मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


समाहितैः कः करणैर्गुणात्मभिर्गुणो भवेन्मत्सुविविक्तधाम्नः ।

विक्षिप्यमाणैरुत किं नु दूषणं, घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥२५॥

देहेंद्रियावेगळा पाहीं । अपरोक्ष आत्मा जाणितला जिंहीं ।

त्यांसी इंद्रियनेमें लाभ कायी । विक्षेपें नाहीं हानी त्यांसी ॥२३॥

दोराचा साप खिळोनि मंत्रीं । मंत्रवादी निःशंक धरी ।

न खिळितां जो धरी करीं । त्यासीही न करी बाधा तो ॥२४॥

जो मृगजळीं पोहोनि गेला । तो दैवाचा कडे पडिला ।

पोहेचिना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐलतीरा ॥२५॥

तेवीं देहेंद्रियांचें मिथ्याभान । जाणोनि झाले ते सज्ञान ।

त्यांसी इंद्रियांचें बंधन । सर्वथा जाण अनुपेगी ॥२६॥

जयासी माझें अपरोक्ष ज्ञान । तेणें घालोनियां आसन ।

अखंड धरितां ध्यान । अधिक उपेग जाण असेना ॥२७॥

जेवीं मी लीलाविग्रहधारी । तेवीं तेही वर्ततां शरीरीं ।

ते इंद्रियकर्मावारीं । भवसागरीं न बुडती ॥२८॥

अथवा तो इंद्रियसंगतीं । दैवें अनेक विषयप्राप्ती ।

भोगितांही अहोरातीं । ब्रह्मस्थिति भंगेना ॥२९॥

स्थिति न भंगावया हेंचि कारण । माझें स्वप्रकाश स्वानंदघन ।

पावले निजधाम ब्रह्म पूर्ण । तेथ विषयस्फुरण बाधीना ॥३३०॥

जेवीं सूर्य उगवोनि गगनीं । लोक सोडवी निद्रेपासूनी ।

ते लोक कर्मीं प्रवर्तवोनी । अलिप्त दिनमणि जनकर्मा ॥३१॥

तेवीं मी परमात्मा स्वयंज्योती । प्रभा प्रकाशीं त्रिजगतीं ।

त्या जनकर्मांच्या क्रियाशक्ती । मी अलिप्त निश्चितीं निजात्मा ॥३२॥

मुक्तासी स्त्रीपुत्रगृहसंग । तेणें वेष्टला दिसे चांग ।

म्हणसी केवीं मानूं निःसंग । तें सांगे श्रीरंग रविदृष्टांतें ॥३३॥

घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥

उंच लक्षयोजनें रविमंडळ । बारा योजनें मेघपडळ ।

तेणें सूर्य झांकोळिला केवळ । लोक सकळ मानिती ॥३४॥

परी सूर्य आणि आभाळासी । भेटी नाहीं कल्पांतेंसीं ।

तेवीं इंद्रियकर्म सज्ञानासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥३५॥

अभ्र आच्छादी जगाचे डोळे । जग म्हणे सूर्य आच्छादिला आभाळें ।

ऐसेंचि विपरीत ज्ञान कळे । मायामेळें भ्रांतासी ॥३६॥

तें अभ्र आल्या गेल्यापाठीं । सूर्यासी न पडे आठीवेठी ।

तेवीं गृहदारासंगासाठीं । न पडे संकटीं सज्ञान ॥३७॥

जेवीं सूर्यातें नातळे आभाळ । तेवीं ज्ञात्यासी संग सकळ ।

इंद्रियकर्मांचा विटाळ । ज्ञात्यासी अळुमाळ लागेना ॥३८॥;

ऐक त्या ज्ञात्याचें रुप परम । तो देहीं असोनि परब्रह्म ।

यालागीं त्यासी इंद्रियकर्म । समविषम बाधीना ॥३९॥

ज्ञाता सर्वार्थीं अलिप्त । तेंचि करावया सुनिश्चित ।

आकाश दृष्टांतें श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत साक्षेपें ॥३४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP