॥ श्री गुरू गोरक्षनाथाष्टक ॥

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


यतिन्द्रं योगीन्द्रं सकलवसुधाया हितकरम् । सदा सेव्यं भव्यैः कलिमलदहं साधुसुखदम् ॥
परं पारं ज्योतिर्जनिमृतिहरं कारणपरम् । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड.रगुरुम्‍ ॥१॥

यति आणि योगी यांमध्यें श्रेष्ठ, सर्व जगताचा हितकर्ता, श्रेष्ठ जनांचा सेवाविषय बनलेल्या, कलिमलाचें दहन करणार्‍या, साधूंना सुख देणार्‍या, परमज्योतिःस्वरुप, सकल संसाराच्या जन्ममृत्युंचें हरण करणार्‍या आणि श्रुति ज्यांच्या चरणीं नम्र झाल्या आहेत अशा गोरक्षरुपी गुरु शंकराला मी वंदन करतों.

सदा शान्तो दान्तो, हरिविधिमहेशैरपि बली । समारं मां मायां सकलभवदोषान्‍ प्रतिजयी ॥
गुणागारं पारं, परमकुशली योगविधिना । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥२॥

जो सदा शांत, दांत, हरि-हर ब्रह्मा यांहून बलशाली, मारासहित समस्त मायेला व सकल भवदोषांना जिंकणारा, समस्त गुणांचें आगर, योगविधीमध्यें अत्यंत कुशल अशा श्रुतिगीतकीर्ति गोरक्षरुपी गुरु शंकराला वंदन करतों.

सुरेंशं योगीशं, निखिलजनतापत्रयहरम् । दयालुं गोपालं, निजजनसदापालनपरम् ॥
स्वाभक्तेभ्यो योगं वितरति सदाकष्टह्यतये । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥३॥

जो देवांचा आणि योग्यांचा ईश आहे, जो सकल जनांच्या त्रिविध तापाचें हरण करतो, जो दयाळु, इंद्रियांचा पालक आणिनिजभक्तांचा संगोपक आहे, सर्व कष्टांचा निरास करण्यासाठीं स्वभक्तांना योगविधीचें जो दान करतो, अशा श्रुतिगीत-कीर्ति गोरक्षरुपी गुरु शंकराला मी वंदन करतों.

न याचे साम्राज्यं, तव चरणसेवां भवगुरो । स कंसारिर्लेभे, तव चरणसेवी निजवधूम् ॥
त्वयि श्रध्दा भक्तिर्वितरति सदा वात्र्छितफलम् । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥४॥

हे भवगुरो, मी साम्राज्य मागत नाहीं. मला केवळ तुझी चरणसेवा हवी. कारण तुझी चरणसेवा करणार्‍या कंसारि कृष्णानें तुझ्या कृपेनेंच रुक्मिणीला प्राप्त केलें । तुझ्या ठायीं दृढावलेली श्रध्दा आणि भक्ति सदैव वांछित फल देते. त्या श्रुतिवंदित गोरक्षरुपी गुरु शंकराला मी वंदन करतों .

स्वरुपे संस्थाप्य, श्रवणगतवाक्येन विदितम् । भवाब्धौ मग्नान्यानुपदिशति चोध्दारयति च ॥
स वै गोरक्षो मामपि निशि दिवा पालयति च । भजे तं गोरक्ष, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥५॥

जो संसारसमुद्रांत निमग्न झालेल्या प्राण्यांना उपदेश करुन, श्रवणगत वाक्यानें त्यांचा उध्दार करतो आणि त्यांना स्वरुपीं स्थिर करतो, तोच जगत्पालक गोरक्ष माझें अहर्निश पालन करीत आहे. अशा श्रुतिवंदित गोरक्षरुपी गुरु शंकराल मी वंदन करतों

स्म गोरक्षं नाथं, भजति नृपवृन्दं क्षिंतितले । परं मोक्षं लेभे, जगति सुखसारं च परमम् ॥
पुरा गोपीचंन्द्रप्रभृतय उदैश्वर्यमिह किम्‍ । भजी तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥६॥

जगतांतील राजसमुहानें गोरक्षनाथांची भक्ति करुनच, इहलोकांतील सुखसर्वस्वाची आणि अंतीं मोक्षाची प्राप्ति करुन घेतली. पूर्वी गोपीचंदादि अशा प्रकारें परम ऐश्वर्याचे धनी झाले. अशा श्रुतिगौरवित गोरक्षरुपी गुरु शंकराला मी वंदन करतों.

प्रपत्र्वास्यास्य त्वां, कथयति यदा मूलजनकम् । यतो जातं लीनं, स्थिरमपि च तत्रैव भवति ॥
तदा गोरक्षार्यश्वरति भुवनेस्मिन् प्रमुदितः । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥७॥

हे गोरक्ष, ज्या अर्थी श्रुति तुला या प्रपंचाचा मूलजनक म्हणते आणि ज्या अर्थी तुझ्यापासून निर्माण झालेलें हे दृश्यजात तुझ्या ठिकाणींच स्थिर होऊन लीन्दता पावतें, त्या अर्थी तूंच या सकल भुवनांत सर्वत्र आनंदमयतेनें विचरत आहेस. अशा सर्वव्यापी, श्रुतिवंदित, गोरक्षरुपी गुरु शंकराला मी वंदन करतों.

निराकारं सारं स्फुरणरहितं शुध्दविमलम् । अहो भ्रान्तो मूढः, कलयति जनो द्वैतमपि यम् ॥
सदा शुध्दे मिथ्या निखिलजगदारोपणमिदम् । भजे तं गोरक्षं, श्रुतिनुतपदं शड्करगुरुम् ॥८॥

जो निराकार, समस्त संसाराचें सार, क्षोभरहित आणि शुध्द निष्कलंक आहे, अशा अद्वैत ब्रह्मस्वरुपाला भ्रांत मूढजन द्वैतदृष्टीने  पाहातात. जो सदा शुध्द आहे, अशाच्या ठायीं निखिल प्रपंचाचा आरोप करणें मिथ्या आहे. अशा शुध्दस्वरुपी, श्रुतिवंदित, गोरक्षरुपी, गुरु शंकराला आम्ही वंदन करतों.

गड्ननाथकृतां स्तुतिं शुचिमनाः, कल्पे पठेद्‍भक्तिमान् । मोक्षार्थी लभते च मोक्षपदवीं  पुत्रं कलत्रं परः ॥
प्राज्यं राज्यमकण्टकं शुचि यशो, धर्मार्थकामादिकम् । गोरक्षेऽक्षयकल्पकल्पनपटौ, तुष्टे किमिष्टं पुनः ॥९॥

जो कोणी भक्तियुक्त आणि प्रसन्न अंतःकरणानें प्रातःकाळीं या गंगानाथकृत स्तोत्राचें पठण करील, त्याला मोक्षाची कामना असेल, तर मोक्ष लाभेल आणि ऐहिक उत्कर्षाची कामना असेल, तर पुत्र-कलत्र विशाल निष्कंटक राज्य, विमल कीर्ति आणि धर्मार्थकामादि पुरुषार्थांची प्राप्ति होईल. अक्षय मोक्षद गोरक्षाची कृपा लाभल्यावर आणखी कोणतें अभीष्ट
अवशिष्ट राहाणार ?

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP