TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
नांदी श्राद्ध

नांदी श्राद्ध

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


नांदी श्राद्ध

नांदी श्राद्ध विचार

कोणत्याही शांतीकार्यात किंवा संस्कार कार्यात नांदीश्राद्ध करणे आवश्यक आहे. हे श्राद्ध नेहमीच्या वर्ष श्राद्धाप्रमाणे नसून हे शुभ श्राद्ध मानले गेलेले आहे. या श्राद्धाद्वारे आपल्या दिवंगत आई वडील व आजी आजोबांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते व आशीर्वाद घेतले जातात. त्यामुळे यजमानाचे आई वडील व आजी आजोबा हयात असतील तर त्यांचे नांदीश्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु यापैकी जे कोणी हयात नसतील त्यांचे नांदी श्राद्ध करणे आवश्यक आहे. नांदी श्राद्धामध्ये त्यांचेच पार्वण म्हणावेत.

नांदी श्राद्धाची तयारी

नांदी श्राद्धासाठी फक्त यजमानानेच बसावे. हातातील दर्भाचे पवित्र काढून ठेवावे. हातात दूर्वांचे पवित्र घालावयास द्यावे. दोन ताम्हणे किंवा पात्रे घ्यावीत. पहिल्या मंत्रानंतर पहिल्या हातावरून पाणी सोडावे. पुढील मंत्रांसाठी दुसर्‍या पात्रात पाणी सोडावे.

नांदी श्राद्धम्

मंत्र १ (पहिले पात्र) सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र २ (आई) (दुसरे पात्र ) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः पाद्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ३ (वडील ) पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ४ (सपत्‍नीक मातामह) मातामह मातुः पितामह मातुः प्रपितामहाः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः पाद्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

या नंतर प्रत्येक मंत्रासाठी हातात गंध-अक्षता घेऊन वरील प्रमाणे त्या त्या पात्रात हातावर पाणी घेऊन सोडावे.

मंत्र १ - (पहिले पात्र) सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र २ (दुसरे पात्र ) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ३ पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ४ मातामह मातुः पितामह मातुः प्रपितामहाः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः आसन गंधादि उपचार कल्पनं नमः । नम इयं च वृद्धिः ।

पुढील प्रत्येक प्रयोगानंतर दोन नाणी हातावर पाणी घेऊन पात्रात सोडावीत.

मंत्र १ - (पहिले पात्र) गौर्यादि षोडश मातरः ब्राम्ह्यादि सप्त मतरश्च गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वास्तोष्पतिं च इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त

अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र २ - सत्य वसुसंज्ञका विश्वेदेवाः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ३ - (दुसरे पात्र) मातृपितामही प्रपितामह्यः नांदीमुख्यः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ४ - पितृपितामह प्रपितामहाः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः । नम इयं च वृद्धिः ।

मंत्र ५ - मातामह मातुः पितामह पातुः प्रपितामहः पत्‍नीसहिताः नांदीमुखाः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्न स्थाने किंचित व्यावहारिक द्रव्यं नमः ।

नम इयं च वृद्धिः ।

स्त्रुवाक्षमाला करक पुस्तकाढ्यं चतुर्भुजम् । प्रजापतिं हंसयान मेकवक्त्रं नमामि तं । कृतस्य नांदीश्राद्धस्य प्रतिष्ठा फल सिद्ध्यर्थं

द्राक्षामलकनिष्क्रयिणीं दक्षिणां दातुमहमुत्सृजे न मम ।

दोन नाणी हातावर पाणी घेऊन पात्रात सोडावीत.

मातापिता महीचैव तथैव प्रपितामही । पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः । मातामहस्तत्पिता च प्रमाता महकादयः । एते भवंतु सुप्रीताः प्रयच्छंतु च मंगलम् ।

यथाचारं हिरण्येन भांडवादनम् ।

हातात दोन नाणी घेऊन पात्रास वाजवून पाण्यासह पात्रात सोडावीत.

अनेन नांदी श्राद्धेन नांदीमुख देवताः प्रीयंताम् वृद्धिः ।

हातावरून पात्रातील सर्व पाणी दूर्वांसह ताम्हनात सोडून द्यावे. दुसरे चांगले पाणी पात्रात घ्यावे, आचमन करावे व

डोळ्यांना तसेच पायाच्या दोन्ही अंगठ्यांना पाणी लावावे. दर्भाचे पवित्र हातात पुन्हा घालावे.

यानंतर आचार्य वरण करावे.

आचार्य वरणानंतर स्थापित देवतांचे विसर्जन करावे.

यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् । इष्ट कामं प्रसिद्‌ध्यर्थं पुनरागमनायच । आवाहित देवतां विसर्जयामि ।

असे म्हणून गणपति, वरुण व मातृकांचे अक्षता टाकून विसर्जन करावे. यानंतर यजमान पतिपत्‍नीस घरचा आहेर करण्यास सांगावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T21:03:19.0300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

philosophical classification

  • तत्त्वज्ञानात्मक वर्गीकरण 
  • (also called knowledge classification) 
RANDOM WORD

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.