मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|कर्मतत्व| भोग तत्त्व कर्मतत्व फळ तत्व यत्न तत्व भोग तत्त्व प्रारब्ध तत्व आत्म तत्व वेद तत्व जीव तत्व चैतन्य तत्व कर्मतत्व - भोग तत्त्व 'कर्मतत्व' काव्यात वामनपंडितांनी कर्माचे महत्व भावपूर्णतेने सांगितले आहे. Tags : karmatatvavaman panditकर्मतत्ववामन पंडित भोग तत्त्व Translation - भाषांतर जों आत्मयासि सुख - दुःख विटाळ नाहीं प्रारब्ध - कर्म - फळ तों म्हणवे न कांहीं देऊं शके न ममता सुख दुःख जेव्हां कैसा घडेल ममतास्पद भोग तेव्हां ॥१॥ हा पूर्वपक्ष दृढ यास्तव यासि जैसें स्पर्शोनि भोग नघडे वदिजेल तैसें कीं भोग होउनि सुखाऽसुख त्यासि नाहीं जो कां ममत्व न धरी दृढ यांत कांहीं ॥२॥ बुद्धी करोनि सुख दुःख कळे तथापी ते भोग आदळति येउनि चित्स्वरुपीं जाणोनि दुःख सुख बुद्धिस जें रुतेना तें आत्मयासि न घडे सुख दुःख नाना ॥३॥ गेलें अहंपण तथापिहि मीपणाचें आहे शरीर करितें सुख दुःख साचें बाहेर ज्यां सुत - धनादिक - लाभ - हानी जाणोन सुज्ञ सुख दुःख मनीं न मानीं ॥४॥ प्रारब्ध - भोग - दगडीं तनु भिंति झाली ते जों अहंममजळें मतिभिंति ओली बाहेरुनी दगड तों रुतती तयेशी ते वाळली मग खड्यास धरील कैशी ॥५॥बुद्धींतुनी जरि अहं ममतादि गेले देहादि भान अवघेंच नसे विरालें धूम्रासि पेटउनि अग्नि विझोनि जातो तो धूम्र एकघडि त्या सदनीं रहातो ॥६॥ अज्ञान - भेद तुटल्यावरिही स्वचित्तीं संस्कार - शेष करि पूर्विलिया प्रतीती बाहेरुनी सुत धनादिक लाभ हानी जाणोनि सुज्ञ सुख दुःख मनीं न मानी ॥७॥ जे ज्ञान - भानु - किरणीं मति - भिंती वाळे हे तीस लागुनि खडे पडती निराळे जे ज्ञान - वर्जित अहं ममतार्द्रबुद्धी त्यांला खडे रुतति यास्तव भोग - सिद्धी ॥८॥ पुत्रादि लाभ समजोनिहि हर्ष नाहीं हानी करोनि नमनीं मनिं दुःख कांहीं हे लाभ - हानि कळणेंचि विटाळ त्याला प्रारब्ध - भोग ममतास्पद तोचि बोला ॥९॥ प्रारब्ध - भोग ममतास्पद आणि कांहीं येणेंरितीच परि अज्ञ अभिज्ञ नाहीं राज्यादिकारण पितासुतेवेर जेथें बापासि दुःख नकरी सुत - मृत्यु तेथें ॥१०॥ तो पुत्र - मृत्यु तरि पूर्वील - कर्म - योगें प्रारब्ध - कर्म सरलें तितुक्याच भोगें ऐसेंच सर्व ममतास्पद भोगरुपें जे हर्ष शोक तितुकीं क्रियमाण - पापें ॥११॥ जे शुक भिंति न खडे रुततील तीतें तैसें न निर्मम - जना सुख दुःख होतें भिंती मधें दगड जे रचिले तयांचा नेघे म्हणेल तरि होइल भोग साचा ॥१२॥ जैसीं क्षुधा - ज्वर - नृषादिक दुर्निवारें दुःखें तसीं न ममता - रचितें विचारें तीं मानिलीं तरिच कीं सुख दुःख देती जीं ज्ञानियासि ममता गळतां न होती ॥१३॥ भोग - स्वरुप इतुकें ममतास्पदाचें कीं लाभ हानि कळणें सुख दुःख कैंचें तें अज्ञ मानिति तृथा ममता धरोनी ब्रम्हज्ञ निर्मम म्हणोनि तया न मानी ॥१४॥ बाहेरही सुत - धनादिक - लाभ - हानी जाणोनि अज्ञ सुख दुःख तनूंत मानी जी दैहिकें तितुकिंही उठती शरीरीं भिंतीसि लागति खडे उभय - प्रकारीं ॥१५॥ हें कर्मतत्व जरि येस्थळिं पूर्वपक्षी तर्के करी द्विविधही फळ तुल्य लक्षी बाहेरुनी विषयही सुख दुःख देती तैसें ममत्व सम दोनिहि कां न होती ॥१६॥ हा तर्क तों अनुभवासि विरुद्ध आधीं व्याधी जसी म्हणवितील तसीन आधी आधी विवेक करितां चुकतील जैसे व्याधी विवेक करितां चुकती न तैसे ॥१७॥ मानी तरीच तनयादिक लाभ हानी हीं दैहिकें न चुकती जरि हा न मानी या कारणें सुत धनादिक बात्द्य जैसें देहासि दुःख सुख तें म्हणवे न तैसें ॥१८॥ बाहेरुनी विषय हे जरि सौख्य देते तेव्हां क्षुधा - ज्वर - तृषार्त सुखीच होते स्त्रग्गंधलेप करि शीतळ तापहर्ता नेदी तथापि सुख काम - तृषा - क्षुधार्ता ॥१९॥ देहासि भोग सुख दुःख मनासि नाहीं तें बोलवे न सुख दुःख तयास कांहीं गंधें फुलें अति - सुगंध - सुमंद - वातें कामातुरासि विरहीं सुख काय होतें ॥२०॥ प्रारब्धकर्म वदति क्षय भोग - रुपें भोग - स्वरुप सुख दुःखचि पुण्य पापें भोक्त्यासि भोग नकळोनिहि भोग देहीं तो भोग कीं कळलियाविण भोग नाहीं ॥२१॥ भोक्त्यासि भोग नकळोनिहि भोग देहीं सकचंदनें शव अलंकृत भोग तोही आलिंगिती युवति जाळिति पुत्र जेव्हां भोक्त्याविणेचि मग भोग घडेल तेव्हां ॥२२॥ भोक्त्यासि दुःख - सुख - भोग कळेल जेव्हां तो पुण्य - पापमय भोग सरेल तेव्हां देहासि भोग सुख दुःख न आत्मयासी तेव्हां सुखाऽसुख असे फळ याचिपासी ॥२३॥ कामातुरा सुमन - चंदन - सौख्य नाहीं देहीं रति - श्रम मनांत न दुःख कांहीं तेव्हां सुखाऽसुख - फळें असती स्व - देहीं काळें फळें तरु तरुचिमधील तेही ॥२४॥ दुःखें सुखें असति कर्म जयाचि देहीं बाहेरुनी विषय होति निमित्त कांहीं जैसीं जलें तरुसि येति फळें रसाळें ऐसें तथापि फळ केवळ नृक्ष - मूळें ॥२५॥येथें सुखाऽसुख फळें तनु वृक्ष - रुपें वृक्षासि बीज निज पूर्विल पुण्य - पापें बीजाऽनुरुपचि तरुसि फळें विचित्रें तेव्हां जळें तरुसि जीवन - रुप - मात्रें ॥२६॥देहीं क्षुधा - ज्वर - तृषादिक दुःख जेव्हां बाहेरुनी नव्हति कोणिहि हेतु तेव्हां ऐसेंचि पुष्प फळ जें सुखनाम तेंही वृक्षामधें फळ तसीं अवघीं स्व - देहीं ॥२७॥ दुःखें सुखें असिं अहंपण - दुर्निवारें होती ममत्व - रचितें न असीं विचारें जें दुर्निवार तितुकें सुख दुःख देहीं बाहेरिल्या तनुसि आदळतात तेंही ॥२८॥ याकारणें स्व - सुख दुःख फळेल जेव्हां प्रारब्ध दुःख - सुख देइल यासि तेव्हां भिंतीमधें दगड येरिति भोग देहीं भिंतीस आदळति जे ममताख्य तेही ॥२९॥ प्रारब्द तें दगड पूर्विल पुण्य - पापें माती तसीं दिसति पांचहि भूतरुपें तो होय कर्दम अहंममतादि - नीरें भिंती करी विधि तई विविधें शरीरें ॥३०॥ प्रारब्धरुप दगडाचिमधून कांहीं पुत्रादिरुप उरलें रचितां स्व - देहीं तेही खडे वसति भिंतिस काळ येतां भिंतीमधील गळती निज - भोग होतां ॥३१॥ प्रारब्ध तें दगड भिंतिमधील जैसे काळें करोनि गळती फळ - भोग तैसे घोंडे जसे गळति भोग फळोनि जाती भूतें शवीं उरति पांचहि जेविं माती ॥३२॥ लागोनि जे दगड ते पडती निराळे भिंती वरील निज - भोग - समाप्ति - वेळे ज्या कां नसोडिति खडे ममतार्द्रभिंती ते संचितें इतर - भिंतिस हेतु होती ॥३३॥ ते भिंतिचा निज - धणी क्रियमाणरुपें हे पूर्व भिंति पडतां कृत - पुण्य - पापें आणीक भिंति करितां ममतार्द्रचित्तीं जे रुतले दगड कारण तेथ होती ॥३४॥ ऐसींच दैहिक - सुखार्थ करोनि कार्ये दुःखी सुखी म्हणुनि मानुनियं अधैर्ये पाषाण नूतन अहंममतार्द्रचित्तीं जोडोनि नेउनि सवें करि अन्य भिंती ॥३५॥ पाषाण ते विधि अहंममता विभागें कांहीं तनूंत किति एक - ममत्व - योगें जीवासि भोगवि अशा द्विविध - प्रकारें दुःखें सुखें द्विविध वास्तव या विचारें ॥३६॥ जे जागरीं विषय रुप - रुसादि घेती संस्कार ते दगडरुप मनीं धरीती भिंती चराचर निजोनि मनीं करितो देहांतरासि कृत - कर्म असेंचि नेतो ॥३७॥ यालागिं निश्वित सुखाऽसुख - तारतम्यें जेंसीं अहंपण तसीं न ममत्व - गम्यें बाहेरुनी विषय केवळ हे तु तेथें दुःखा सुखा घडति हे म्हणवे न येथें ॥३८॥ जो अज्ञ तो द्विविध - दुःख - सुखा बुडाला दैहीक मात्र नसुटे फळ योगियाला आतां स्व - दैहिक - सुखाऽसुख अज्ञ भोगी तैसें न भोगिति कदापिहि आत्मयोगी ॥३९॥ दुःखांत धैर्य सुख भोगुनिही उपेक्षा भोगूं पुढें सुख अशी न जया अपेक्षा जे दुःख भोगुनि न शोक - निमग्न होती होणार दुःख कळल्या भय जे नघेती ॥४०॥ एवं ममत्व सुख दुःख न योगियांसी दैहिक भोग नचुकेचि कधीं तयांसी ते भोग भोगुनिहि मागुति भोग कांहीं विश्वाऽत्मतेंकरुनि केवळ ज्यासि नाहीं ॥४१॥ जाणोनि चिज्जडविवेकहि विश्व - साक्षी होऊनि जो निज - अनंतपणास लक्षी हे वर्म त्यासि नकळे सुख - दुःख भोगी भोक्ताचि मी म्हणुनि मानितसे कुयोगी ॥४२॥ कोणी मृषा म्हणुनि बोलति भोग कैंचे मिथ्या भुजंग परि ते भय - कप साचे स्वमीं मृषा गज मृषा तनु मर्द्दिताहे द्रष्ट्रा तथापिहि खरेंचि म्हणोनि पाहे ॥४३॥ नाहींच भोग तरि त्यास किमर्थ मुक्ती शास्त्रें किमर्थक किमर्थ स्रदुक्ति युक्तीकर्तृत्त्व तें प्रकृतिचेंचि चिदश भोक्ता गीतेंत निर्णय करी हरि वेद - वक्ता ॥४४॥ भोत्कृत्व हें न म्हणवे परमात्मयासी आत्मत्व तें अनुभवाप्रति ये जयासी त्याला विटाळ म्हणवे न सुखाऽसुखाचा सर्वात्म - योग - निपुणासहि भोग कैंचा ॥४५॥ जेथें चिदंश मन इंद्रिय - भोग तेथें हा धर्म वर्जिति जडाजड सर्व जेथें ऐशास दुःख - सुख - भोग घडेल कैसा श्री - सूर्य हा मृगजळांत बुडे न जैसा ॥४६॥ प्रारब्ध - कर्म - फळ तें तरि सर्व भोगी साक्षी तथापिहि अहो जगदात्मयोगी हा निर्णय प्रकरणीं पुढिल्या मुरारी बोलोनियां हरिल संशय दुःख - हारी ॥४७॥ अध्याय हा रचियला तिसरा परेशें आत्मैक्य - वांचुनि न लिंपति भोग - लेशें अध्याय - नाम इतुक्यास्तव भोग - तत्त्व ज्ञानी अलिप्त कळतां जगदात्मकत्व ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP