मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग| ६ ते १० अभंग १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते १९ अभंग - ६ ते १० महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग - ६ ते १० Translation - भाषांतर अभंग ६ वासद्गुरुसी शरण गेलों जये वेळां । वेळसो साधिला अमृताचा ॥१॥घरांतुन जेव्हां बाहेर निघालों । संगे घेता झालों पंचप्राण ॥२॥मुळारंभी मार्गी गणपति भेटला । निरोप सांगितला तुम्हांलागी ॥३॥उत्तरेसी आलो पश्चिमें राहिलों । पुढें हो भेटलों आत्मबिंबा ॥४॥एकनाथ म्हणे दत्ताचे कृपेने । सांगितला प्रश्न तुम्हालागीं ॥५॥अभंग ७ वाएक मज मातातात उभयतां । आणि तीन कांता दोघे सुत ॥१॥चौघेजण बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझे पोटीं ॥२॥बधु बहिणींचे स्वयें लग्न केलें । अपूर्व वर्तलें बोलावेना ॥३॥ज्ञानदेव म्हणे हेंचि गूढ । नाहींतरी मूढ होऊनि राहें ॥४॥अभंग ८ वामाया तेचि माया जिव शिव पिता । अवस्था त्या कांता जाण बापा ॥१॥सुत तेचि भाव विश्वास हे दोघे । बंधु जाण चौघे पुरुषार्थ ॥२॥दशक इंद्रियें त्या जाण बहिणी । शांति क्षमा तिन्ही कन्या झाल्या ॥३॥भावभक्ति यांशी स्वयें झाले लग्न । देखतांचि मग्न चित्तवृत्ती ॥४॥ज्ञानदेव म्हणे उकल पै याचा । दुजीयाची वाचा अनिर्वाच्य ॥५॥अभंग ९ वाअहो कोठें आहें मन । कोठें आहे तो पवन ॥१॥कोठें आहे ब्रह्मपती । कोठें आहे विष्णुमूर्ती ॥२॥कोठें आहे त्रिनयन । कोठें गणपती आसन ॥३॥दास म्हणे शोधून पहावें । नाहीं तरी गुरुसीं पुसावे ॥४॥अभंग १० वाअहो हृदयीं आहे मन । नाकीं आहे तो पवन ॥१॥शरीरी आहे ब्रह्मपती । नाभीं आहे विष्णुमूर्ती ॥२॥ब्रह्मरंध्रीं तो त्रिनयन । मध्ये गणपती आसन ॥३॥दास म्हणे ओळखुन पहावें । नाहींतर गुरुसीं पुसावें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP