प्रस्तावना - पूर्वप्रकाशक

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


नाथलीलामृताचें पूर्वप्रकाशक

अनेक दृष्टीनीं महत्त्वपूर्ण असणारा हा ग्रंथ दुर्दैवानें अलक्षित राहिला असला, तरी अतो यापूर्वी दोनदां प्रकाशित झाला
होता. प्रथम " राजेश्री विनायक भिकाजी टिल्लू वैंडर आलिबागकर यांणीं हा ग्रंथ प्रयत्नेंकरुन मिळविला व शुध्द करवून
सखाराम भिकूशेट खातु यांचे शिलायंत्र छापखान्यांत छापविला. " या प्रथम प्रकाशनाची मिति आहे अधिक वैशाख
वद्य ११, शके १७९१ ( दि. ७ मे १८६९ ). त्यानंतर जवळ जवळ तीस वर्षांनीं, मिति चैत्र शुध्द १, शके १८२० ( दि. २३ मार्च
१८९८ ) या दिवशीं " हा ग्रंथ मुंबईत रा. रा. गोपाळ नारायण आणि कंपनीचे मालक यांचेकरितां रामचंद्र कृष्ण पिंगे
वरेरकर यांणीं गोपाळ नारायण आणि कंपनीच्या छापखान्यांत छापून प्रसिध्द केला. " या द्वितीय प्रकाशनानंतर मात्र
गेल्या पाऊण शतकांत या ग्रंथाचें पुनःप्रकाशन करण्याचा प्रयत्न कोणींही केला नाहीं आणि त्यामुळें भाविकांचे व
अभ्यासकांचें त्याकडे फारसें लक्षही गेलें नाही. प्रस्तुत आवृत्तीसाठीं आम्हीं प्रामुख्यानें पिंगे प्रत वापरली आहे. संदिग्ध
स्थळांच्या स्पष्टतेसाठीं टिल्लू प्रतीचा आधार घेतला आहे. परंतु हस्तलिखित प्रती उपलब्ध न झाल्यामुळे दोन्ही मुद्रित
प्रतींत जे दोष आहेत, ते दूर करणें अशक्य झालें.

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP