मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


योगधारणया कांश्चिदासनैर्धारणान्वितैः ।

तपोमन्त्रौषधैः कांश्चिदुपसर्गान्विनिर्दहेत् ॥३९॥

देहीं शीतळता वाढल्या जाण । तीस निवारी अग्निधारण ।

देहीं उष्मा चढल्या पूर्ण । सोमधारण उच्छेदी ॥६००॥

वायु अव्हाटल्या अवचितां । तैं देहीं वायु भरावा पुरता ।

वायु मेळवुनि वायुआंतौता । आणिती निजपंथा अभ्यासबळें ॥१॥

वायु क्षोभोनि सकोप । जैं जठरावरी पडे झडप ।

तैं क्षुधा खवळे अमूप । तृप्तीचें रुप उठीना ॥२॥

तेथ मोकळा सांडूनि प्राण । अपान वाढवावा आपण ।

तो जठरा आलिया जाण । तेथ क्षोभला प्राण सहजिचि ये ॥३॥

तेथ प्राणापानऐक्यता । सहजें ये साधकांच्या हाता ।

मग षट्‌चक्रें भेदितां । क्षणही सर्वथा लागेना ॥४॥

तेव्हां सतरावियेचें अमृतपान । साधकांसी फावे संपूर्ण ।

यापरी क्षुधानिर्दळण । येणें योगें जाण साधिती ॥५॥

परदारा परद्रव्यासक्ती । हे पापकर्माची फळप्राप्ती ।

याची करावया निवृत्ती । तपश्चर्या निश्चितीं उद्धवा ॥६॥

भावें करितां मंत्रानुष्ठान । तेणे वैराग्य उपजे जाण ।

वैराग्यें विषयनिर्दळण । सहजें जाण साधकां ॥७॥

शुद्ध मंत्राचें पुरश्चरण । करी विघ्नांचें निर्दळण ।

तेथ पिशाचबाधासंचरण । घेऊनि प्राण स्वयें पळे ॥८॥

शरीरीं संचरल्या व्याधी । त्यातें निर्दळी दिव्य औषधी ।

मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुद्धीं साधावा ॥९॥

तेथ साधल्या योगसिद्धी । समूळ निर्दळी आधिव्याधी ।

सकळ विघ्नांतेंही छेदी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥६१०॥

हें किती सांगूं भिन्न भिन्न । भावें करितां माझें ध्यान ।

सकळ उपसर्गां निर्दळण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP