TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पहिला

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पहिला

श्री गणेशाय नमः ॥ श्री सद्‌गुरु नागनाथाय नमः ॥

नमो अनादि आदि नागेशा । त्रैलोक्य विलासी महापुरुषा । पुरवी अज्ञानमनोआशा ॥

प्रार्थना ही निज गणेशा ऐका सहजी ॥१॥

जय जय संकट हरणा ॥ परमात्मया सिंहासना ॥

बैसवी मजलागि या दिना ॥ सोहं स्वामी ॥२॥

अनादि भ्रम कोहं पोटी ॥ श्रमलो शिवसांब जगजेठी ॥

लक्ष चौर्‍यांशी योनि कोटी ॥ एक एक फेरा ॥३॥

नाना योनि नरक संकट ॥ जिवासी बहुत जाहले कष्ट ॥ तेणे कासाविस घनदाट ॥ नरक कोटी ॥४॥

हे सुख दुःख न बोलवे मज ॥ कैसे आहे ठाऊक तुज ॥ या लागी धावा करी काज ॥ येऊनिया ॥५॥

चुकोनि वेढोनिया धीवरी ॥ संकट ऐसे कळे अंतरी ॥ धाव पावगा त्रिपुरारी ॥ कर्पूर गौरा हरहरा ॥६॥

हरी हो संकट हरा ॥ म्हणोनि पार्थितो दातारा ॥ माझी इच्छा पुरी करा ॥ दाता स्वामी स्वअंगे ॥७॥

स्वांग निर्दाळीन ॥ तुझे नाम मदन दहन ॥ जाहलो अभिमान हीन ॥ बहु दीन संकटी ॥८॥

तू भूतांचा राजा ॥ म्हणोनि पतित नाम गर्जा ॥ एक अनेका माजा ॥ बाळ राजा कनवाळु ॥९॥

महद्भुती देवे ॥ भूतातची खावे ॥ आपण वेगळे राहावे ॥ नवल ठेव श्रीसांबा ॥१०॥

श्री सांब नाम दयाळ ॥ तोडी तोडी हे संकट सकळ ॥ ऐसे हे देही परब्रह्म केवळ ॥ अंग संग सदाकरी ॥११॥

सदा करीन तुझे भजन ॥ अखंड संतमूर्ति पूजन ॥ परि माझे संकट हरण ॥ सांगेन पुढलीया प्रसंगी ॥१२॥

तुम्ही समर्थ मूर्तिमंत ॥ ह्रदयी असोनिया न कळत ॥ प्रगटोनी अभय हस्त ॥ ठेवोनि माथा वर देई ॥१३॥

इति श्री संकटहरणी शिवग्रंथ ॥ भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावध चित्त । प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-27T13:26:14.4670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विधि

  • पु. १ नियम ; शास्त्राची आज्ञा ; वेदविहित क्रिया , कर्म वगैरे . विधीतें पाळित । निषेधातें गाळित । - ज्ञा १२ . ७७ . २ पध्दति ; कर्म करण्याची रीत ; धार्मिक कृत्याचा प्रयोग . उदा० उद्यापनविधि ; उपासनाविधि ; दानविधि ; स्नानविधि ; होमविधि ; व्रतविधि ; पूजाविधि . क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती । - ज्ञा २ . २४९ . ३ सामान्यतः नियम ; आज्ञा ; विधान ; अनुशासन ; आदेश ; कल्प . विधि हाचि मान्य आहे । - मोआदि ४ . १४ . ४ दैव ; प्रारब्ध ; नशीब . स्थिर न राहे माझी बुध्दि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया । - कथा ६ . १९ . १५९ . ५ ब्रह्मदेव ; सृष्टिकर्ता . तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें । - वामन स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १४१ ). अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी । - केका १४० . ६ शास्त्रवचन ; धर्मग्रंथातील वाक्य , आधार ; प्रमाण . ७ तर्‍हा ; प्रकार ; रीत . गर्‍हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी । - तुगा ६२५ . लिहिल्या विधे येईन मी त्वरें । - होला ३४ . ८ योजना ; क्रिया . कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि । - एरुस्व ३ . ४३ . [ सं . विध् ‍ = विधान करणें ] 
  • ०अंड न. ब्रह्मांड ; विश्व ; भूगोल . तडतडि विधिअंड त्रास दे ... - वामनसीता स्वयंवर . [ विधि + अंड ] 
  • ०किकर पु. कर्मांचा दास . मग विधिकिंकर तो नव्हे । - यथादी ३ . २२९९ . 
  • ०दृष्ट वि. वेदविहित ; शास्त्रोक्त ; साधार ; सप्रमाण . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

GAJA LAXMI VRAT MHANJE KAY AANI TE KASE KARAYACHE?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.