मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४७

वेदस्तुति - श्लोक ४७

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


इत्याद्यमॄषिमानन्य तच्छिष्यांश्च महात्मना: ॥
ततोऽगादाश्रमं  साक्षात्पितुद्वैपायनस्य मे ॥४७॥

॥ टीका ॥
या कारणें तो आद्य ऋषी ॥
नारायणाख्य भक्तिविशेषीं ॥
नमस्कारुनि नम्रशीर्षीं ॥
जो अनेक शिष्यीं परिवॄत्त ॥९३॥
तयां शिष्यांसिही अभिवंदन ॥
महामना नारद जाण ॥
जयाचें मन ब्रह्यसंपन्न ॥
महद्विशेषण यास्तव त्या ॥९४॥
ऎसा नारदमुनि महामन ॥
त्यानंतरें तदाज्ञा घेऊन ॥
साक्षात् मम पिता द्वैपायन ॥
सत्यवतीनंदन श्रीव्यास ॥९५॥
तयाचिया आश्रमाप्रति ॥
जाता झालाअ सहजस्थिति ॥
स्मरत होत्साता आपुले चित्तीं ॥
नारायणोक्ति यथाश्रुत ॥९६॥
येथ बोलिला शुक आपण ॥
कीं साक्षात् मम पिता द्वैपायन ॥
हें ऐकोनि शंकायमान ॥
श्रोते विचक्षण जरी होती ॥९७॥
सापत्नविकल्पास्तव माता ॥
वदिजे साक्षाच्छब्दें तत्त्वता ॥
परंतु पितयासी ऎसें सर्वथा ॥
गमे कथितां विपरीत ॥९८॥
तरी साक्षात्पदें करुनि अर्थ ॥
जैसा बोलती विपश्चित ॥
तो कथिजेल यथास्थित ॥
श्रीधरोक्त व्याख्यानें ॥९९॥
कोणे ऎके समयीं व्यास ॥
करीत असतां अग्निमंथनास ॥
अरणींमाजीं कांहीं रेतांश ॥
पडिला तयास निर्मिथिलें ॥१४००॥
तेथ तत्काळचि श्रीशुक ॥
उत्पन्न झाला निष्टंक ॥
योनिव्यवधानां रहित सम्यक ॥
म्हणोनि साक्षाज्जनक व्यासची ॥१॥
इतरांची जैसी उत्पत्ति ॥
पितॄरेत मातृयोनीप्रति ॥
पडतां मिळे तच्छोणितीं ॥
मग धातुमिश्रितीं पिण्ड घडे ॥२॥
तो नवमास मातृजठरीं ॥
सावयव पक्क जालिया वरी ॥
जनन पावतसे निर्धारीं ॥
म्हणोनि उभयजन्यत्व तयासी ॥३॥
तैसा नोहे शुकप्रकार ॥
केवळ पितॄरेतेंचि पवित्र ॥
अरणींपासूनि जाला स्वतंत्र ॥
यास्तव अरणीपुत्र वदंती ॥४॥
या अर्थें साक्षात् मम पिता ॥
श्रीशुक बोलिला तत्त्वता ॥
यावरी ऎका तदुक्त वार्ता ॥
जे नॄपासि आतां बोलतसे ॥५॥
म्हणे अगा ये परीक्षिति ॥ ।
नारद मत्पत्राश्रमाप्रति ॥
गेलिया तेणें जया रीती ॥
सोपस्करिला तें ऐक ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP