मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
माझ्या ग अंगणात थवे फु...

बालगीत - माझ्या ग अंगणात थवे फु...

निळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्‍यावर स्वार व्हावे.’


माझ्या ग अंगणात

थवे फुलपाखरांचे

गोल गोल रिंगणात

गाणे फिरते रंगांचे

माझ्या ग अंगणात

पंख फिरकती तयांचे

लाल-गुलाबी फुलांत

ध्यान चालले निळ्याचे

माझ्या ग अंगणात

वेल निळे गोकर्णीचे

गर्द पोपटी पानांत

झुले झुंबर पंखांचे

माझ्या ग अंगणात

मिटे पंख पाखरांचे

हळू जाता धरु हात

पंख फाटती त्यांचे

अशा माझ्या अंगणात

रंग सांडले फुलांचे

फुलपंखी मंडपात

रंग थवे पाखरांचे

N/A

References :

कवी - मदन हजेरी

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP