मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २३

वेदस्तुति - श्लोक २३

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजो ह्रदि यन्मुनय उपासते तदरयोऽपिययु: स्मरणात् ॥
स्त्रिय उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियो वयमपि ते समा: समदृशोंऽध्रिसरोजसुधा: ॥२३॥ (१०)

॥ टीका ॥
दमें रोधूनि करणवर्ग ॥
शमें करिती वासनात्याग ॥
अवलंबूनि प्रणवमार्ग ॥
साधिती सांग प्राणजय ॥६६॥
पवनजयें रोधे मन ॥
तैं तें होय कल्पनाविहीन ॥
ऎसे योगाभ्यासीं प्रविण ॥
दृढ मुनिजन जे ध्याती ॥६७॥
ते सन्मात्रोपासक ॥
म्हणोनि पावती अक्षयसुख ॥
द्वेष्टे द्वेषिती जरी सम्यक ॥
तरी त्यां चित्सुख सद्‍द्वेषें ॥६८॥
स्पर्शमणि पूजितां भावें ॥
अष्ट लोहाचीं पात्रें सर्वें ॥
होय हेमचि आघवें ॥
स्पर्शगौरवें सन्मात्रें ॥६९॥
द्वेषीं यवनीं फ़ोडितां घनें ॥
तें तो घनाचें करी सोनें ॥
सन्मात्रवस्तु स्वमहिमानें ॥
चित्सुखविणें आन नेदी ॥७०॥
किंवा सन्मात्रविग्रहधारी ॥
पाहोनि सकाम भुलल्या नारी ॥
बाहु भुजगेन्द्रवर्ष्मासरी ॥
देखोनि अंतरी प्रविषक्ता ॥७१॥
जरी त्या सन्मात्रसगुणा तूतें ॥
सकाम-प्रेमें भलल्या चित्तें ॥
तथापि वास्तव चित्खुखातें ॥
भोगिती निस्तें सभ्दजनें ॥७२॥
तैशाचि आम्ही तुज तत्वता ॥
केवळ श्रुतिरुपी देवता ॥
वास्तवनिर्गुणबोधें भजतां ॥
पदाब्ज माथां धरीतसो ॥७३॥
तस्मात् वास्तवसन्मात्रगुणें ॥
द्वेषें प्रेमें स्मरणें ध्यानें ॥
अभेद तव प्राप्ति पावणें ॥
असभ्दजनें दलर्भ ते ॥७४॥
मनासहित परतल्या वाचा ॥
न पावोनि अवबोध ज्याचा ॥
तेथ प्रवेश आणिकांचा ॥
होईल कैंचा जाणावया ॥७५॥
साक्षाद्वेत्ता कोण तया ॥
कीं वक्ता समर्थ बोलावया ॥
येथ कोठूनि सृष्टी इया ॥
स्थूळसूक्ष्मा इत्यादि ॥७६॥
ज्याहूनि अर्बाकू देवताचक्र ॥
जें कां सृष्टिसर्ज्जनपर ॥
ज्यापासूनि हें समग्र ॥
होतें झालें स्थूळ सूक्ष्म ॥७७॥
स्यातें जाणता त्याहूनि कोण ॥
असावा तत्पूर्वीं विद्यमान ॥
तरी हें परब्रह्य निर्गुण ॥
एक म्हणोन निगमोक्ति ॥७८॥
तेथ कैंचा तया पूर्वीं ॥
अर्वाक् ब्रह्यादि स्थावरीं सर्वीं ॥
ज्याहूनि होईजे ऎसी पदवी ॥
श्रुति गौरवीं वाखाणे ॥७९॥
जें कां वास्तव असंग एक ॥
निष्कंप अचंचल निष्टंक ॥
मनाहूनियां जवीन देख ॥
विरोधवाक्य हें न माना ॥८०॥
कल्पनेसरिसें मन वावडे ॥
तंव वास्तव स्वरुप त्याहुनि पुढें ॥
तैं मनाहूनियां जवीन घडे ॥
ऎसें उघडें जाणों ये ॥८१॥
मॄगजळ सांडूनि सूर्यरश्मी ॥
पुढें जाईल कवणिये भूमि ॥
तैसे ज्यावरी ब्रह्यादि आम्ही ॥
विविधा नामीं वैवर्ती ॥८२॥
यालागीं देव अर्वाचीन ॥
पावूं न शकती जयांचें वयुन ॥
सर्वापूर्वीं विद्यमान ॥
जें सनातन सन्मात्र ॥८३॥
चंद्रसूर्य तारा पवन ॥
इत्यादि जे जे धावमान ॥
त्या सर्वाचें अतित्र्कमण ॥
करुन वर्ते सर्वत्र ॥८४॥
सर्वांचें जें बीज आप ॥
तैसाचि वायु प्राणरुप ॥
ज्यावरी भासोनि ज्यामाजि अल्प ॥
वर्ते आकल्पपर्यत ॥८५॥
इत्यादि वदे श्रुतींचा निकर ॥
भगवत्तत्व दुर्र्ज्ञेयतर ॥
कोणी जाणों न शकती अवर ॥
ऎसा निर्धार करुनियां ॥८६॥
अव्यभिचारीए भगवभ्दक्ति ॥
अंगीकारुनि श्रुति वदती ॥
तो इत्यर्थ आर्षश्रुति ॥
श्रीशुक सुमती बोलतसे ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP