मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सत्ताविसावा|
श्लोक ५० व ५१ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५० व ५१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


मदर्चां सम्प्रतिष्ठाप्य, मन्दिरं कारयेदूदृम् ।

पुषोप्द्यानानि रम्याणि, पूजायात्रोत्सवाश्रितान् ॥५०॥

पूजादीनां प्रवाहार्थं, महापर्वस्वथान्वहम् ।

क्षेत्रापणपुरग्रामान्, दत्वा मत्सार्ष्टितामियात् ॥५१॥

साङग माझी प्रतिमामूर्ती । करुनि जे प्रतिष्ठा करिती ।

दृढ देवालया उभारिती । अतिप्रीतीं मद्भावें ॥७६॥

वन उपवन उद्यान । पुष्पवाटिका लावाव्या पूर्ण ।

नित्यपूजेचें विधान । उत्साहीं जाण महापूजा ॥७७॥

यात्रा बहुजनसमाजा । वार्षिक पर्व महापूजा ।

चालवावया अधोक्षजा । उपाय सहजा हरि सांगे ॥७८॥

नित्यपूजा महापूजा । वार्षिक पर्वें चालवावया वोजा ।

नित्यनिर्वाह करी राजा । ग्रामसमाजा अर्पूनि ॥७९॥

’क्षेत्र’ म्हणिजे शेत गहन । हाटउत्पन्न द्रव्य ’आपण’ ।

हाटेंविण तो ’ग्राम’ जाण । ऐक लक्षण पुराचें ॥३८०॥

हाटयुक्त तें ’पुर’ पाहीं । जे अर्पिती देवालयीं ।

ते माझें ऐश्वर्य पाहीं । सर्वां ठायीं पावती ॥८१॥

मूर्तिप्रतिष्ठा पूजाविधान । देवालयीं केलिया जाण ।

कर्त्यासी फळ कोण कोण । तेंही श्रीकृष्ण सांगत ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP