मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|बालक्रीडा| २१ ते २९ बालक्रीडा ८ ते २० २१ ते २९ अभंग - २१ ते २९ निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - २१ ते २९ Translation - भाषांतर २१जिवलग माझे गडी ।न गमे घडी तुम्हांविण ॥१॥सांगा जे जे मनोरथ ।पुरवीन आर्त तुमचें तें ॥२॥नका आतां उदासीन ।करुं मन मजवरी ॥३॥निळा म्हणे हरि ऐसा ।करी लालसा दासांची ॥४॥२२शिंगे काहाळा मोहरीं पावे ।नादें हेलावे अंबर ॥१॥वाकी घागर्या तोडर पायीं ।धावती गाई थाट पुढें ॥२॥मोर कुंचे चांदिवे वरि ।नाचती गजरीं हरिनामें ॥३॥पढती ब्रीद्रें सवें निळा ।बहुत गोपाळा आवडे ॥४॥२३सुंदर उटी मलयागरे ।वेढिलीं चिरें पापेंचि ॥१॥मोरपिसें मुगुटावरी ।मुरली अधरी वाजवितु ॥२॥घनश्याम हा मदनमूर्ती ।झळके दीप्ती पदकाची ॥३॥निळा म्हणे पांडूरंग ।संतसंग भोंवताला ॥४॥२४मोहर्या पांवे तलालोरी ।नाचती गजरीं गीत गाती ॥१॥शिंगें काहाळा मृदंग विणे ।गाणें नाचणें निज छंदें ॥२॥टिपरी घागर्या एकची घाई ।उठिताती पायीं झणत्कार ॥३॥निळा म्हणे रंगले रंगें ।केलें श्रीरंगें आपणासें ॥४॥२५मृदु मधुर वाजवीत वेणु ।सावळा नंदनु नंदाचा ॥१॥तेणें गोपिका वेधल्या ।पात्र झाल्या ब्रम्हसुखा ॥२॥रंजवित्या विनोदवचनीं ।हास्य करुनि हासवीतु ॥३॥निळा म्हणे त्यांचिया गळांघाली वेळोवेळां करपल्लव ॥४॥२६सुकुमार सुंदर ।अंगकांति मनोहर ॥१॥विठो घननीळ सांवळा ।लावण्यें मदनाचा पुतळा ॥२॥कसीयेला पीतांबर ।चरणीं ब्रीदाचा तोडर ॥३॥निळा म्हणे माळा कंठी ।मुगुटीं मोरविसावेटी ॥४॥२७पोसणाचि परी आवडला ।मानु दिधला पुत्रपणा ॥१॥मागें पुढें सांभाळिती ।त्याचेंचि करिती कोड सदां ॥२॥खांदी कडिये घेउनी सुखें ।बोलों हरिखें शिकविती ॥३॥निळा म्हणे ऐसे लोक ।वानिती कौतुक परस्परें ॥४॥२८धीट अधिकार कापिले ।बधिर बोलिके तोतिरे ॥१॥भाविकांचा गोडा भावो ।देखोनि सर्वे नाचे देवो ॥२॥म्हणे धन्य तुमचें कर्म ।अवघें माझेचि ठाईं प्रेम ॥३॥निळा म्हणे तुम्हांविण ।दुजें आप्त मज तें कोण ॥४॥२९याज्ञिक मंत्रे अवदान देती ।त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ॥१॥हे काय अवगुण नव्हती सांगा ।प्रत्यक्ष ठाऊकेचि आहेती जगा ॥२॥सांडूनियां सेजे लक्ष्मी ऐसी ।भोगितो विद्रूप कौंसाची दासी ॥३॥घरींची दही दुधें या न लगती गोडें ।चोरटा लोकांची मोडितो कवाडें ॥४॥श्रुतिस्मृतीची ही वचनें नेघोनियां कानीं ।हांसे श्रलाघे शिव्या देतां गवळणी ॥५॥निळा म्हणे याची खोडीचि हे ऐशीं ।ते बोलोनि काय मानली यासी ॥६॥संत निळोबाराय गाथा (बालक्रीडा) समाप्त N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP