नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग तिसरा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गुरु नागनाथाय नमः । जय जयाजी योगी शिरोमणी ।

तुझी बोलो योग हरणी ।

जेणे पावेल उन्मनी ।

का स्मशानी अखंड लोळे ॥१॥

नवनिधी असोनी गाठी । का त्वा लाविली लंगोटी ।

जनमान घेवोनी सृष्टी । कुबेर धटी का लोंबविली ॥२॥

रिद्धि सिद्धि कुमंडला । ओढावया शाल दुशाला ।

असोनी का गज चर्म लेयाला । भुकेलासीदारोदारी ॥३॥

गळा घालावया चंद्रहार । मोहनमाळा मुक्तावर ।

असोनीगळा मानवशीर । हाती खापरकासया ॥४॥

पलंग न्याहळी समया । रत्‍न जडित सिंहासन राया ।

असोनी राखे लोळावया । हरुष कागा ॥५॥

भोजनासी मिष्टान्न । तरी का सत्रावी अमृतपान ।

भाजा दोघी अंगवण । सांडुनी भोगणे उन्मदरसा ॥६॥

आपण तो योगी शिराणा । थोरला देव पळाला राणा ।

येर ते गेले राना । घरमाना पुढे नाही ॥७॥

येराची काय सांगू कथा ।

धीर धरु आवाका सांडी चित्ता ।

तू जाहलासी पळता । महा संकट आता ।

कायसे आम्हा ॥८॥

तू म्हणसी काय संकट । प्रत्यक्ष पळाला नीलकंठ ।

म्हणोनी दाटला माजा कंठ । परते संकट हरहरा ॥९॥

हर हे योगेश्वरी । अघटीत माया जोगेश्वरी ।

तू जाणता इचीपरी । एक छत्री सांडून पळाला ॥१०॥

म्हणोनी उत्कंठा माझिया मना ।

धावपाव गा कैलासराणा ।

पुढिलीया प्रसंगी पंचवदना ।

सगुण ध्याना अगम्य हरा ॥११॥

इति श्रीसंकट हरणी शिव ग्रंथ ।

भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावध चित्ता । प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP