मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक २० वा

एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एवं लोकं परं विद्यान्नश्वरं कर्मनिर्मितम्‌ ।

सतुल्यातिशयध्वंसं यथा मण्डलवर्तिनाम् ॥२०॥

मनीं धरोनी विषयभोग । इहलोकीं करिती याग ।

पुण्य जोडोनियां साङग । पावती स्वर्ग निजपुण्ययोगें ॥२६०॥

स्वर्गसुखा इंद्र अधिपती । तोही पतनार्थ धाके चित्तीं ।

विघ्नें सूची तापसांप्रती । स्वर्गस्थिति अपायी ॥६१॥

यापरी निजपुण्यें स्वर्गप्राप्ती । त्या लोकातें ’पुण्यजित’ म्हणती ।

तेही पुण्यक्षयें क्षया जाती । तेणें धाकें धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ ॥६२॥

गांठीं पुण्य असतां चोख । स्वर्गभोगीं असेल सुख ।

हेही वार्ता समूळ लटिक । स्वर्गीचें दुःख ऐक राया ॥६३॥

समान पुण्यें समपदप्राप्ती । त्यांसी स्पर्धाकलहो करिती ।

आपणाहूनि ज्यां अधिक स्थिती । त्यांचा द्वेष चित्तीं अहर्निशीं ॥६४॥

जैसे राजे मंडळवर्ती । राज्यलोभें कलहो करिती ।

तैशी स्वर्गस्थां कलहस्थिती । द्वेषें होती अतिदुःखी ॥६५॥

पतनभयें कलह-द्वेष वोढी । क्षयातें पावे पुण्यजोडी ।

अधोमुख पडती बुडीं । याज्ञिकें बापुडीं चरफडती ॥६६॥

एवं स्वर्गसुखउल्हासु । मानिती ते केवळ पशु ।

प्रत्यक्ष तेथ द्वेषु नाशु । असमसाहसु नित्य कलहो ॥६७॥

सेविलाचि विषयो नित्य सेविती । परी कदा नव्हे मानसीं तृप्ती ।

तरी मिथ्या म्हणौनि नेणती । हे मोहक शक्ती मायेची ॥६८॥

जैसें वेश्येचें सुख साजणें । वित्त घेऊनि वोसंडणें ।

तेवीं विषयाचा संगु धरणें । तंव तंव होणें अतिदुःखी ॥६९॥

यालागीं उभयभोगउपाया । जे जे प्रवर्तले गा राया ।

ते ते जाण ठकिले माया । थितें गेलें वायां उत्तम आयुष्य ॥२७०॥

कर्मभूमीं नरदेह प्राप्त । हें पूर्ण निजभाग्याचें मथित ।

देव नरदेह वांछित । ते देव केले व्यर्थ विषयार्थी ॥७१॥

एवं विषयाची आसक्ती । माया ठकिले नेणों किती ।

यालागीं विषयाचे विरक्ती । करावी गुरुभक्ती तेंचि सांगों ॥७२॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP