मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
राधेश्याम राधेश्याम

भावगंगा - राधेश्याम राधेश्याम

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


राधेश्याम राधेश्याम राधेश्याम । मनीं बसविला राधेश्याम ॥धृ॥
नंदाचा हरि प्रियतम श्याम । माय यशोदा जपते श्याम ॥१॥
गोपीजनवल्लभ घनश्याम । विराट उद्धव पाही श्याम ॥२॥
धनंजयाचा रक्षक श्याम । कौरवदल विध्वंसक श्याम ॥३॥
तारक प्रल्हादाचा श्याम । हिरण्यकश्यपु मारक श्याम ॥४॥
भक्तांचा प्रभु पालक श्याम । दीनांचा दु:खहारक श्याम ॥५॥
मीरेचा गिरिधर तो श्याम । नरसीचा तर स्वामी श्याम ॥६॥
सज्जनजन परिरक्षक श्याम । पापीजन संहारक श्याम ॥७॥
संतसमागमी रमतो श्याम । माझे मन संचालक श्याम ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP