अनुभूतिलेश - प्रारंभ

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


विष्णुं शारदचंद्रकोटिसदृशं शंखं रथांगं गदामंभोजं दधतं सिताब्जनिलयाकांतं जगन्मोहनम् ।
आबद्धांगदहारनूपुरलसन्मौलिप्रभं कुंडलं श्रीवत्सांकमुदारकौस्तुभधंर ध्यायेन्मुनीन्द्रै: स्तुतम् ॥१॥


श्रीवासुदेव वंदूनी घ्यानीं चिंतित जो सदा ।
वक्ता अनुभूतीलेश ग्रंथ तो वामनात्मक ॥२॥
टीका त्याची स्फुरविली त्याच श्रीजगदात्मकें ।
निमित्त मात्र मी त्यास कर्ता करविता स्वयें ॥३॥
समश्लोकी नाम परी भावार्थें युक्त मात्रचि ।
वदतों पाहतां संतां व्हावा संतोष या मिसें ॥४॥
न जाणें काव्यरचना न व्याकरणपद्धती ।
न विभक्तिहि ज्ञानातें तसेच छंद प्रास ही ॥५॥
लोटांगण अनन्यत्वें संतपादरजांप्रती ।
घालूनि प्रार्थि जीतां च मुक्तही हरिभक्त त्यां ॥६॥
कीं मी अज्ञ असें मातें करुनी ते क्षमा तुम्ही ।
अर्थीं देऊनियां दृष्टि पहावी हे पुन: पुन्हां ॥७॥
संस्कृती अनधीकारी असे परि मुमुक्षु जे ।
बोधनार्थ तयांच्या हे होईल उपयोगिक ॥८॥
मुमुक्षुजन जे त्यांतें न लागे अन्य साधन ।
श्रवणें होय तत्काळ ज्ञानानुभव हा तयां ॥९॥
श्लोकद्वयें करितसें मंगलाचरणास त्या ।
श्लोकैकें बोलतों शिष्यशरणागतिपद्धती ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP