TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग|
चोखियाचे घरा आले नारायणा ...

संत वंका - चोखियाचे घरा आले नारायणा ...

संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.


अभंग

चोखियाचे घरा आले नारायणा । होउनी ब्राह्मण दिनें वृध्द ॥१॥

हातामध्ये कांठी सावळा जगजेठी । तुळसीमाळा कंठी बुका भाळीं ॥२॥

कांपत कांपत जातसे चांचरी । मोठा नटधारी घरघेणा ॥३॥

चोखियाचे घर पुसतसे लोकां । वैकुठीचा सखा भक्त काजा ॥४॥

दुरोनियां पाहे चोख्याची अंतुरी । तंव तो आला द्वारी चोखियाच्य़ा ॥५॥

हांसत कांपत मुखाने बोलत । लाळही गळत मुखावाटे ॥६॥

वंका म्हणे पंढरीचा राणा । देखिला नयनां सोयराई ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-07-10T22:56:49.3500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नकलणे

  • स.क्रि. १ अस्सलासारखा दिसणारा दुसरा , अनुकरण करुन केलेला ( पदार्थ , वस्तु इ० ). २ दिखाऊ ; कृत्रिम ; टाकाऊ . बाजारी जिन्नस नेहमी नकली असावयाचा . - मानापमान ३४ . ३ गमतीची ; मजेदार ; चमत्कृतिजनक ( गोष्ट , भाषण , गोष्टी सांगणारा ). बहुरुप अर्धनारीश्वरसा तद्भक्त हाहि नक्लि बा । - मोविराट ३ . ८४ . ४ खोटा ; बनावट . - स्त्री . अस्सल लुगड्यासारखे दिसावयाजोगे लुगडे . [ नकल . फा . नक्ली ] 
  • ०नाणे न. कोणी इसम फसेल असे अस्सल नाण्याप्रमाणे बनविलेले नाणे ; खोटे नाणे . 
  • ०पदार्थ पु. दुसर्‍याला फसविण्याच्या इराद्याने एखाद्या पदार्थाप्रमाणे केलेला दुसरा बनावट पदार्थ . 
RANDOM WORD

Did you know?

परदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.