मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १७

वेदस्तुति - श्लोक १७

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


दॄतय इव श्र्वसंत्यसुभॄतो यदि तेऽनुविधा महदहमादयोंऽडमसॄकजन्यदनुग्रहत: ॥
पुरुषविधोऽन्वयोऽत्र चरमोऽन्नमयादिषु य: सदसत: परं त्वमथ यदेष्ववशेषमृतम् ॥१७॥

॥ टीका ॥ ईशावास्योपनिषच्छुति ॥
हरिगुणविमुखां अभक्तां प्रति ॥
नरदेह पडता होय जे गति ॥
कधि ते श्रोतीं परिसावी ॥४८॥
सूर्यप्रकाशरहित लोक ॥
केवळ असूर्यनामक ॥
अंधतम जो अज्ञानपंक ॥
केवळ अविवेक गाढमूढ ॥४९॥
भजनविमुख त्या लोकांप्रति ॥
मेलियानंतर वसती जाति ॥
आकल्प जेथें अनिर्गति ॥
आत्महंते म्हणोनि त्यां ॥५०॥
ऎसा अनेक श्रुतिसमुदाय ॥
भजनविमुखां बोधी भय ॥
ये श्रुत्यर्थीं तो अन्वय ॥
शुकाचार्य निरुपी ॥५१॥
असुभृत म्हणिजे सप्राण नर ॥
जरी त्या तव भजनीं अनुसर ॥
स्वरुपनिष्ठता अति सादर ॥
अथवा तत्पर गुणश्रवणीं ॥५२॥
अनेक जन्म भोगिले कष्ट ॥
भाग्यें नरदेह लाधलें श्रेष्ठ ॥
येथें होऊनि भजननिष्ठ ॥
करिती यथेष्ठ परिचर्या ॥५३॥
व्यतिरेकान्वयें ओतप्रोत ॥
बॄहद्‍ब्रह्याचि सदोदित ॥
गुरुमुखें विवरुनि नित्यानित्य ॥
मिथ्या विवर्त अवगमिती ॥५४॥
ब्रह्यात्मबोधें आत्माराम ॥
होवोनि ठेले पूर्ण काम ॥
ज्यांच्या दर्शनेंचि भवभ्रम ॥
निरसे दुर्गम अबळांचा ॥५५॥
एक ते सगुणा तव परिचर्या ॥
करिती नियमूनि वाड्‍:मन:काया ॥
तव-गुण श्रवणें कथनें माया ॥
निस्तरोनियां समरसती ॥५६॥
यदर्थी राया भगवद्वचन ॥
सगुण-भक्तीं कॄतप्रमाण ॥
भीष्मपर्वी स्वमुखें कॄष्ण ॥
पार्थालागून जें वदला ॥५७॥
संमति: ॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ॥
मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरंति ते ॥१॥
॥ टीका ॥ हरि म्हणे मो धनंजया ॥
दैवी हे जे माझी माया ॥ त्रिगुणद्वासंत्रिजगा यया ॥
प्रसवोनियां भवीं बुडवी ॥५८॥
रजोगुणें सृजि सकळ ॥
सत्वें करीत प्रतिपाळ ॥
पुढती पाहोनि प्रळयवेळ ॥
ग्रासी तत्काळ तमोगुणें ॥५९॥
गुणमयी ऎसी प्रसवोनि गुणां ॥
गोविलें प्रसना अवना सॄजना ॥
तिहीं सृजिल्या त्रिविधा जना ॥
भवनिस्तरणा अनुपाय ॥६०॥
अनिष्ट-इष्ट-मिश्र त्रिविध ॥
प्राणी करुनि कर्मबध्द ॥
विषयभ्रमें भवविरुध्द ॥
प्रियतम भानूनि निमज्जती ॥६१॥
दीप कवळूनि पतंग जळती ॥
विषयभ्रमें तैसिया रीती ॥
प्राणीमात्र दु:खावर्ती ॥
न निस्तरती दुरत्ययीं ॥६२॥
यज्ञादि इष्टकमैं स्वर्ग ॥
भोगूं जातां अमर भोग ॥
पुण्यक्षयीं अधोमार्ग ॥
लाहती मग मनुजत्व ॥६३॥
मिश्रकर्मैं मनुज भवनीं ॥
दु:ख भोगिती सुख मानूनी ॥
अनिष्ट कर्मैं तिर्यग्योनी ॥
भोगजाचणी अनिवार ॥६४॥
ऎसे मायाप्रवाही पडिले ॥
प्राणीमात्र भवीं बुढाले ॥
त्यांमाजी प्रेमळ जे मज भजले ॥
ते निस्तरले मम माया ॥६५॥
जरी दुस्तर हे गुणमरी ॥
तरी मभ्दक्तातें कांहीं ॥
बुडवूं न शके कालत्रयीं ॥
जाण निश्र्वयीं धंनजया ॥६६॥
ऎसी संमत श्रुती तें स्मॄति ॥
तस्मात् तव गाती पढती ॥
किंवा निर्गुणी व्यतिरेक गति ॥
जे समरसती ते धन्य ॥६७॥
तस्मात् त्यांचेचि धन्य जीवित ॥
सफ़ळ त्यांचेचि प्राणश्र्वसित ॥
अभक्तांचे भस्त्रावत ॥
वॄथा श्र्वसित श्रुति वदती ॥६८॥
यदर्थीं श्रुति शंका करिती ॥
जे अभक्तहि कामादि फ़ळें वारिती ॥
तरी हे प्राकॄत वॄथा वदंती ॥
कॄतघ्नाप्रति वैफ़ल्यें ॥६९॥
अभक्त कॄतघ्न कोण्या गुणें ॥
तरी कार्यकारणानुग्रहपणें ॥
जीवनहेतु त्या तुजकारणें ॥
न भजति म्हाणोनि कॄतघ्न ते ॥७०॥
यास्तव त्यांचे मनोरथ ॥
निष्फ़ळ ऎसिया आशयें येथ ॥
कार्यकारणानुग्रहकार्थ ॥
प्रतिपादिति प्रभूचे ॥७१॥
अव्यक्त महत् अहंकार ॥
आदिकरुनि तरवें समग्र ॥
ज्याच्या अनुग्रहें होती सधर ॥
अंड पटुतर सॄजावया ॥७२॥
अनुग्रह म्हणिजे अनुप्रवेशें ॥
महदादितत्वीं सामर्थ्य ऎसें ॥
समष्टिव्यष्टि मठघटदशे ॥
सॄजनावेशें प्रवर्तती ॥७३॥
तेथ अन्नमयादिकोशपंचकीं ॥
तत्तदाकार होवोनि शेखीं ॥
चेतवितोसी त्या तुज मूर्खीं ॥
न भजोनि वरिली कॄतघ्नता ॥७४॥
चिदेकरस जो परम पुरुष ॥
तयासी अन्नमयादि कोशविशेष ॥
तदाकारतेचा संस्पर्श ॥
भारतीस केंवि वदवे ॥७५॥
यदर्थी श्रुति परिहार करी ॥
अन्नमयादि कोशान्तरीं ॥
अन्वयें तदाकारता खरी ॥
न सरे दुसरी येथ युक्ति ॥७६॥
पुढती शंका करुनि वदे ॥
पंचकोशाकारता नांदे ॥
तैं सत्यत्व अंसगत्व शब्दें ॥
कैसेनि वेदें प्रशंसिजे ॥७७॥
ये शंकेचिया परिहारा ॥
वाक्य श्रुतींचें अवधारा ॥
अन्नमयादि कोशां समग्रां- ॥
पासूनि परतरा असंगत्व ॥७८॥
अन्नादि पंचकोशाहूनि पर ॥
चरम ब्रह्यपुच्छ हा उच्चार ॥
सत्यत्व असंगत्व हा निर्धार ॥
केला साचार तिये पदीं ॥७९॥
ब्रह्यपुच्छप्रतिष्ठा इति ॥
सन्मात्र बोधें वदती श्रुति ॥
तो तूं परमात्मा चिन्मूर्ती ॥
पुन्हा यदर्थीं करी शंका ॥८०॥
ब्रह्यपुच्छप्रतिष्टा मात्र ॥
सत्यत्व असंगत्व-पर ॥
तथापि अन्नयादिकोशाकार ॥
तेथ व्यभिचार झाला कीं ॥८१॥
अन्नमयादिकांच्या ठायीं ॥
तदाकारान्वितत्वें पाहीं ॥
झालिया मग कैसें काई ॥
असंगत्व घडेल ॥८२॥
ये शंकेच्या परिहारा ॥ पंचकोशांहूनि परा ॥
ब्रह्यपुच्छ हे श्रुतींची गिरा ॥
प्रतिष्ठा ह्यणोनि प्रतिपादी ॥८३॥
सदसत:पर म्हणोनि ॥
अवशेष ऋत-सत्य ऎसी वाणी ॥
स्थूलसूक्ष्मादि कोशांहूनि ॥
व्यतिरेक साक्षीभूतत्वें ॥८४॥
अवशेष म्हणिजे अवशिष्यमाण ॥
स्थूकसूक्ष्माहूनि विलक्षण ॥
अबाधित जें उरलें जाणं ॥
तें स्वरुप पूर्ण ॠतसत्य ॥८५॥
तरी किमर्थ अन्वित झालें म्हणता ॥
शाखचंद्रापरी तत्वता ॥
शुध्द स्वरुप प्रबोधार्था ॥
अन्वितत्व जाणावें ॥८६॥
श्रुति ह्यणति हाचि पुरुष ॥
अन्नरसमयादि पंचकोश ॥
याचे हेचि अवयवशीर्ष ॥
प्रमुख स्थूळ-सूक्ष्म-त्र्कमें ॥८७॥
अन्वितत्वें इन्धनाकार ॥
पावक अवगामितां साकार ।
तैसा पुरुषविधा प्रकार ॥
प्रबोधपर श्रुति वदती ॥८८॥
एरव्हीं ग्रावलोहकाश्ष्ठादिकीं ॥
अनळ अगोचर असेचि कीं ॥
तैसा ब्रह्यपुच्छप्रतिष्ठादिवाक्यीं ॥
शुध्द स्वरुप निर्दुष्ट ॥८९॥
तस्मात् श्रीपरेशाकारणें ॥
श्रवणें कीर्तनें स्मरणें मननें ॥
भजती त्यांचें सफ़ळित जिणें ॥
अपरा श्र्वसणें भस्त्रावत् ॥९०॥
ऎसें परमेश्र्वराच्या ठायीं ॥
सर्वात्मकत्वें श्रुति सर्वहि ॥
भजनीयत्व वदल्या पाहीं ॥
तें अभक्तां निंदूनी दॄढ केलें ॥९१॥
आतां अधिकारपरत्वें श्रुति ॥
अगम्य महिन्न ब्रह्यप्राप्ती ॥
उपाधि अवलंबे उपासिती ॥
ते पॄथक्पध्दती दावितसे ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP