मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न हि तत्कुशलादृत्यं, तदासायो ह्यपार्थकः ।

अन्तवत्त्वाच्छरीरस्य, फलस्येव वनस्पतेः ॥४२॥

विचारितां हा संसार । समूळ अवघा नश्वर ।

तेथ देहाचा अजरामर । ज्ञाते आदर न करिती ॥५७॥

देहअजरामरविधीं । ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी ।

देहीं साधिल्या ज्या सिद्धी । त्याही त्रिशुद्धी बाधिका ॥५८॥

देह तापल्या ज्वरादि तापें । तदर्थ मरणभयें कांपे ।

तेथ शीतळ आणिल्याही साक्षेपें । तेणेंही रुपें मरणचि ॥५९॥

मिथ्या देहींचा देहाभिमान । सदा भोगवी जन्ममरण ।

तो अजरामर करितां जाण । देहबंधन दृढ झालें ॥६६०॥

साधोनियां योगसाधन । दृढ केलें देहबंधन ।

देहींच्या सिद्धी भोगितां जाण । अधःपतन चुकेना ॥६१॥

हो कां ज्ञानार्थ योग साधितां । प्रसंगें सिद्धी आलिया हाता ।

त्याही त्यागाव्या तत्त्वतां । निजस्वार्थालागूनी ॥६२॥

ज्याची चाल रायापाशीं । लांच हाता ये तयासी ।

तेणेंचि पावे अपमानासी । तेवीं साधकासी घातका सिद्धी ॥६३॥

वृक्षासी मोडूनि आलिया फळें । त्या फळासी वृक्ष नातळे ।

तेवीं आलिया सिद्धीचे सोहळे । वैराग्यबळें त्यागावे ॥६४॥

कोरडेनि वैराग्यबळें । त्याग कीजे तो आडखळे ।

त्याग विवेकवैराग्यमेळें । तैं सिद्धीचे सोहळे तृणप्राय ॥६५॥

आंधळें हातिरुं मातलें । पतन न देखे आपुलें ।

तेवीं अविवेकें त्याग केले । ते ते गेले अधःपाता ॥६६॥

मूळीं देहचि नश्वर एथ । तेथींच्या सिद्धी काय शाश्वत ।

ऐसे विवेकवैराग्ययुक्त । होती अलिप्त देहभोगा ॥६७॥

एथ देह तितुका अनित्य। आत्मा एक नित्य सत्य ।

हें जाणोनि विवेकयुक्त । जडले निश्चित आत्माभ्यासीं ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP