मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १०

वेदस्तुति - श्लोक १०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


श्वेतव्दीपं गतवति त्वयि द्रष्टुं तदीश्वरम्‍ ॥
ब्रह्मवाद: सुसंवृत्त: श्रुतयो यत्र शेरते ॥
तत्रहायमभूत्प्रश्नस्त्वं मां यमनुपृच्छसि ॥१०॥

॥टीका॥ श्वेतव्दिपाप्रति तुजलागीं ॥ तत्रस्थ परमेश्वर मी शार्डगी ॥
अनिरुध्दरुपी विख्यात जगीं ॥ गेलों असतां देखावया ॥४९॥
अनिरुध्दमूर्तीच्या दर्शना ॥ श्वेत व्दिपाप्रति तां गमना ॥
केलें असतां मागें यज्ञा ॥ मानसपुत्री प्रवर्तविलें ॥५०॥
सुष्टु ह्मणीजे बरव्या परी ॥ ब्रह्मप्रतिपा दकसंवादकुसरी ॥
ब्रह्ममख वर्तला ते अवसरीं ॥ तुझिया श्रोत्रीं अविदित पै ॥५१॥
ब्रह्म ह्मणिजे ह्मणसी वेद ॥ तरी हा ब्रह्मोत्तमाड्‍मय वाद ॥
ज्याच्या ठायीं श्रुति नि:शब्द ॥ होवोनि प्रसुप्त झालिया ॥५२॥
जिये ठायीं पूर्ण चैतन्य ॥ विसरे सर्वसाक्षित्वाभिमान ॥
कर्तृत्व भोक्तृत्व वयुन ॥ होय लीन सन्मात्रीं ॥५३॥
केवळ ब्रह्म तें सन्मात्र ॥ अगाध अपार अगोचर ॥
जेथ समारसे ईश्वर ॥ स्वव्यापार विसरुनि ॥५४॥
तया पूर्ण चैतन्यामाजी ॥ अखिलात्मवयुनें  श्रुतींची राजी ॥
लीन होय सहज सहजीं ॥  ऐसी वाजी तिहीं केली ॥५५॥
एवं उत्कृष्ट ब्रह्मवाद ॥ उर्ध्वरेते जे ब्रह्मविद ॥
तिहीं जन लोकीं केला विशद॥ पूर्वी प्रसिध्द सत्रमय ॥५६॥
तेथ तये ब्रह्माध्वरीं ॥ हा प्रश्न केला विधीकुमारीं ॥
जो त्वां मातें या अवसरीं  । अत्यादरीं पुसियेला ॥५७॥
जिहीं अनुष्ठिलें ते ब्रह्मसत्र ॥ ते विधीचे मानसपुत्र ॥
समान श्रुतशील शत्रुमित्र ॥ तपस्वी तीव्र अवघेची ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP