मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|एकतारी पदे| पद ७ एकतारी पदे पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ एकतारी पदे - पद ७ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ७ Translation - भाषांतर सद्गुरु समर्थ भेटले मन केलें धीट । दाविली मोक्षपदी वाट ॥धृ०कायापुरी बाजार शहरांत भरला घनदाट । मोठी उदम्यांची पेठ ॥चौसष्ट बहात्तर गल्ल्यांमध्ये व्यापार अचाट । बावन्न गडयांचा रस्ता नीट ॥सहा, चार अठरा बारा, सोळा करिती नित थाट । किराणा घेऊन बसले चट ॥दहा सहांनी कळ माजविली केला अवघा वीट । बाजंदि नारी फिरे आठ ॥१॥शरहामध्यें चार खरे लुच्चे फिरे सहाजन । भुलविले जन कपट गमन ॥अवघा खर्च लिहिला कारकून चित्रगुप्त दोन । नित्य रोजीं करिती टिपण ॥शहर पाहुनि शांत झाले गेले वरति चढून । त्रिवेणीचे केले मन स्नान ॥त्रिवेणीच्या वर जाता झाली उन्मनीची भेट । ओंकार बीज तेथे उमट ॥२॥महाबीजशून्यावर परब्रह्म दिसलें दसव्या द्वारी । पाहातां सुख वाटे अंतरी । असे मशी वाटले बाई मी आलें कैलासपुरी । सुख वाटे अंतरी । असे मशी वाटले बाई मी आले कैलासपुरी । सुख दु:ख विसरले सारें । शांति दया क्षमा बहीण भेटली भक्ति खरी । सोहं नाम मंत्र उच्चारी ॥अशा पुरुषांचा संग करावा पाय धरी बळकट । तेथेच होईल शेवट ॥३॥भाव विवेक वैराग्य साधलें निजबोध गडनी । अशी जोडी नाहीं त्रिभुवनी ॥देहाची मी विदेह झाले गेले रुपांत मिळूनी । चुकविल्या चौर्यांशी योनी ॥दत्त सावतळ प्रसन्न गुरु भीमराज मले गुणी । बोलले गणपत आत्मज्ञानी । जुना गांव ओळखूनशेनी शोधा कैलास पेठ । पाजिला गुरुनी प्रेम घोट ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP