकी ॥१॥

मी मागतो तुज एक दान ।

त्वरे निवारी भवदुष्टस्वप्न ।

उदार राजा शिव सिद्धनाथा ।

कृपानिधी तारक तारि आता ॥२॥

नको विचारु गुणदोष माझे ।

शरणागताचे तू घेशि ओझे ।

सांभाळ बापा आपुल्या ब्रिदासी ।

चिंतीतसे मी तुझिया पदासी ॥३॥

मी थोर कृतघ्न मोठा ।

पादारविन्दी न घडेचि निष्ठा ।

हे एक ठायी मन ठेवि देवा ।

ऐक्य करी सत्वर जीवशीवा ॥४॥

तपतीर्थ नेम ।

त्रिसंध्या विधियुक्त कर्म ।

वैराग्य देही अणुमात्र नाही ।

भावार्थ भक्ती न घडेचि काही ॥५॥

अपराधी अपराधराशी ।

समासमुद्रा मज मोक्ष देशी ।

बद्धत्वतेचा भ्रम हारवीसी ।

विकर्म इंधन ज्ञाननळेचि नाशी ॥६॥

तापवीरा गुरु आवतारा ।

जडजीव नामस्मरचेचि तारा ।

अज्ञान ज्ञान निरसूनि दोनी ।

विज्ञानबोध परवस्तुदानी

गुरु सिद्ध तू फणीन्द्रा

तू दाविसी खेचरी सिद्ध मुद्रा ।

शीघ्रासन घालुनी बैसवीला ।

म्हणे सिद्धलिंग हे दाखविले मजला ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-27T14:09:57.8970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जबर

  • स्त्री. धाक ; शासन . ' त्याजकडील लोग असतीलव ते तमाम जबर पोचवून .' - शारो १ . ११६ . ( जरबद्दल चुकीचें वाचन ) 
  • पु. ( पत्यांचा खेळ ) डाव्या हातचा भिडू , खेळणारा . 
  • स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द - 
  • ०जंग पु. लहान तोफ . - वि . शूर ; जवानमर्द ; लढवय्या . [ अर . जब्र + फा - जंग ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.