TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
गोपाळ संवगडे आले वाडेकोडे...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - गोपाळ संवगडे आले वाडेकोडे...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

संत निवृत्तीनाथांचे अभंग

गोपाळ संवगडे आले वाडेकोडें । असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥

बिंबली पंढरी हरीरूपीं सार । अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥

कालया कौशल्या नामदेव जाणे । तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥

ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥

वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे । काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥

निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु । सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-08T17:40:49.0030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तडतड

  • क्रि.वि. १ ( एखादा जिन्नस तळतांना , फोडणी देतांना , भाजतांना होणार्‍या ) तडतड , अशा आवाजाने ; सपाट्याने छडी मारली असतां , एकदम बंदूक उडविली असतां , एखादा पदार्थ खडखडत असतां होणार्‍या तड तड अशा आवाजाने . २ ( जोराने , आवेशाने , घिसाडघाईने एखादा जिन्नस ) फाडतांना , फोडतांना , तोडतांना , चावला जात असताना , लचके तोडले जात असतांना , कुरतडतांनां होणार्‍या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० तोडणे ; बोचकरणे ; लुंचणे ; चावणे ; खाणे ; डसणे ; खाजवणे ; फाडणे ; फाटणे ). क्रव्यादाही तडतड तोडुनियां भक्षिलाचि मत्स्यप हा । - मोस्त्री ४ . ६२ . ३ चिरडीने ; तुसडेपणाने ; वसकन ( बोलणे इ० ); फडाफड बोलून ; कडकडून ; तोंड सोडून ( रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ). ४ चलाखीने ; झटदिशी ; चपळाईने ; उत्साहाने ( करणे , बोलणे , हालचाल करणे ). [ ध्व . तड द्वि . ] ( पोटांत ) तडतड , तडतडां तोडणे - ( एखाद्याविषयी ) कळवळा येणे ; कीव येणे ; मन द्रवणे ; आंतडे तुटणे . 
  • वि. १ चिडखोर ; तुसडा ; रागीट ; तिरसट स्वभावाचा . २ हुज्जतखोर ; तकारारी ; चिकित्साखोर . ३ तडतड वाजणारी , ठिणग्या उडणारी ( दारु , काडी इ० ). [ तडतड ] 
  • स्त्री. १ फुटण्याची , तडकण्याची क्रिया , आवाज ; ( तळल्या जाणार्‍या पदार्थाची ) फुरफुर ; तडतडाट ; तिडतिड . २ ( रागावून ) खेंकसणे ; धुसफुस ; ( लहान मुले इ० कांचा ) छांदिष्टपणा ; कुतरओढ ; गांजणूक . ३ ( त्वचा , चामडी इ० कांचे ) तडतडणे ; फुटणे ; दुखणे . ४ जिवाला त्रास . [ ध्व . तड द्वि . ] 
RANDOM WORD

Did you know?

स्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site